ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पिकांच्या नोंदी करणेबाबत व प्रगतीबाबत.
प्रती ,
उप जिल्हाधिकारी तथा डी डी ई , पालघर , नाशिक , पुणे , औरंगाबाद , अमरावती , नागपूर
तहसीलदार , पालघर , दिंडोरी , बारामती , फुलंब्री , अचलपूर व कामठी
विषय- ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पिकांच्या नोंदी करणेबाबत व प्रगतीबाबत.
मा. मुख्यमंत्री महोदयाच्या निर्देशाप्रमाणे टाटा ट्रस्टच्या
सहकार्याने शासनाकडून विकसीत केलेल्या ई-पीक पाहणी या मोबाईल
ॲपच्या आधारे शेतातील पिकांच्या हंगामनिहाय नोंदी गांव नमुना नंबर 12 मध्ये घेण्यासाठी पथदर्शी प्रकल्प दिनांक 10/09/2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये सहा महसूल विभागातील प्रत्येकी एका जिल्हयातील अचलपूर, कामठी,
फुलंब्री, दिंडोरी, बारामती
व वाडा या तालुक्यात सध्या सुरू आहे.
सदर प्रकल्प रब्बी , उन्हाळी हंगाम व
संपूर्ण वर्ष या हंगामा करीता सध्या वापरून पाहण्यात आलेला आहे. सदर डाटाचे विश्लेषण केले असता 1.5 लाख नोंदणी पैकी केवळ 50%
नोंदणी खातेधारकांनी पिकांची नोंदणी केलेली आहे. तसेच
500 पेक्षा जास्त वापर कर्त्यांची नोंदणी एकाच मोबाईल
क्रंमाकावरून करण्यात आलेली आहे. तसेच पिकांची नोंदणी
केल्यानंतर पिकांचे फोटो देखील खुप कमी भरण्यात आलेले आहेत. हे योग्य नाही .
त्या करीता सदर प्रकल्पाची येणाऱ्या
खरीप हंगामात योग्य प्रकारे अंमलबजावणी होण्याकरीता आपल्या विभागातील या निवडलेल्या
तालुक्यांतील 100% खातेदारांची नोंदणी होईल अशी 20 गावे
निवडण्यात येवून त्या गावांवर विशेष लक्ष केंद्रित करावे . तसेच योग्य पध्दतीने या मोबाईल ॲप मध्ये नोंदणी करून घेणे, पिकांची नोंदणी पिकांच्या
फोटोसहीत माहिती अपलोड करणे या करीता क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात
याव्यात व सदरच्या नोंदी 100% होण्याकरीता व पिकांचा अचूक नोंदी या मोबाईल ॲपच्या मार्फत करण्याच्या
कामाकडे आपण स्वत: वैयकतीक लक्ष घालावे, ही विनंती.
आपला
रामदास जगताप
राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प
दि १७.७.२०१९
Comments