विधानसभा निवडणुकीपूर्वी ई फेरफार प्रणालीतील ODC अहवाल निरंक करून १०० % ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करणे बाबत .
नमस्कार मित्रांनो ,
विषय - विधानसभा निवडणुकीपूर्वी ई फेरफार प्रणालीतील ODC अहवाल निरंक करून १०० % ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करणे बाबत .
लवकरच विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरु होईल त्यापूर्वी आपले अत्यंत महत्वाचे ई फेरफार प्रणालीतील ODC अहवाल निरंक करून १०० % ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी खालील महत्वाचे बदल लवकरच आपल्याला उपलब्ध होतील .
१. अहवाल १ मधील क्षेत्र तफावत जेथे दुपटीपेक्षा जास्त आहे ते सर्व ७/१२ अन्य ७/१२ वर सर्व प्रकारचे फेरफार घेता येतील .
२. अहवाल २ व ४ फारसे महत्वाचे राहिले नाहीत म्हणून ODC मधून अहवाल २ व ४ काढून टाकणेत येईल व त्या ऐवजी ज्या ठिकाणी अहवाल एक मधील तफावत दुपटी पेक्षा जास्त आहे त्या ७/१२ चा समावेश असलेला अहवाल १ अ आणि जेथे अहवाल ३ मधील तफावत दुपटीपेक्षा जास्त आहे त्या ७/१२ चा समावेश असलेला अहवाल ३ अ समाविष्ट करणेत येईल . ही दोन्ही अहवाल अहवाल १ व ३ चेच भाग असलेने ते निरंक करण्यासाठी अहवाल १ व ३ च्याच सुविधा वापरता येतील .
३. डबल -- असलेले ७/१२ व आकारा मध्ये तफावत असलेली दोन्ही अहवाल दुरुस्त करण्यासाठी सोपी कार्य्पाढती .
४. अतिरिक्त अहवाल ५ ( अहवाल ४१ ) निरंक करण्याची सुविधा सोपी करणेत येत आहे .
५. अहवाल निरंक केल्यानंतर DBA यांनी ODC मधून १ ते ४१ अहवाल अद्यावत केल्यास ODCMIS मधून एकूण विसंगत सर्वे नं. ची संख्या कमी होईल.
६. खाता दुरुस्ती किंवा आदेशाने कोणताही फेरफार घेतला असता तो निर्गत करे पर्यंत त्या सर्वे वर अन्य कोणताही फेरफार घेता येणार नाही .
७. खाता दुरुस्ती , चूक दुरुस्ती आदेशाने क्षेत्र दुरुस्ती फेरफार घेण्यासाठी तलाठी यांनी ऑनलाईन विनंती केली असता त्यास तहसीलदार यांची मान्यता घेवून अश्या परिशिष्ट क चा फेरफार घेवून तो निर्गत झाल्याशिवाय त्या ७/१२ वर अन्य कोणताही फेरफार ( कलम १५५ च्या फेरफार सह ) घेता येणार नाही .ह्याची नोंद घ्यावी
Comments