रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

अचूक ७/१२ व खाते उताऱ्या साठी कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्त्या ची कार्यवाही तातडीने करणे बाबत . (संदर्भ -परभणी येथील दुखद घटना )



नमस्कार मित्रांनो ,

            विषय - अचूक ७/१२ व खाते उताऱ्या साठी कलम १५५ च्या 

                        आदेशाने दुरुस्त्या ची कार्यवाही तातडीने करणे बाबत . 



                            काल दि २३.७.२०१९ रोजी एक दुखद घटना पाथरी जिल्हा परभणी येथे घडली असे कोणत्याही खातेदाराचे बाबतीत घडू नये हीच अपेक्षा .


१. कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्त्यांची ऑनलाईन सुविधा . 

              कोणत्याही कारणाने एखाद्या खातेदाराच्या ७/१२ मध्ये काही तृटी /चुका राहिल्या असल्यास त्याची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक आहे . जर कोणत्याही खातेदाराच्या हस्तलिखित ७/१२ मध्ये असलेला तपशील ( नाव , क्षेत्र , फेरफार नंबर , बोजा इत्यादी ) ऑनलाईन ७/१२ मध्ये आला नसल्यास कलम १५५ च्या तहसीलदार यांचे आदेशाने ७/१२ मधील दुरुस्ती परिशिष्ट क च्या ऑनलाईन पद्धतीने  मंजुरी देवून व आदेश स्वाक्षरीत करून दिल्यास तत्काळ दुरुस्त्या  करता येतात . परंतु त्यासाठी तलाठी , तहसीलदार व मंडळ  अधिकारी यांनी एकमेकांच्या समन्वयाने काम केल्यास तीन दिवसात सर्व कार्यवाही पूर्ण होऊ शकते मात्र त्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी खातेदार यांची अडचण ही आपली अडचण समजून काम केल्यास हे काम तात्काळ होऊ शकते . कोणत्याही खातेदाराला खरेदी विक्री सारखे नोंदणीकृत दस्त ,कर्ज प्रकरण , पीक विमा प्रस्ताव , DBT प्रस्ताव करण्यासाठी तातडीने काम करून दुरुस्त ७/१२ हवा असल्यास तलाठी यांनी अशा प्रकरणी अत्यंत अचूकरीत्या योग्य त्या दुरुस्त्या चा ऑनलाईन प्रस्ताव तलाठी यांनी करावा त्यावर परिशिष्ट क ला तहसीलदार यांची मान्यता मिळताच तलाठ्याने तत्काळ  फेरफार तयार करून परिशिष्ट क च्या कलम १५५ चे आदेशासाठी मान्यता देताना तहसीलदार यांचे या दुरुस्ती बाबत समाधान झाल्यास  विनासुनावणी कलम १५५ च्या दुरुस्त्यांचा आदेश स्वाक्षरीत करून द्यावा व त्याप्रमाणे मंडळ अधिकारी यांनी फेरफार मंजूर करावा .

           या मध्ये ऑनलाईन कलम १५५ च्या दुरुस्ती सुविधा मध्ये तलाठी यांनी पाठवलेली ऑनलाईन विनंती तहसीलदार यांनी ऑनलाईन मान्यता दिल्याशिवाय व त्याचा ऑनलाईन फेरफार तयार केल्या शिवाय त्या प्रकारातील अन्य कलम १५५ ची दुरुस्ती विनंती तलाठी यांना पाठवता येत नाही हे सर्व तहसीलदार यांनी माहित करून घ्यावे म्हणजेच तहसीलदार यांनी मान्यता दिल्याशिवाय पुढे कोणतेंही काम तलाठी अथवा मंडळ अधिकारी करू शकत नाही म्हणून तहसीलदार यांचे काम या मध्ये अत्यंत महत्वाचे आहे . 




२ . कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्त्यांची ऑफलाईन  सुविधा . 

         कोणत्याही खातेदाराचे संगणकीकृत ७/१२ मध्ये असलेली चूक ही मूळ हस्तलिखित ७/१२ मधेच होती असे दिसून आल्यास त्या साठी तहसीलदार यांनी कलम १५५ अंतर्गत सुनावणी घेवून आदेश काढणे आवश्यक आहे . अशा ऑफलाईन आदेशाची नोंद फेरफार द्वारे घेवून या चुका दुरुस्त करता येतात त्यासाठी ऑनलाइन कलम १५५ ची दुरुस्ती सुविधा वापरू नये . हस्तलिखित ७/१२ मध्ये असलेल्या चुका दुरुस्ती साठी विनासुनावणी कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्त्या करू नयेत त्यासाठी गरजे प्रमाणे सुनावणीची संधी देवून प्रसंगी उप विभागीय अधिकारी यांचे पुनरीक्षण / पुनर्विलोकन आदेश घेवून दुरुस्त्या कराव्यात ही विनंती . 

                   अचूक ७/१२ व खाते उताऱ्या साठी कलम १५५ च्या  आदेशाने दुरुस्त्या ची कार्यवाही करताना संवेदनशीलता व कर्तव्य भावनेने  तातडीने करणे आवश्यक आहे तरच परभणी सारख्या दुखद घटना पुन्हा घडणार नाहीत ह्याची सर्व महसूल अधिकारी यांनी नोंद घ्यावी . कामाची गुणवत्ता सर्वात महत्वाची आहे हे आपण सामान्य खातेदाराचा विचार करून संवेदनसिलता जपून काम करावे हीच अपेक्षा . 


रामदास जगताप 
दि २४.७.२०१९ 

Comments

  1. मा. सर खातेदारचे नाव हस्तलिखीत 7/12 आहे परंतु ऑनलाईन 7/12 वर आले नसल्यामुळे किंवा त्याचे नावास कंस पडल्यामुळे तो गट अहवाल 1 मध्ये गेला आहे, आता त्या गटात संबंधित खातेदाराचे नाव टाकणेसाठी चुक दुरुस्ती फेरफार किंवा खाता दुरुस्ती फेरफार चा वापर करतांना अगोदर अहवाल 1 ची दुरुस्ती करणेसाठी सांगीतले जाते. सदरील गट 155 अन्वये अहवाल 1 ची दुरुस्तीसाठी निवडला असता त्यात कंस पडलेल्या खातेदाराचे नाव निवडता येत नाही तेव्हा त्या खातेदाराचे नाव व‍ व त्याचे क्षेत्र टाकणे साठी अहवाल 1 मधील गट चुकदुरुस्ती किंवा खात दुरुस्ती साठी उपलब्ध करुन दिल्यास कंस पडलेल्या खातेदाराचे नाव व क्षेत्र सदरील गटावर टाकल्यास खातेदारचे नाव पण येईल व गटअहवाल 1 मधुन पन निघेल, या पुर्वी खातादुरुस्ती साठी अहवाल 1 मधील गट उपलब्ध होत होते, करीता विनंती कि सदरील सुविधा पुन्हा उपलब्ध करुन देण्यात यावी.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send