ऑनलाईन फेरफार अर्ज दाखल करणेसाठी “ ई हक्क ” प्रणाली चा वापर महसूल दिना पासून सुरु करणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
विषय – ऑनलाईन फेरफार अर्ज दाखल करणेसाठी “ ई हक्क ”
प्रणाली चा वापर सुरु करणे बाबत .
डिजिटल इंडिया भूमी अभिलेखांचे
आधुनिकीकरण
( DILRMP) अंतर्गत सध्या राज्यभर कार्यान्वित असलेल्या ई फेरफार
प्रकल्पाला पूरक एक नवीन प्रणाली जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या ई हक्क आज्ञावली नावाने ( PDE – Public Data Entry ) विकसित केली आहे . या प्रणाली
द्वारे कोणत्याही खातेदाराला / संबंधित व्यक्तीला तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या
हक्काच्या नोंदी ७/१२ वर फेरफार च्या स्वरुपात घेण्यासाठी जे अर्ज करावे लागतात ते
अर्ज ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात न जाता कोठूनही ऑनलाईन पद्धतीने दाखल करता
येतील . या मध्ये सध्या पहिल्या टप्प्यात आठ फेरफार प्रकारचे अर्ज दाखल करता येतील
अशी प्रणाली कार्यान्वित करणेत आली आहे . या प्रणालीचा वापर खातेदार यांचेसह
बॅंका , सहकारी सोसायट्या , पतसंस्था यांना देखील वापरता येईल .
ई-हक्क प्रणालीत समाविष्ट फेरफार प्रकार-
सध्या पहिल्या टप्प्यात पुढील आठ प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील .
१. वारस नोंद
२. बोजा / गहाणखत दाखल करणे
३. बोजा कमी करणे
४. ई करार नोंदी
५. मयताचे नाव कमी करणे
६. अज्ञानपालनकर्ता चे नाव ( अपाक ) कमी करणे
७. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे
८. विश्वास्थांचे नाव बदलणे
वरील पैकी बोजा दाखल करणे व बोजा कमी करणे या साठीचे अर्ज बँक / वित्तीय संस्था आणि ई करार चे फेरफार घेण्यासाठी चे अर्ज विविध कार्यकारी सोसायटी यांना व सर्व आठही प्रकारचे अर्ज खातेदाराला ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील.
अर्ज कोण करू शकेल ?-
त्यासाठी बँक प्रतिनिधी , सोसायटी चे सचिव व खातेदार यांना https://pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल व र्त्यासाठी आपले पूर्ण नाव , पत्ता , मोबाइल नंबर , ई मेल आय डी , PAN कार्ड नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल व आपला युजर आय डी व पासवर्ड एकदा तयार करावा लागेल . तयार केलेला युजर आय डी व पासवर्ड जतन करून ठेवावा लागेल व तो प्रत्येकवेळी लॉगीन करण्यासाठी वापरावा लागेल . कोणत्याही व्यक्तीने ऑनलाईन अर्ज दाखल करताच त्याला या ऑनलाईन अर्जाच्या प्रतीसह पोहोच त्याच्या अर्जाच्या संकेतांक क्रमांकासह ( Aplicatiopn ID) मिळेल. त्याचे आधारे अर्जदार संस्था / व्यक्तीला आपल्या अर्जाची स्थिती याच संकेत स्थावर आपल्या लॉगीनने DASHBOARD वर केंव्हाही पाहता येईल. अशा फेरफार प्रकारासाठी कोणती कागदपत्र जोडावी लागतील त्यांचे यादी देणेत आली असून ही कागदपत्रे स्कॅन करून ( स्वयं साक्षांकित प्रत ) अर्जा सोबत पीडीएफ स्वरुपात अपलोड करणे आवश्यक राहील .
अर्जाची सद्यस्थिती समजण्यासाठी -
प्रत्येक टप्प्यावर अर्ज स्वीकारला काय? , काय कारण देवून परत पाठवला आहे ? , फेरफार तयार केला का?, नोटीस काढली का? नोटीस बजावनेत आली का? फेरफार वर मुदतीत हरकत आली का? फेरफार मंजूर झाला का ? ऑनलाईन ७/१२ दुरुस्त झाला का ? अशा प्रत्येक टप्प्यावरअर्जाची स्थिती तपासता येईल तसेच काही टप्प्याची स्थिती चा मेसेज नोंदणीकृत मोबाईल वर देखील येईल . असा भरलेला अर्ज तलाठ्याकडे ऑनलाईन जाईल तो योग्य असल्याची खात्री करून तलाठी तो अर्ज स्वीकारील अथवा कारण देवून पुन्हा अर्जदाराकडे दुरुस्ती साठी पाठवेल किंवा कारण नमूद करून पुर्णतः नाकारील . या साठी प्रत्येकं अर्जदाराने या प्रणालीवर मोबाईल नंबर देवून नोंदणी करणे आवश्यक आहे.
ई हक्क ही प्रणाली ई फेरफार प्रणालीला पूरक असून त्यामधून केलेले सर्व अर्ज तलाठी यांना ई फेरफार मध्ये प्राप्त करून घेवून फेरफार मध्ये रुपांतरीत करता येणार आहेत त्यासाठी ही प्रणाली ई फेरफार प्रणाली शी संलग्न करणेत आलेली आहे. या मुळे या प्रणालीच्या वापरणे तलाठी यांचे कडील कामकाजात गतिमानता व पारदर्शकता येण्यास निश्चित मदत होणार आहे व तलाठी यांचे फेरफार घेण्याचे काम सुलभ होणार आहे.
विविध कार्यकारी सोसायटी चे सचिव व बँक प्रतिनिधी यांची बैठक -
ई हक्क प्रणालीचा सर्व स्थरावर योग्य वापर होण्यासाठी व या प्रणालीची माहिती सर्व विविध कार्यकारी सोसायटी चे सचिव व बँक प्रतिनिधी यांची बैठक तहसीलदार यांनी तालुका मुख्यालयाचे ठिकाणी दि .३१ जुलै ,२०१९ पूर्वी घ्यावी व त्यांना या प्रणालीच्या कामकाजाबद्दल , कार्यपद्धती बद्दल व तत्काळ वापार सुरु करणे बाबत माहिती द्यावी .
वरिष्ठ महसूल अधिकार्यांना देखील अशा सर्व अर्जांचा आढावा घेण्यासाठी MIS उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्यामुळे महसूल प्रशासनामध्ये पारदर्शकता गतिमानता येण्यास आणखी मदत होईल असा विश्वास आहे.
ई हक्क प्रणाली ( PDE) अंमलबजावणी दिनांक १ ऑगस्ट, २०१९ ( महसूल दिन ) पासून आपले जिल्ह्यात करणेत यावी. जनतेला या निमित्त एक चांगली ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार असलेने ह्यास व्यापक प्रशिद्धी देण्यात यावी.

आपला
दि २१.७.२०१९
मी
ReplyDeleteगोविंद शामराव चव्हाण
माझी शेती 2. 22हे. आर आहे पण 7/12उतार्याला फक्त 1. 37आहे बरोबर करण्यासाठी काय करावे लागेल मोठ्या. 9552506352
आदरणीय जगताप सर
ReplyDeleteपीक पाहणी कार्यक्रम सुरु झाला असून तालुका:-बार्शीटाकळी जिल्हा-अकोला येथे सर्व नं आहेत तरी O.D.C खातेदार यादी हि अनुक्रमे निघत नाही आहे कृपया खातेदार यादी अनु कर्मे निघेल आशी सुविधा उपलब्ध करून द्यावी हि विनंती
कृपय वरील वाक्या मध्ये O.D.C याऐवजी O.C.U वाचावे
Delete