रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

खरीप-2019 पिक पाहणीच्या नोंदी ऑनलाईन अपडेट करण्याबाबत. महत्वाच्या मार्गदर्शक सुचना.


मार्गदर्शक सुचना क्रं. 108                                             क्र.रा.भू.4/मा.सुचना क्रं./108/2019
       जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि
       अभिलेख, (.राज्य) पुणे यांचे कार्यालय,
       पुणे, दिनांक:-        31 /08/2019

प्रति, 
       डिस्ट्रीक डोमेन  एक्सपर्ट तथा
       उपजिल्हाधिकारी    (सर्व)

                                 

खरीप-2019  पिक पाहणीच्या नोंदी ऑनलाईन अपडेट करण्याबाबत.
  महत्वाच्या मार्गदर्शक सुचना.

महोदय,
                   -फेरफार प्रकल्प अंतर्गत OCU मधून  पिक पाहणी नोंदी हंगामनिहाय 7/12 मध्ये अद्यावत केल्या जातात. तथापि OCU मध्ये यापुर्वी पिकांची यादी तालुका निहाय ठेवण्यात आली होती. दिनांक 27/08/2019 पासून संपुर्ण राज्यात पिक यादीमध्ये समानता आणण्याच्या दृष्टीने एकच पिक यादी (Uniform Crop List) OCU मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे या तारखेनंतर  पिक पाहणी नोंदी अद्यावत करण्यापुर्वी प्रत्येक तालुक्याचे DBA (नायब तहसिलदार) यांनी तालुक्यात घेतल्या जाणऱ्या पिकाची नावे या यादीमधून निवडणे आवश्यक आहे. त्यानंतरच तलाठी यांना पिकांच्या नोंदी नमुना 12 मध्ये घेता येतील.
                  DBA यांनी अशी पिक पाहणी निवडताना प्रथमत: पिक प्रकार (Crop Type) निवडावा व त्या प्रकारातील/वर्गातील पिका पैकी जी पिके  तालुक्यात घेतली जातात अशा पिकांची निवड करावी. या प्रमाणे सर्व पिक प्रकारातील पिकांची निवड करावी.
                 यामधील पिकांच्या यादी व्यतीरिक्त काही  पिके आपल्या तालुक्यात/जिल्हयात घेतली जात असल्यास ती पिके यादी मध्ये समाविष्ट करण्यासाठी   आपला प्रस्ताव इकडे पाठवावा.
                 यासोबतच बांधावरील झाडे व फळपिके यांची देखील DBA यांनी निवड करावी. राज्यात काही पिकांना वेगवेगळया भागात वेगवेगळी नावे आहेत. जसे भातला काही विभागात धान म्हटले जाते. व काही विभागात साळ देखील म्हटले जाते. म्हणून "अनेक नांवानी ओळखली जाणारी पिके" या पर्यायातून देखील 7/12 वर हवे असणारे पिकाची नावे निवडावी त्यानंतरच खरीप 2019 ची पिक पाहणीच्या नोंदी OCU मधून कराता येतील. ज्या वर्षाची पिक पाहणी अद्यावत केलेली नाही त्या पुर्वीच्या वर्षाची पिक पाहणी OCU Backlog मधून Copy करून पुढच्या वर्षासाठी उपयोगात आणता येते. तथापि गत वर्षासाठी वापरलेले पिकांचे सांकेतक्रमांक (Crop List & Code) व सध्याचे पिकांचे सांकेतक्रमांक  यामध्ये तफावत असल्याने अशा Copy केलेल्या या वर्षातील पिकामध्ये बदल करण्यासठी अशा विशिष्ठ सर्व्हे नंबर वरील अशी पिक पाहणी नष्ट करावी व त्यात त्यानंतर नव्याने पिकांची नोंद करावी.  कॉफी केलेले पिक पाहणी Edit करता येणार नाही. त्याऐवजी ते नष्ट करूनच नव्याने पिकांच्या नोंदी घ्याव्या  लागतील त्याची  नोंद घ्यावी, हे लक्षात घ्यावे.
               वरील प्रमाणे पिक नोंदणी  अद्यावत केल्या नंतर पिक पाहणी अंतीम करणे (कन्फर्म करणे) आवश्यक राहील. त्यानंतर असा अद्यावत गा... 12 आपोआप DSD होईल. मात्र त्यानंतर अशा    कायम केलेल्या सर्व्हे नं. वरील पिकांच्या नोंदी तलाठी यांना पुन्हा बदलता येणार  नाहीत. तथापि काही विशीष्ट स.नं. मधील पिक नोंदी चुकीच्या झाल्या आहेत. अशी तक्रार खातेदारांकडून प्राप्त झाल्यास फक्त मंडळअधिकारी यांना संबधीत शेतकरी व पंचासमक्ष स्थळपाहणी करून एकदा पिकांची नोंद बदलता येईल. त्यासाठी सुविधा लवकरच देत आहोत. त्यामुळे पिक पाहणीच्या नोंदी अंतीम करण्यापूर्वी त्या योग्य असलेची खात्री तलाठी यांनी करावी. सदरच्या सूचना सर्व संबधीतांना तलाठी/मंडळ अधिकारी यांच्या निर्दशनास आणव्यात, ही विनंती.



(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, रा.भू...का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे


प्रत- मा.उपआयुक्त (महसूल) (सर्व) यांना माहितीसाठी सादर.
प्रत- उपविभागीय अधिकारी-(सर्व) यांना माहितीसाठी अग्रेषीत.
प्रत- तहसिलदार-(सर्व) यांना माहितीसाठी रवाना.

Comments

Archive

Contact Form

Send