रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

मराठवाडा विभागातील ( औरंगाबाद विभाग ) शेतकरी यांना पीक विमा योजने साठी तातडीने ७/१२ उपलब्ध करून देणे बाबत .



नमस्कार मित्रांनो ,


विषय - मराठवाडा विभागातील ( औरंगाबाद  विभाग ) शेतकरी यांना पीक विमा योजने साठी तातडीने ७/१२ उपलब्ध करून देणे बाबत .


     सध्या राज्यभर पीक विमा संरक्षणाचे फॉर्म भरण्याचे काम सुरु आहे त्यामुळे सर्वच शेतकरी यांचे कडून गाव नमुना नं. ७/१२ ची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहेत . विशेषता मराठवाडा विभागात पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ७/१२ ची मागणी होत आहे . अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा वेळेत भरता यावा म्हणून मराठवाडा विभागातील सर्व शेतकरी यांना वेळेत ७/१२ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दि १६.७.२०१९ च्या मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने शासना कडून  देण्यात आले आहेत . त्या अनुषंगाने केली असलेली तसेच करण्यात येत असलेली कार्यवाही पुढील प्रमाणे असे .

१. क्लाऊड वर ई फेरफार प्रणालीचे स्थलांतर केल्या नंतर राज्यातील सर्व तलाठी यांना ७/१२ , खाते उतारा व फेरफार उतारे यांच्या नकला वितरणासाठी अभिलेख वितरण प्रणाली (DDM) उपलब्ध करून देनेत आली असून त्यातून माहे में जून मध्ये १ ते १.५ लाख अभिलेखांचे वितरण केले जात होते मात्र सदरचे काम गतीने होण्यासाठी / ७/१२  उपलब्ध करून देण्यासाठी DDM प्रणाली मध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या मुळे  गेल्या १५ दिवसापासून दररोज ४ ते ५ लाख अभिलेखांचे वितरण तलाठी यांचे स्वाक्षरीने ( रुपये १५ प्रती नक्कल प्रमाणे शुल्क ) करणेत येत आहे . मागील चार महिन्यात DDM मधून सुमारे १ कोटी ४० लक्ष ७/१२ खाते उतार्यांचे वितरण केले आहे व आज देखील दररोज ६ लाखांपेक्षा जास्त अभिलेख वितरीत होत आहेत .

२. शेतकरी यांना तालुक्याच्या गावी आल्यानंतर ७/१२ काढण्यासाठी पुन्हा आपल्या गावी जावून तलाठी यांचेकडे जायला लागू नये म्हणून प्रत्येक तहसील कार्यालयाचे ठिकाणी नायब तहसीलदार ( DBA) यांचे लॉगीनने DDM मधून तालुक्यातील कोणत्याही गावचे ७/१२ व खाते  उतारे वितरणासाठी ची सोय उपलब्ध ( रुपये १५ प्रती नक्कल प्रमाणे शुल्क ) करून दिली आहे .

३. गेल काही दिवसापासून सुट्टीचे दिवसी किंवा रात्री काही तालुके / जिल्हे यांचे सर्व गावातील सर्व ७/१२ HTML FILE FORMAT मध्ये तयार करून ठेवले जात आहेत व सदरचे ७/१२ DDM उपलब्ध करून दिले जात आहेत त्या मुले तलाठी यांना DDM असा ७/१२ काही शेकंदा मधेच उप्लोब्ध होतो आहे .

४. अशा पद्धतीने मराठवाड्यातील खालील ३३ तालुक्यातील सर्व  ७/१२ च्या HTML FILES तयार करणेत आल्या आहेत व उर्वरित तालुक्यातील HTML FILES  लवकरच उपलब्ध होत आहेत .

Marathvadha html generation status
Pending Tehsil completed Tehsil
district_name taluka_name district_name taluka_name
उस्मानाबाद भुम उस्मानाबाद उमरगा
उस्मानाबाद लोहारा उस्मानाबाद उस्मानाबाद
औरंगाबाद औरंगाबाद उस्मानाबाद कळंब
औरंगाबाद कन्नड उस्मानाबाद तुळजापुर
औरंगाबाद गंगापुर उस्मानाबाद परंडा
औरंगाबाद पैठण उस्मानाबाद वाशी
औरंगाबाद फुल्लंब्री औरंगाबाद खुलताबाद
औरंगाबाद वैजापुर औरंगाबाद सोयगाव
औरंगाबाद सिल्लोड परभणी गंगाखेड
जालना अबंड परभणी परभणी
जालना घनसांगवी परभणी पाथ्री
जालना जाफ्राबाद परभणी पालम
जालना जालना परभणी पुर्णा
जालना परतुर परभणी मानवत
जालना बदनापुर परभणी सोनपेठ
जालना भोकरदन बीड अंबाजोगाई
जालना मंठा बीड गेवराई
नांदेड अर्धापुर बीड धारुर
नांदेड उमरी बीड परळी
नांदेड किनवट बीड पाटोदा
नांदेड कंधार बीड बीड
नांदेड देगलूर बीड माजलगाव
नांदेड धर्माबाद बीड वडवानी
नांदेड नायगाव बीड शिरुर
नांदेड नांदेड लातूर अहमदपुर
नांदेड बिलोली लातूर उदगीर
नांदेड भोकर लातूर चाकुर
नांदेड माहुर लातूर जळकोट
नांदेड मुखेड लातूर देवनी
नांदेड मुद्खेड लातूर रेणापुर
नांदेड लोहा लातूर लातुर
नांदेड हादगाव लातूर शिरुरअंनतपल
नांदेड हिमायत नगर
परभणी जिंतुर
परभणी सेलु
बीड आष्टी
बीड केज
लातूर औसा
लातूर निलंगा
हिंगोली औंढा नागनाथ
हिंगोली कळमनुरी
हिंगोली वसमत
हिंगोली सेनगाव
हिंगोली हिंगोली


याच प्रमाणे अन्य जिल्ह्यात देखील हे कामकाज चालू आहे . मात्र असे HTML मध्ये तयार केलेले अभिलेख त्या विशिष्ट तारखेला तयार जाहले असल्याने त्या नंतर फेरफार मंजूर झाला असेल किंवा पिकांच्या नोंदी अद्यावत केल्या असतील तर त्या या HTML ७/१२ मध्ये दिसनार नाही म्हणून DDM मध्येअसा ७/१२ अद्यावत करून नंतर प्रिंट काढावी तरच असा ७/१२ अद्यावत असेल असे अपेक्षित आहे ह्याची नोंद घ्यावी .

५. ज्या जिल्ह्यात सर्वाधिक / मोठ्या प्रमाणावर ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत झाले आहेत त्या जिल्ह्यात / तालुक्यात असे डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ देखील तलाठी लोगिन ने महाभूमी संकेस्थळावरून लवकरच उपलब्ध करून देण्यात येत आहे .



या शिवाय शेतकरी यांना ७/१२ मिळण्यामध्ये अडचण येवू नये म्हणून अभिलेख वितरण प्रणाली मध्ये आणखी सुधारणा करून उद्या दिनांक १८.७.२०१९ पासून सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून दिली जाईल त्यामुळे ७/१२ वितरण आणखी गतीने करता येईल .

कोणत्याही तालुक्यात या बाबत काही अडचणी येत असल्यास जमाबंदी आयुक्त कार्यालयातील हेल्प डेस्क ला संपर्क करावा हि विनंती .


आपला
रामदास जगताप
दि १७.७.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send