रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित ७/१२ ( DSD ) बाबत

नमस्कार मित्रांनो ,

विषय - डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित ७/१२  ( DSD ) बाबत 


                                      महाराष्ट्र शासनाच्या ई फेरफार या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे सर्वच तलाठी मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी यांनी अत्यंत अवघड परिस्थिती मध्ये रात्रंदिवस  कामकाज करून हा प्रकल्प अंतिम टप्प्यावर आणला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन .
                                  आपल्या दृष्टीने अचूक ७/१२ व खाते उतारा खातेदारांना ऑनलाईन उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट असले तरी जनतेला १०० % डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ ऑनलाईन उपलब्ध होणे हे या प्रकल्पाचे यश व पूर्णत्व मानले जाते . प्रत्येक खातेदारा मला माझा डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ डिजिटल पेमेंट भरून केंव्हा काढता येईल त्याची वात पहात आहे .
                                    ई महाभूमी प्रकल्पात एकूण २ कोटी ५० लक्ष ७/१२ संगणकीकृत करणेत आले असून त्यामध्ये गेल्या १०० वर्षात झालेल्या लाखो चुका आपण ऑनलाइन ई  फेरफार प्रणाली मधून दूर केल्या आहेत . या प्रणालीत राज्यात सुमारे ७० लक्ष फेरफार ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले असून त्यापैकी सुमारे ६८ लक्ष फेरफार  प्रमाणित देखील करणेत आले आहेत . ७/१२ ची अचूकता सध्या करण्यासाठी आपण चावडी वाचनाची मोठी मोहीम घेण्यात आली . त्यामध्ये खातेदारांनी लक्षात आणून दिलेल्या तृटी दूर करणेसाठी री एडीट सुविधा देखील देनेत आली होती त्यामुळे सुमारे ९० % पेक्षा जास्त अचूकता आपण सध्या करू शकलो आहे . मात्र अजून देखील ODC अहवाल १ ते ४१ मधील त्रुटी दूर करणेची कार्यवाही तलाठी मंडळ अधिकारी व तहसीलदार स्थरावर सुरु आहे . याची जबाबदारी सध्या उप विभागीय अधिकारी यांना देनेत आली असून हे काम पूर्ण करून घेण्यासाठी प्रांत अधिकारी यांनी नियोजन करून कामकाज करणे अपेक्षित आहे .
                               ई फेरफार प्रकल्पातील अंतिम टप्पा पूर्ण करत असताना आपण आपले कडील सर्वाचूक ७/१२ चा डेटाबेस डिजिटल स्वाक्षरीत करणे आवश्यक आहे . १ मी २०१८ रोजी महाराष्ट्र दिनापासून सुरु केलेले DSP - डिजिटल स्वाक्षरीत pdf चे कामकाज बंद करून  ( जुनी DSP पद्धत ) आपण आत्ता ७/१२ dpf तयार करत नसल्यामुळे आत्ता त्याला DSP न म्हणता DSD ७/१२  म्हणजेच  Dijitally Signed Databased 7/12 ( डिजिटल स्वाक्षरीत डेटाबेस आधारित ७/१२ )  ( नवीन DSD पद्धत ) असे संबोधणे आवश्यक आहे .
                               कोणताही ७/१२ एकदा तलाठी यांनी  DSD  करणे आवश्यक आहे . या पुढे प्रत्येक फेरफार मंजूर केल्या नंतर नमुना ७  मंडळ अधिकारी यांचे DSC द्वारे DSD होईल तसेच पीक पाहणी अद्यावत केल्यानंतर प्रत्येक नमुना १२ तलाठी यांचे DSC द्वारे DSD होईल . म्हणजेच या पुढे नमुना ७  व नमुना १२ स्वतंत्र रित्या DSD होईल अशी व्यवस्था विकशित केली आहे . म्हणूनच आज रोजी चा अद्यावत ७/१२ तलाठी स्वाक्षरीने DSD होणे आवशयक आहे . तरी आपल्या गावातील / तालुक्यातील सर्व ७/१२ DSD झाले आहेत का हे पाहण्याची जबाबदारी तलाठी व तहसीलदार यांची आहे . 
                              राज्यातील त्रुटीयुक्त ७/१२ वगळता इतर सर्व ७/१२ माहे ऑगस्ट २०१९ अखेर DSD होतील या साठी प्रत्येकाने कसोशीने प्रयत्न केला पाहिजे . माहे ऑगस्ट अखेरीस शासन असे DSD ७/१२ जनतेला  महाभूमी संकेतस्थळावरून ऑनलाइन पेमेंट भरून उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे तरी आपण आपले जिल्ह्यातील कामाचे नियोजन करून हा प्रकल्प आपल्या जिल्ह्यात अंतिम टप्प्यात नेवून यशस्वी करावा ही विनंती . 


आपला
रामदास जगताप
दि १८.८.२०१९ 





Comments

Archive

Contact Form

Send