रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

गुजरात अभ्यास दौऱ्या बाबत

नमस्कार मित्रांनो ,


   गुजरात अभ्यास दौऱ्या बाबत 


                       मा. जमाबंदी आयुक्त महोदयांच्या निर्देशाप्रमाणे गुजरात राज्याचे महसूल सचिव व जमाबंदी आयुक्त / नोंदणी महानिरीक्षक यांचे अनुमतीने व गुजरात NIC च्या सहकार्याने आम्ही आपल्या NIC टीम सोबत दि ५ व ६ जुलै २०१९ रोजी गुजरात राज्याचा अभ्यास दौरा केला .

                                 या दौऱ्यात मी स्वतः , श्री समीर दातार  , श्री अनिल जोंधळे , श्री विश्राम चौसाळकर सर्व STD NIC यांचा  समवेश होता या दौऱ्याचा मुख्य उद्देश गुजरात राज्यात DILRMP अंतर्गत सुरु असलेल्या ७/१२ संगणकीकरणाच्या कामातील काही चांगल्या बाबी महाराष्ट्रात जनतेला चांगली गुणवत्तापूर्ण व तत्काळ सेवा देण्यासाठी शक्य आहे का ? तसेच तलाठी मंडळ अधिकारी व सर्व महसूल प्रशासनातील ऑनलाईन  कामात एकसूत्रीपणा व सुलभता कशी आणता येईल ? काही तांत्रिक गोष्टींच्या अडचणी सोडविण्यासाठी तेथील तंत्रज्ञांची मदत/ मार्गदर्शन  घेता येईल का ? हे प्रमुख उद्देश होते .

   या दौऱ्यात गुजरात NIC टीम सोबत TECHNICAL  DISCUSSION , महसूल व भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद तसेच महसूल चे तहसील कार्यालय , भूमी अभिलेख विभागाचे DILR व नगर भूमापन कार्यालय आणि नोंदणी विभागाचे SRO कार्यालयातील प्रत्यक्ष कामकाज पाहणे या बाबी समाविष्ट  होत्या .





    या दौर्यातून लक्षात आलेल्या काही चांगल्या बाबी शासन मान्यतेने व आदेशाने राज्यात लागू करता येतील असा मला विश्वास वाटतो  .

   आपण आपल्या  राज्यातील जनतेला अचूक ७/१२ खाते उतारे व तसेच जलद गतीने डिजिटल स्वाक्षरीत अधिकार अभिलेख उपलब्ध करून देण्यासाठी फायदा होईल हे मात्र नक्की


आपला

रामदास जगताप
दि ७.७.२०१९

 



Comments

Archive

Contact Form

Send