रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

तालुका स्थरावर DDM Module मधून 7/12 वितरीत करणेबाबत.


                                                                                    
प्रति, 
      निवासी उपजिल्हाधिकारी  तथा
      डिस्ट्रीक डोमेन एक्सपर्ट,   (सर्व)

                                        विषय-  तालुका स्थरावर DDM Module मधून 7/12 वितरीत करणेबाबत.
महोदय,
                सध्या पीक विमा भरण्याकामी असंख्य खातेदारांना 7/12 ची गरज भासत असलेने, आज रोजी दररोज ४/५  लाखापेक्षा जास्त अभिलेखांचे वितरण DDM प्रणालीतून तलाठी यांचे सहीने  होत आहे. सध्या या कालावधीत जास्त ७/१२ ची मागणी लक्षात घेवून  तालुक्यातील कोणत्याही  गावाच्या 7/12 ची नक्कल नायब तहसिलदार( DBA) यांचे लॉगीन ने   वितरीत करण्याचा सोय उपलब्ध करून  देण्यात आली आहे

त्याबाबत मार्गदर्शक सुचना खालील प्रमाणे

             1. ( नायब तहसीलदारा DBA-NT) यांच्या लॉगीने सशुल्क 7/12 वितरीत करणे.

                            सध्या पीक विमा आणि अन्य कामासाठी मोठया प्रमाणावर खातेदारांना 7/12 ची मागणी होत आहे. त्याकरीता DBA-NT यांनी त्यांच्या लॉगीनने DDM प्रणालीतून  तालुका स्तरावर ७/१२ व फेरफार च्या सत्यप्रती  वितरीत करता येतील . अशा वितरीत नक्कलांच्या DDM प्रणालीत अहवालामधून देखील नक्कल वितरणाचा सर्व हिशोब अचूकरित्या मिळू शकेल. अशा नक्कल वितरणातून जमा होणाऱ्या नक्कलफी पैकी र.रू.5 प्रती नक्कल हि रक्कम तलाठयाप्रमाणे संबधित DBA-NT यांनी स्टेट   बँकेच्या जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे नावे असलेल्या खात्यावर जमा करावी व उर्वरीत र.रू.10 रूपायाच्या देखील हिशोब संबधित नायब तहसिलदार यांनी ठेवावा व ते लेखा परीक्षण कालावधीपर्यंत/ लेखा परीक्षण होईपर्यंत जतन करून ठेवावा लागेल. त्या रक्कमेचा विनीयोग तहसिलदार यांना जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने कार्यालयातील खर्चासाठी करता येईल. नक्कल फी बाबत 31/01/2019 च्या  शासन निर्णयातील अटी व शर्ती संबधित DBA लॉगीन ने वितरीत नकलांच्या बाबत   लागू राहतील.

            2.DBA-NT यांच्या Login ने विनाशुल्क 7/12 वितरीत करणेबाबत.

                             शासकीय कामकाजासाठी म्हणेजच विविध प्रकरणात संबधित अधिकाऱ्यांना ७/१२ च्या नक्कला लागतात. सदर नक्कल सध्या तलाठी यांच्याकडून मागविल्या जातात  परंतू तलाठी यांच्या कामाचा व्याप पाहता व त्यांची संबधित तहसिल कार्यालयात  उपलब्धता व्हावी हा देखील या मागे एक उद्देश आहे .  


सदरची कार्यवाही तत्काळ सर्व तहसीदार यांनी सुरु करावी व कोन्त्याहे खातेदाराला ७/१२ मिळाला नाही अशी तक्रार या पुढे येणार नाही अशी व्यवस्था करावी तथापि त्यासठी प्रत्येक DBA याना लोगिन साठी DSC लागेल ह्याची नोंद घ्यावी 


 (रामदास जगताप)
राज्य समन्वयक, रा.भू...का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
प्रत-मा. उपआयुक्त (महसूल) विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व)

Comments

Archive

Contact Form

Send