एकूण विसंगत सर्वे नम्बर शून्य करण्यासाठी ODC अहवाल १ ते ४१ निरंक करणे बाबत.
नमस्कार मित्रांनो ,
विषय - एकूण विसंगत सर्वे नम्बर शून्य करण्यासाठी ODC अहवाल १ ते ४१ निरंक करणे बाबत.
आज रोजी प्रत्येक गावातील / तालुक्यातील / जिल्ह्यातील संगणकीकरण कामाची गुणवत्ता समजण्यासाठी तसेच शिल्लक कामाचा आढावा घेण्यासाठी ODC अहवाल १ ते ४१ मध्ये एकूण विसंगत सर्वे नंबर ची संख्या दाखविण्यात येत आहे . ODC मधील अहवाल १ ते ४१ मध्ये ७/१२ व खाते उताऱ्या वर थेट परिणाम करणाऱ्या काही प्रमुख अहवाल यांचा एकूण विसंगत सर्वे नंबर मध्ये समावेश करणेत आला आहे . (अहवाल क्रमांक २,३,४,१४,२३,२९,३१,३२,३८ हे एकूण विसंगती सर्व्हे क्रमांक मध्ये घेतलेले नाहीत याची नोंद घ्यावी.) प्रत्येक DBA यांनी ODC मध्ये लोगिन करून हे १ ते ४१ अहवाल अद्यावत केल्यास एकूण विसंगत सर्वे नंबर ची संख्या दिसून येते .तसेच असे अहवाल ODC मधून अथवा कलम १५५ च्या दुरुस्ती सुविधांमधून दुरुस्त केले तरी जो पर्यंत त्या तालुक्याचा DBA फक्त एक गाव निवडून ODC चे १ ते ४१ अहवाल अद्यावत करत नाही तो पर्यंत सदरचे केलेले काम ODC अहवालामध्ये कमी झाले आहे असे दिसून येणार नाही सबब DBA यांनी हे अहवाल नियमित अद्यावत करणे आवश्यक आहे .
एकूण विसंगत सर्वे नंबर ची संख्या शून्य करण्यासाठी खालील ३२ अहवाल निरंक करणे आवश्यक आहेत.
१) अहवाल १ :- गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण क्षेत्रांचा फ़रक यांचा मेळ बसत नाही ते सर्व्हे क्रमांक.
२) अहवाल ५ :- ७/१२ व खाता रजिस्टर मधील खात्यावरील नावांचा फ़रक.
३) अहवाल ६ :- चुकीच्या पद्धतीने भरलेली खातेदारांची नावे.
४) अहवाल ७ :- खाता रजिस्टर मध्ये चुकीचे निवडलेले खाता प्रकार.
५) अहवाल ८ :- फ़ेरफ़ार क्र. नसलेल्या कब्जेदारांची नावे. (फेरफार क्रमांक ०)
६) अहवाल ९ :- चुकीच्या पद्धतीने भरलेले सर्व्हे क्र.
७) अहवाल १० :- १६ आणे हून जास्त आणेवारी असलेले सर्व्हे क्र.
८) अहवाल ११ :- इतर आधिकारात नोंदीचा प्रकार निवडलेला नाही.
९) अहवाल १२ :- फ़ेरफ़ार क्र.नसलेल्या इतर अधिकारांच्या नोंदी. (फेरफार क्रमांक ०)
१०) अहवाल १३ :- भुधारणा पद्धती साठी प्रकार निवडलेला नाही.
११) अहवाल १५ :- निरंक अथवा - अथवा 0 अथवा TKN असलेले खाते.
१२) अहवाल १६ :- खातेदार नसलेल्या ७/१२ ची यादी.
१३) अहवाल १७ :- खाता रजीस्टर मध्ये असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक.
१४) अहवाल १८ :- सामाईक खात्यामधील नावांचे क्षेत्र 0% अथवा 100% नसलेल्या खातेदारांची यादी.
१५) अहवाल १९ :- सर्वे निहाय आणेवारी असलेल्या खातेदारांची यादी.
१६) अहवाल २० :- बंद सर्व्हे / गट क्रमांकाची यादी.
१७) अहवाल २१ :- ७/१२ वरील एकूण क्षेत्र व क्षेत्राचे एकक यामध्ये तफावत असलेले सर्व्हे क्र.
१८) अहवाल २२ :- शून्य क्षेत्र असलेले ७/१२ वरील चालू खाता क्रमांक.
१९) अहवाल २४ :- एकसारखे असलेल्या सर्व्हे क्रमांक.
२०) अहवाल २५ :- भूधारणा : भोगवटदार - १ असलेले परंतु १ क मध्ये असलेले सर्व्हे क्रमांक.
२१) अहवाल २६ :- भूधारणा : भोगवटदार - २ असलेले परंतु १ क मध्ये नसलेले सर्व्हे क्रमांक.
२२) अहवाल २७ :- खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले खाता - सर्व्हे क्रमांक.
२३) अहवाल २८ :- समान नावांची एकापेक्षा जास्त खाती असलेल्या सर्वे क्रमांक.
२४) अहवाल ३० :- ७/१२ वरील क्षेत्र लागवडीगोग्य आणि बिनशेती क्षेत्र असलेले सर्व्हे / गट क्रमांक
२५) अहवाल ३३ :- खाता विभागणी साठी पात्र असलेले खाता क्रमांक.
२६) अहवाल ३४ :- गावनिहाय साझा आणि मंडळ नोंदणीचा अहवाल.
२७) अहवाल ३५ :- इतर अधिकारांमध्ये - - (Double dash) असलेले सर्व्हे / गट क्रमांक.
२८) अहवाल ३६ :- प्रमाणित फेरफारांचे तपशील किंवा प्रमाणीकरण शेरा निरंक असलेले फेरफार क्रमांक.
२९) अहवाल ३७ :- खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने तयार झालेले डूप्लीकेट.
३०) अहवाल ३९ :- चुकीच्या पद्धतीने भरलेली अपाक,ए.कु.मॅ नावांची खाती.
३१) अहवाल ४० :- खातामास्टर मध्ये अतिरिक्त नावे असलेल्या खात्यांची सर्व्हे क्रमांकनिहाय यादी.
३२) अहवाल ४१ :- अहवाल 5- अतिरिक्त
हे सर्व अहवाल MIS मध्ये सर्वांना उपलब्ध आहेत तसेच गाव निहाय अहवाल देखील MIS मध्ये उपलब्ध आहेत .
आपला
रामदास जगताप
दि १४.७.२०१९
नाशिक तालुका कधी पर्यंत ऑनलाईन होईल???
ReplyDeleteप्रत्येक महिन्याच्या शेवटी सर्व अहवाल निरंक करणे बंधनकारक करण्यात यावे. अहवाल निरंक केल्याशिवाय आपला ई-फेरफार प्रकल्प यशस्वी होणार नाही असे मला वाटते. या सुचणे बाबत आपण विचार करावा.
ReplyDelete