रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

महसूल दिन २०१९ साजरा करणे बाबत

नमस्कार मित्रांनो ,


विषय - महसूल दिन २०१९ साजरा करणे बाबत 



   प्रत्येक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्याला हवा हवासा वाटणारा व महसूल विभागाची अस्मिता असणारा महसूल दिन २०१९ साजरा करताना या वर्षी खालील गोष्टीचा समावेश करावा असे वाटते . 


महसूल वर्षाची सुरुवात होणारा पहिला दिवस म्हणजे १ ऑगस्ट हाच दिवस आपण महसूल दिन म्हणून साजरा करतो . आपण राज्यातील जनतेला अनेक महत्वपूर्ण सेवा महसूल विभागाच्या वतीने दररोज देतो त्या सेवा अजून चांगल्या पद्धतीने देण्यासाठी आपण सर्व महसूल अधिकारी व महसूल कर्मचारी यांचा महसूल परिवार नेहमी प्रयत्नशील राहतो . 


आपण महसूल विभागाच्या वतीने शेतकरी व बिगर शेतकरी खातेदारांसाठी ई महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेच्या मार्फत खालील ऑनलाईन सुविधा देत आहोत. त्या प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहोचविणे हे आपले काम आहे . 



१. विनास्वक्षारीत ७/१२ -
 https://bhulekh.mahabhumi.gov.in/
२. डिजिटल स्वाक्षरीत ७/१२-
 https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/Satbara
३. फेरफाराची सध्यस्थिती पाहण्यासाठी - https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/aaplichawdi
४. फेरफार  घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी -https://pdeigr.maharashtra.gov.in/
५. आपल्या जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी - https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/bhunaksha

६.शेतातील पिकांची नोंद ऑनलाईन पद्धतीने तलाठ्याकडे पाठविणे साठी - ई पीक पाहणी मोबाइल आप( फक्त बारामती , वाडा , दिंडोरी , फुलंब्री , अचलपूर व कामठी तालुक्यांसाठी पथदर्शी प्रकल्प ) 
                    ई फेरफार प्रकल्पामध्ये गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या तलाठी , मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार व तहसीलदार यांचे यांचा या निमित्ताने गौरव व्हावा अशी अपेक्षा आहे . ( ज्या गावात ODC अहवाल १ ते ४१ निरंक / सर्वात कमी आहेत व ९९% सातबारा डीजीतल स्वाक्षरीत  झाले असलेल्या गावाचे काम गुणवत्तापूर्ण झाले आहे असे समजावे . 
ज्या तलाठी मंडळ अधिकारी यांना LAPTOP व PRINTER चे वाटप केले नाहीत त्यांना तात्काळ त्याचे वितरण करावे .


 या ऑनलाईन सुविधा जनते पर्यंत पोहोचवाव्यात असे वाटते . 

महसूल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

आपला 

रामदास जगताप 
एक महसुली कार्यकर्ता 




Comments

Archive

Contact Form

Send