रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

संगणकीकृत ७/१२ वितरीत करताना घ्यावयाची काळजी

मार्गदर्शक सुचना क्रं. 107                                                  क्र.रा.भू.4/मा.सुचना क्रं./107/2019
               जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि
               अभिलेख, (.राज्य) पुणे यांचे कार्यालय,
               पुणे, दिनांक:-         /08/2019
प्रति, 
डिस्ट्रीक डोमेन  एक्सपर्ट तथा
उपजिल्हाधिकारी    (सर्व)

विषय:-संगणकीकृत ७/१२ वितरीत करताना घ्यावयाची काळजी.
महोदय,
              स्थानिक पातळीवरून  गाव नमुना नं. /१२ ची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. अशा वेळेस शेतकऱ्यांना त्यांच्या अधिकार अभिलेखाशी संबंधित विविध कामाकरीता ७/१२ वेळेत उपलब्ध करून देणे आवश्यक असते. याकरीता राज्यातील सर्व तलाठी यांना ७/१२ , खाते उतारा व फेरफार उतारे यांच्या नकला वितरणासाठी अभिलेख वितरण प्रणाली (DDM) उपलब्ध करून देणेत आली  आहे. तलाठी यांना मोठ्या गावातील कामकाज करताना नकला वितरण व फेरफार नोंदी करण्याचे कामकाज करताना एकाच DSC वापरून काम करताना वेळेची मर्यादा येते, हा अनुभव विचारता घेवून सर्व तलाठी यांना नक्कल वितरणासाठी DSC शिवाय चालणारी  अभिलेख वितरण प्रणाली (DDM)  उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . तसेच ज्या कालावधीत जास्त ७/१२ ची मागणी होते, ही  मागणी लक्षात घेवून तालुक्यातील कोणत्याही गावातील ७/१२ ची नक्कल नायब तहसीलदार यांनी देण्याची सोय सुद्धा अभिलेख वितरण प्रणाली (DDM) उपलब्ध करून देनेत आली  आहे.
               परंतु राज्यातील काही ठिकाणी DDM प्रणालीतून वितरीत करण्यात येणाऱ्या  ७/१२ वर  बदल करून पेनाने दुरुस्ती नोंदी करून त्यावर तलाठी यांची स्वाक्षरी करून 7/12  वितरीत केल्याचे  निदर्शनास येत आहे. तसेच   bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावरील केवळ पाहण्यासाठी उपलब्ध असलेल्या ७/१२ च्या प्रती देखील तलाठी यांचे स्वाक्षरीने वितरीत होत असल्याचे निदर्शनास येत आहे.  सध्यस्थितीत हस्तलिखित ७/१२ वितरण बंद करण्यात आलेले आहे. करीता संबंधित DDE यांनी आपल्या स्तरावरून अशी प्रकरणे आढळल्यास जबाबदार कर्मचारी अधिकारी यांचे विरूध्द  शिस्तभंगाची कारवाई करावी व संगणकीकृत दस्तामध्ये छेडछाड केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्या (I.T.Act) अंतर्गत देखील कारवाई होवू शकते याची जाणीव करून द्यावी. सदरच्या सुचना संबधीतांच्या नजरेस आणाव्यात.

(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, रा.भू...का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
प्रत- मा.उपआयुक्त (महसूल) (सर्व) यांना माहितीसाठी सादर.
प्रत- उपविभागीय अधिकारी-(सर्व) यांना माहितीसाठी अग्रेषीत.
प्रत- तहसिलदार-(सर्व) यांना माहितीसाठी रवाना.

Comments

Archive

Contact Form

Send