रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

अभिलेख वितरण प्रणाली( DDM ) मध्ये नायब तहसीलदार ( DBA) यांना लॉगीन देण्याबाबत


नमस्कार मित्रांनो .

विषय - अभिलेख वितरण प्रणाली   ( DDM ) मध्ये   नायब तहसीलदार ( DBA) यांना लॉगीन देण्याबाबत 


             सध्या पीक विमा भरण्यासाठी असंख्य खातेदारांना ७/१२ ची गरज भासत असल्याने आज रोजी दररोज  ४ लाखापेक्षा जास्त अभिलेखांचे वितरण DDM प्रणालीतून तलाठी यांचे स्वाक्षरीने होत आहे . सध्या या कालावधीत जास्त ७/१२ ची मागणी लक्षात घेवून तालुक्यातील कोणत्याही गावच्या ७/१२ ची नक्कल नायब तहसीलदार यांनी देण्याची सोय देण्याबाबत विचार चालू आहे त्यामुळे तलाठी स्थावर येणारा कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल तसेच एखाद्या तालुका स्थावर असलेल्या खातेदाराला तातडीच्या कामासाठी तहसील कार्यालय स्थरावर ७/१२ ८अ व फेरफार नोंदवह्याच्या नकला उपलब्ध होवू शकतील म्हणून DDM काही बदल करून  प्रायोगिक तत्वावर  चंद्रपूर व गोंदिया या दोन जिल्ह्यात अभिलेख वितरण प्रणाली मध्ये  ( DDM ) नायब तहसीलदार ( DBA) यांना लॉगीन उपलब्ध करून देण्यात येत आहे .



       गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संबंधित नायब तहसीलदार ( DBA ) यांना त्यांची नोंदणीकृत DSC वापरून https://mahaferfarnas.enlight.com  हि लिंक वापरून ( स्वतःचा सेवार्थ आय डी  व पासवर्ड वापरून )  उद्या दिनांक १०.७.२०१९ पासून ७/१२ , खाते उतारे व फेरफार नोंदी च्या नकला प्रती नक्कल १५ प्रमाणे पैसे रोख भरून घेवून नकला वितरीत करता येईल .
                     अशा पद्धतीने संबंधित नायब तहसीलदार ( DBA ) यांचे नावेच हिशोबित होतील . . अशा वितरीत नकलांचा DDM प्रणालीतील अहवाल देखील नक्कल वितरण चा सर्व होशोब अचूक रित्या मिळू शकेल ( अजून हा अहवाल तयार केलेला नाही ) अशा नक्कल वितरणातून जमा होणाऱ्या नक्कल फी पैकी ५ रु.प्रती नक्कल हि रक्कम तलाठ्या प्रमाणे संबंधित DBA यांनी स्टेट बँकेच्या जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे नावे असलेल्या खात्यावर जमा करावी व उर्वरील १० रुपयाचा देखील होशोब संबंधित नायाब तहसीलदार यांनी ठेवावा व तो लेखा परीक्षण कालावधी पर्यंत / लेखा परीक्षण होई पर्यंत जतन करून ठेवावा लागेल . त्या रकमेचा विनियोग तहसीलदार  यांना जिल्हाधिकारी यांचे मान्यतेने कार्यालयीन खर्चा साठी करता येईल .
                                 नक्कल फी बाबत दि ३१ जाने . २०१९ च्या शासन निर्णयातील अति शर्ती संबंधित नायब तहसीलदार ( DBA यांना लागू राहतील.
                                 गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संबंधित नायब तहसीलदार ( DBA ) यांनी वापर करून या बाबतचे आपले अभिप्राय द्यावेत हि विनंती
आपला

रामदास जगताप
राज्य समन्वयक
ई फेरफार प्रकल्प
दि ९.७.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send