रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आजच्या महत्वाच्या सूचना दि २६.७.२०१९



नमस्कार मित्रांनो ,

आजच्या महत्वाच्या सूचना दि २६.७.२०१९ 


१. ODC अतिरिक्त ५ ( अहवाल ४१ ) ची ODC मधील दुरुस्ती सुविधा जास्तच क्लिष्ट झाली होती . हा अहवाल तर निरंक होणे खूपच महत्वाचे आहे मात्र ते काम करत असताना या सुविधेची पर्पूर्ण माहिती / प्रशिक्षण नसल्याने अनेक तलाठी यांचे कडून ही सुविधा वापरताना चुकीची कार्यवाही झाल्याने / अपूर्ण कार्यवाही झाल्याने त्याचा योग्य परिणाम होत नसल्याने ही दुरुस्ती सुविधा सुधारित करून आणखी थोडी दुरुस्त करण्याचा निर्णय घेनेत आल आहे म्हणून आज संध्याकाळ पासून ही अतिरिक्त अहवाल ५ ची दुरुस्ती बंद ठेवली आहे 

 २. कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्ती , मंडळ अधिकारी यांची चूक दुरुस्त , तलाठी चूक दुरुस्ती या फेरफार घेण्यासाठी गट निवडल्यानंतर हा फेरफार निर्गत होई पर्यंत या खाता क्रमांक वर   किंवा ७/१२  वर अन्य कोणताही फेरफार घेण्यात येवू नये . तसे घेतल्यास त्याचा योग्य अंमल होण्यास अडचणी येवू शकतात . 

BEST WAY IS TO NOT CERTIFY ANDY CD, CDM AND KDM MUTATION IF POSSIBLE AS OF NOW.

३.SRO कडील नोंदणीकृत दस्तांची सूची २ व  दस्ताची प्रत ई फेरफार प्रणालीत दाखविण्याची सोय राज्यात सर्व तालुके व जिल्हे  मधील सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांना  आज पासून उपलब्ध करून देत आहे .


आपला 

रामदास जगताप 
दि २६.७.२०१९ 



Comments

Archive

Contact Form

Send