रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आज पासून दूर केलेल्या अडचणी व नवीन सुविधा बाबत



 नमस्कार मित्रांनो ,

   आज दिवसभर काही जिल्ह्यांना लॉगीन साठी काही अडचणी होत्या विशेषतः mahaferfar.enlightcloud.com  या URL च्या काही जिल्ह्यांना आज साय ४.३० वा पर्यंत व्यवस्थित काम करता आले नाही तरीही आपले कामकाज सुरूच होते mahaferfar1.enlightcloud.com  या URL ला काहीही अडचण नव्हती .


आज पासून दिलेल्या काही सुविधा 


ई फेरफार प्रणाली -

१. DDM , DSP  मध्ये तत्काळ ७/१२ उपलब्ध व्हावा म्हणून OPG प्रमाणे सर्व ७/१२ च्या HTML फाईल्स तयार करून ठेवण्याचे काम गेले २/३ दिवस सुरु आहे त्यापैकी सुमारे ४० लक्ष ७/१२ असे तयार केले आहेत व ते काही जिल्ह्यात DDM मधून उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यामुळे या जिल्ह्यात  ७/१२ काहे सेकांदातच DDM व DSP मध्ये उपलब्ध होईल .
२.  तलाठी चूक दुरुस्ती , मंडळ अधिकारी चूक दुरुस्ती व खाता दुरुस्ती च्या सुविधांमध्ये तहसीलदार यांनी मान्यता न दिलेले सर्वे /गट पुन्हा तलाठी यांना दुरुस्ती साठी उपलब्ध राहतील . तसेच खाता दुरुस्ती मध्ये पेज निहाय निवडलेल्या गट नंबर मधील SELECTION ची अडचण दूर केली आहे .
३. मंडळ अधिकारी यांना काही गटांवरफेरफार मंजूर करताना येणारी अडचण दूर केली आहे .

 DDM प्रणाली -


तालुका स्थरावर DBA च्या लॉगीन ने DDM ची सुविधा सर्वांना उपलब्ध करून देनेत आली आहे . जर त्या गावात ७/१२ ची HTML प्रत तयार असेल तर  DDM मध्ये तत्काळ उपलब्ध होईल नसल्यास नेहमी प्रमाणे डाटाबेस मधून ७/१२ तयार करून दाखविण्यात येईल.

ODC प्रणाली -

१. खातेदारांच्या नावात स्पेस असल्याने तयार झालेली डुप्लिकेट नावे काढून टाकण्या साठी ( ODC अहवाल ५ ) निरंक करण्यासठी ODC मध्ये दुरुस्ती सुविधा ४२ उपलब्ध करून देण्यात आली .
२. शून्य फेरफार क्रमांक दुरुस्त केला तरी त्याचा अंमल होत नव्हता ही अडचण दूर करणेत आली आहे .


कृपया या सुविधा वापरून पहाव्यात व FEEDBACK कळवावा .

जुन्नर , सिन्नर ,सातारा व मनोरा तालुक्यात DSP _DDM प्रणाली चे टेस्टिंग करून UAT अहवाल द्यावा .



आपला
रामदास जगताप
दि १५.७.२०१९ 

Comments

  1. सर, ३ महिन्यातुन एकदा लॅपटाप संबंधी तांत्रिक अडचणी, कन्नेक्टीविटी समस्या व इतर SOFTWARE बाबत अडचण दूर करण्यासाठी जिल्ह्यातुन टेक्नीशियन पाठविण्यात यावा जेणेकरून ऑनलाईन काम विनाविलंब निरंतर चालु राहील. या सुविधेचा सर्वाना निश्चित फायदा होईल आपण यावर विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा हि विनंती.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send