सर्व तलाठी यांनी फेरफार पश्च्यात ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करणे बाबत .
नमस्कार मित्रांनो ,
विषय - फेरफार पश्च्यात ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करणे बाबत .
PDF स्वरूपातील DSP चे कामकाज -
आपण ई फेरफार प्रणाली अंतर्गत मार्च २०१८ मध्ये संगणकीकृत ७/१२ ची pdf डिजिटल स्वाक्षरीत करणेची सुविधा प्रथम विकसित केली . सदरची सुविधा मा. मुख्यमंत्री महोदयांचे शुभहस्ते व मा महसूल मंत्री महोदयांचे उपस्थितीत दे १ मी २०१८ ( महाराष्ट्र दिन ) सुरु केली त्या प्रमाणे अनेक जिल्ह्यांनी डिजिटल स्वाक्षरीचे काम देखील केले . सदरचे डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ pdf स्वरुपात जतन केले जात होते त्यामुळे प्रती ७/१२ ची साईज सुमारे १८० ते २०० kb होत होती पर्यायाने सर्वर वरील स्पेस व गती यांचे वर लोड येत होता त्याचा परिणाम म्हणून आपले स्टेट डेटा सेंटर वरील सर्वर मध्ये बिघाड होवून २८ मे,२०१८ रोजी sdc वरील अनेक जिल्ह्यांचे सर्वर बंद पडले व ते सुरु करायला सुमारे १५ ते २० दिवस झगडावे लागले .
वरील अनुभव विचारात घेवून ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करण्याची कार्यपद्धती मध्ये मोठा बदल करणेत आला व माहे सप्टे २०१८ पासून DSP चे DATA SIGN MODULE सर्वांना उपलब्ध करू दिले . तोपर्यंत जुन्या पद्धतीने सुमारे ३५,९५,००० इतके ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करणेत आले होते. हे सर्व डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ जनतेला महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेच्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून दिहे होते त्यापैकी सुमारे २४ लक्ष ७/१२ खातेदारांनी डाऊनलोड देखील करून घेतले आहेत .
माहे साप्टे, २०१८ नंतर डिजिटल स्वाक्षरीत केलेल्या ( data sign ) ७/१२ व जुन्या नमुन्यातील pdf डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ मध्ये अनेक बदल आहेत तसेच या एक वर्षभरापूर्वी डिजिटल स्वाक्षरीत केलेल्या ७/१२ वर मागील वर्षातील तीन ही हंगामाची पिक पाहणी व अनेक फेरफार झाले असल्याने तेच अद्यावत नसलेले ७/१२ जनतेला संकेत स्थळावरून उपलब्ध करून देणे योग्य नाही. त्यामुळे आपल्याला DDM_DSP MODULE उपलब्ध करून दिले जाणार आहे तथापि त्यापूर्वी आपण सध्याच्या DSP सुविधे मधून फेरफार पश्च्यात ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करणेचे काम पूर्ण करावे .
फेरफार पश्च्यात ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करणे -
आज रोजी प्रत्येक तलाठी लॉगीन ला फेरफार प्रमाणित झाले नंतर डिजिटल स्वाक्षरी साठी शिल्लक असलेल्या ७/१२ चे काम करण्यासाठी DSP मधून फेरफार पश्च्यात डिजिटल स्वाक्षरीत करणे या पर्यायातून हे काम तत्काळ पूर्ण करावे .
सध्या DSP हे कामकाज करण्यासाठी दिवसभर केंव्हाही करता येईल
आपला
रामदास जगताप
दि ६.८.२०१९

ओके सर।.।
ReplyDeleteYes sir
ReplyDelete