रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ODC अहवाल १ ते ४१ आणि ते निरंक करण्याची कार्यपद्धत

. क्र.
ODC अहवाल 
दुरुस्ती सुविधा
अहवाल
गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण क्षेत्रांचा फ़रक यांचा मेळ बसत नाही ते सर्व्हे क्रमांक. -(DSP प्रतिबंधित)
ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती किंवा ई  फेरफार  मधून अहवाल ची १ दुरुस्ती (सुनावणी द्वारे झालेला आदेश ) फेरफार घेवून  करावी. ७/१२ वरील भोगवटादार पूर्णपणे निरंक अथवा कंस झाले असलेस आदेश दस्तावेज फेरफार ने खातेदार समाविष्ट करावेत.
अहवाल  
गाव नमुना ७ व ८अ मधील क्षेत्राचा फरक. -(DSP प्रतिबंधित)
दुरुस्ती सुविधा पर्याय क्रमांक 2 गाव निहाय ८अ च्या क्षेत्राची दुरुस्ती (Village Processing for ८अ) करावी
अहवाल ३
गाव नमुना १ व ७ मधील क्षेत्रांचा फरक.
आकाराबंदा प्रमाणे ७/१२ चे क्षेत्र योग्य असलेस अहवाल ३ च्या दुरुस्तीसाठी odc मधील दुरुस्ती सुविधा क्रमांक 3 वापरून आकारबंदा प्रमाणे क्षेत्र भरून त्यास DBA यांनी मान्यता द्यावी. परंतु क्षेत्र चुकीचे असलेस कलम १५५ च्या आदेशाने क्षेत्र दुरुस्तीचा आदेश हा फेरफार ने क्षेत्र दुरुस्ती पूर्ण करावी.
अहवाल ४
गाव नमुना ७ वरील एकुण क्षेत्र व जिरायत, बागायत, इत्यादी क्षेत्र यांचा मेळ न बसलेले सर्व्हे क्र. -(DSP प्रतिबंधित)
 दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ४ अहवाल ४ मध्ये चूकीच्या पद्धतीने दर्शवलेल्या एकूण क्षेत्राची दुरुस्ती या पर्यायाचा वापर करावा
अहवाल ५
७/१२ व खाता रजिस्टर मधील खात्यावरील नावांचा फरक -
(DSP प्रतिबंधित)
दुरुस्ती पर्याय क्रमांक - ५  मधून  ७ वर असलेले पण खाता रजिस्टर मध्ये नसलेली नावे अद्यावत करणे पर्याय वापरावा  तसेच ODC दुरुस्ती पर्याय क्रमांक -४२  मधील ७ वर असलेले पण खाता रजिस्टर मध्ये नसलेली नावे अद्यावत करता येतील 
अहवाल ६
चुकीच्या पद्धतीने भरलेली खातेदारांची नावे.
 ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्तीची सुविधा वापरून नावे योग्य पद्दतीने दुरुस्त करावीत.
अहवाल ७
खाता रजिस्टर मध्ये चुकीचे निवडलेले खाता प्रकार -
(DSP प्रतिबंधित)
अहवाल ७ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ७)  खाता प्रकार दुरुस्ती वापरावा
अहवाल ८
फ़ेरफ़ार क्र. नसलेल्या कब्जेदारांची नावे. .(फेरफार क्रमांक ०) -
(DSP प्रतिबंधित)
अहवाल ८ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ८) शून्य फेरफार क्रमांक दुरुस्ती वापरावा. (CORRECTED TO BE HOSTED) तसेच कलम १५५ च्या आदेशाने फेरफार क्रमांकाचे दुरुस्ती पर्याय वापरून दुरुस्ती करता येईल.
अहवाल ९
चुकीच्या पद्धतीने भरलेले सर्व्हे क्र.
 ई-फेरफार आज्ञावली मधून आदेश दस्तावेज फेरफार द्वारे सर्वे क्रमांक बदलणे या पर्यायाचा वापर करून योग्य दुरुस्ती करावी.
अहवाल १० 
१६ आणे हून जास्त आणेवारी असलेले सर्व्हे क्र.
ई-फेरफार आज्ञावली मधून  आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती अथवा कलम १५५ च्या आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती फेरफार द्वारे खातेदाराच्या नावासमोरील आणेवारीचे क्षेत्रात रूपांतर करण्यात यावे.
अहवाल ११ 
इतर आधिकारात नोंदीचा प्रकार निवडलेला नाही.  -
(DSP प्रतिबंधित)
 ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने इतर अधिकारातील नोंदीचा प्रकार उपप्रकार बदलणे या पर्यायाचा वापर करावा.
अहवाल १२
फ़ेरफ़ार क्र.नसलेल्या इतर अधिकारांच्या नोंदी.(फेरफार क्रमांक ०)  -(DSP प्रतिबंधित)
ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने फेरफार क्रमांकाची दुरुस्ती या पर्यायाचा वापर करावा
अहवाल १३
भुधारणा पद्धती साठी प्रकार निवडलेला नाही. 
 -(DSP प्रतिबंधित)
ई-फेरफार आज्ञावली मधून आदेश दस्तावेज फेरफार ने योग्य भूधारणा निवडणे 
अहवाल १४
 ७ भरलेला आहे पण १२ भरलेला नाही.
पीक पाहणी आज्ञावली - ओ सी यु( OCU ) मधून गाव नमुना १२ ची माहिती भरावी.
अहवाल १५
निरंक अथवा - अथवा 0 अथवा TKN असलेले खाते.  -
(DSP प्रतिबंधित)
 दुरुस्ती पर्याय क्रमांक १५) निरंक अथवा '-' अथवा '0' अथवा 'TKN' असलेले खाता क्रमांक दुरुस्ती वापरावा.
अहवाल १६
खातेदार नसलेल्या ७/१२ ची यादी. -(DSP प्रतिबंधित)
 जर हा निरंक ७/१२ योग्य (अस्तित्वात असल्यास) असल्यास ई-फेरफार आज्ञावली मधील अहवाल १ ची दुरुस्ती हा पर्याय वापरून नवीन खाते समाविष्ट करावे अथवा जर हा निरंक सातबारा काढून टाकायचा असल्यास अहवाल क्र. १६ ची दुरुस्ती पर्याय वापरून हा ७/१२ नष्ट करावा
अहवाल १७
खाता रजीस्टर मध्ये असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक.
 दुरुस्ती पर्याय क्रमांक १७) खाता रजीस्टर मध्ये असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक काढून टाकणे वापरावा.
अहवाल १८
सामाईक खात्यामधील नावांचे क्षेत्र 0% अथवा 100% नसलेल्या खातेदारांची यादी. -
(DSP प्रतिबंधित)
 ई-फेरफार आज्ञावली मधून आदेशाने ७/१२ वरील क्षेत्राची दुरुस्ती फेरफार द्वारे खातेदारांच्या नावासमोरील क्षेत्र सामूहिकरीत्या (फक्त एक नावासमोरील) नमूद करावे अथवा सर्व नावांसमोर (० % अथवा १००% क्षेत्र नमूद करणे) क्षेत्र नमूद करणे.
अहवाल १९
सर्वे निहाय आणेवारी असलेल्या खातेदारांची यादी. 
-(DSP प्रतिबंधित)
 ई-फेरफार आज्ञावली मधील आवश्यकते प्रमाणे आदेशाने ७/१२ वरील क्षेत्राची दुरुस्ती/आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती  फेरफार घेऊन खातेदाराच्या नावासमोरील आणेवारीचे क्षेत्रात रूपांतर करण्यात यावे
अहवाल २०
बंद सर्व्हे / गट क्रमांकाची यादी.
हा माहितीस्तव आहे जर या ७/१२ यादीपैकी काही ७/१२ पुन्हा चालू करावयाचे असल्यास ई फेरफार आज्ञावली मधून आदेशाने बंद ७/१२ चालू करणे हा फेरफार घ्यावा.
अहवाल २१ 
७/१२ वरील एकूण क्षेत्र व क्षेत्राचे एकक यामध्ये तफावत असलेले सर्व्हे क्र. 
-(DSP प्रतिबंधित)
जर ७/१२ वरील क्षेत्र योग्य असल्यास ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने एकक दुरुस्ती फेरफार घेऊन एकक बदलण्याचा फेरफार घ्यावा अन्यथा जर ७/१२ वरील एकक योग्य असल्यास क्षेत्र दुरुस्ती (शेती) अथवा क्षेत्र दुरुस्ती (एन.ए) ७/१२ साठी या फेरफाराद्वारे योग्य त्या दुरुस्त्या कराव्यात.
अहवाल २२
शून्य क्षेत्र असलेले ७/१२ वरील चालू खाता क्रमांक 
-(DSP प्रतिबंधित)
खाते अनावश्यक असलेस ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्ती फेरफार घेऊन खाते क्रमांक वगळणे ही सुविधा वापरावी अथवा आदेशाने ७/१२ वरील क्षेत्र दुरुस्ती फेरफार क्षेत्र दुरुती करून घ्यावे.
अहवाल २३
पुढील वर्षासाठी पिकपाहणी चा डाटा कॉपी झालेले सर्व्हे क्रमांक.
दुरुस्ती पर्याय क्रमांक २३) मधे दर्शविलेल्या सुचने नुसार पीक दुरुस्ती आज्ञावली (OCU)  ओ सी यु आज्ञावली मधून पुढील वर्षाचा डाटा नष्ट करणे ही सुविधा वापरावी.
अहवाल २४  
अहवाल २४. एकसारखे असलेल्या सर्व्हे क्रमांक 
 -(DSP प्रतिबंधित)
स्पेस असलेने तयार झालेले एकसारखे सर्वे क्रमांक चा हा अहवाल दिला आहे - ई-फेरफार आज्ञावली मधून आदेश दस्तावेज फेरफार ने सर्वे क्रमांक बदलणे हा पर्याय वापरावा अयोग्य ७/१२ असलेस ७/१२ बंद करावा.
अहवाल २५
 भोगवटदार - १ असलेले परंतु १ क मध्ये असलेले सर्व्हे क्रमांक.
 -(DSP प्रतिबंधित)
अहवाल मध्ये दाखविलेले सर्वे योग्य असलेस DBA यांचे UC  आज्ञावली मध्ये १ क चे व्यवस्थापन करावे/ अहवाल मधील भूधारणा चुकीची असल्यास आदेश दस्तावेज फेरफार ने योग्य भूधारणा व तिचा उपप्रकार निवडून दुरुस्ती करावी.
अहवाल २६
भोगवटदार - २ असलेले परंतु १ क मध्ये नसलेले सर्व्हे क्रमांक. -(DSP प्रतिबंधित)
ई-फेरफार आज्ञावली मधून अनोंदणीकृत फेरफार --> नियंत्रित सत्ता प्रकारची नोंद या पर्यायाचा वापर करून दुरुस्ती करावी अथवा आदेश दस्तावेज फेरफार द्वारे भोगवटदार वर्ग २ चा १ ते १४ मधील योग्य प्रकार निवडा.
अहवाल २७
खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले खाता - सर्व्हे क्रमांक 
-(DSP प्रतिबंधित)
अहवाल २७ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक २७) खातेदारांचे नाव/नावे निरंक असलेले खाते क्रमांक / नावे काढून टाकणे
अहवाल २८
समान नावांची एकापेक्षा जास्त खाती असलेल्या सर्वे क्रमांक 
-(DSP प्रतिबंधित)
 ई-फेरफार आज्ञावली मधून  खाते एकत्रीकरण करावे अथवा खात्यावरील कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्ती फेरफार ने खाते निवडक सर्वे वरून वगळणे पर्याय वापरून दुरुस्त करावे.
अहवाल २९
इतर अधिकाराचा तपशील निरंक असलेले सर्व्हे / गट क्रमांक.
हस्तलिखित 7/12 प्रमाणे नोंदी आल्या नसल्यास आदेश दस्तावेज/तलाठी चूक दुरुस्ती फेरफार घेऊन भरून घ्याव्यात.
अहवाल ३०
७/१२ वरील क्षेत्र लागवडी योग्य आणि बिनशेती क्षेत्र असलेले सर्व्हे / गट क्रमांक -
(DSP प्रतिबंधित) 
सदर सातबारा (एकाच ७/१२ वर) शेती व बिनशेती क्षेत्र नमूद असल्यास तो पूर्णतः शेतीचा किंवा बिनशेती क्षेत्र चा करावा त्यासाठी इ फेरफार आज्ञावली मधील कलाम १५५ चा क्षेत्र दुरुस्तीचा आदेश घेऊन योग्य दुरुस्ती करावी.
अहवाल ३१
शेती सातबारा वरील क्षेत्र २० हे. आर. पेक्ष्या जास्त किंवा बिनशेती सातबारा वरील क्षेत्र 99 आर.चौ.मी पेक्ष्या जास्त असलेले सर्व्हे क्रमांक -(DSP प्रतिबंधित)
 सातबारा वर क्षेत्र दुरुस्ती आवश्यक असल्यास ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ आदेशाने क्षेत्र दुरुस्ती हा फेरफार घ्यावा अन्यथा योग्य क्षेत्र असल्यास सदर सातबाराचे क्षेत्र हे २० हेक्टर अथवा ९९ आर पेक्षा जास्त असल्यामुळे सदर सातबारावर फेरफार घेण्यासाठी एकवेळ तहसीलदार यांची मान्यता घ्यावी .
अहवाल ३२
अहवाल १ मध्ये क्षेत्रामधील फरक हा ०.०१ पेक्ष्या जास्त असलेल्या सर्व्हे क्रमांक
ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने अहवाल १ ची दुरुस्ती हा फेरफार घ्यावा व योग्य ती दुरुस्ती करावी
अहवाल ३३
खाता विभागणी साठी पात्र असलेले खाता क्रमांक. 
-(DSP प्रतिबंधित)
 ई-फेरफार आज्ञावली मधील खाते विभागणी हा पर्याय वापरून सदर सर्वे क्रमांकावर खाताविभागणी ही प्रक्रिया पूर्ण करावी.
अहवाल ३४
गावनिहाय साझा आणि मंडळ नोंदणीचा अहवाल.
सदर अहवाल माहितीवजा देण्यात आला आहे - युझर क्रीएशन ( UC ) module मधून आपले गाव योग्य त्या सझा व मंडळ च्या अखत्यारीत्या नोंदवून घ्यावे.
अहवाल ३५
इतर अधिकारांमध्ये - - (Double dash) असलेले सर्व्हे / गट क्रमांक.
-(DSP प्रतिबंधित)
अहवाल ३५ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ३५) अहवाल ३५ ची दुरुस्ती वापरावा. (done remaining for hosting)
अहवाल ३६
प्रमाणित फेरफारांचे तपशील किंवा प्रमाणीकरण शेरा निरंक असलेले फेरफार क्रमांक.
अहवाल ३६ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती  १) ई-फेरफार आज्ञावली मधून १५५ च्या आदेशाने फेरफार रजिस्टर दुरुस्ती फेरफार वापरून योग्य ती दुरुस्ती करावी. २)केवळ निरंक प्रमाणीकरण शेरा दुरुस्त करणे करिता eferfar मध्ये मंडळ अधिकारी यांनी निरंक प्रमाणिकरण शेरा दुरुस्त करणे पर्याय वापरून दुरुस्ती करावी.
अहवाल ३७
खातेदारांच्या नावामध्ये स्पेस असल्याने तयार झालेले डूप्लीकेट 
-(DSP प्रतिबंधित)
अहवाल ३७ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ३७) खाता रजीस्टर मध्ये असलेले परंतु ७/१२ वर नसलेले खाते क्रमांक काढून टाकणे.
अहवाल ३८
गाव नमुना ७ वरील एकुण आकारणी व ७/१२ वरील खात्यांच्या एकुण आकारणीचा फ़रक.
अहवाल ३८ च्या दुरुस्तीसाठी  - ७/१२ च्या एकूण आकारणी च्या प्रमाणात भोगवटदार यांच्या क्षेत्राच्या प्रमाणे विभागून देणे बाबत सुविधा देनेत येईल, सदय स्थितीत  ई-फेरफार आज्ञावली मधून  7/12 वरील क्षेत्र दुरुस्ती  फेरफार --> आकारणी दुरुस्ती या पर्यायाचा वापर करावा.
अहवाल ३९
चुकीच्या पद्धतीने भरलेली अपाक,ए.कु.मॅ नावांची खाती.
अहवाल ३९ च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ३९) चुकीच्या पध्दतीने भरलेली अपाक/ ए कु म ची नावे ही टोपण नावात भरावीत. जर अशी नवे दुसऱ्या ओळीत भरलेली असल्यास ई-फेरफार आज्ञावली मधून कलम १५५ च्या आदेशाने खाते दुरुस्ती फेरफार वापरून योग्य ती दुरुस्ती करावी.
अहवाल ४०
खातामास्टर मध्ये अतिरिक्त नावे  असलेल्या खात्यांची सर्व्हे क्रमांकनिहाय यादी.
अहवाल ४० च्या दुरुस्तीसाठी दुरुस्ती पर्याय क्रमांक ४०) खातामास्टर वरील अतिरिक्त नावे काढणे  हा पर्याय वापरावा 
अहवाल ४१
अहवाल 5- अतिरिक्त -(DSP प्रतिबंधित)
अहवाल निरंक करणेसाठी अहवाल ४१.१ ( अहवाल ५ - अतिरिक्त)   नुसार खातारजिस्टर व ७/१२ वरील स्थिती पाहून  दुरुस्ती सुविधा मधील 
पर्याय क्रमांक ४१.१)- अतिरिक्त  अहवाल 5 ची दुरुस्ती - पर्याय क्र.१ किंवा ४१.२)- अतिरिक्त  अहवाल 5 ची दुरुस्ती - पर्याय क्र.२-खाता विभागणी ४१.३)- अतिरिक्त अहवाल 5 ची दुरुस्ती - 
पर्याय क्र.३-खाता क्र.बदलने  किंवा ४१.४)- 
अतिरिक्त अहवाल 5 ची दुरुस्ती - पर्याय क्र.४-खाता क्र.बदलने (सर्व्हे क्रमांक निहाय वापरण्यात यावा)

Comments

Archive

Contact Form

Send