रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे वगळता सर्व जिल्हे क्लाऊड वर स्थलांतरित .- महत्वाच्या सूचना
नमस्कार मित्रांनो ,
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे वगळता सर्व जिल्हे क्लाऊड वर स्थलांतरित .
दि ३१.५.२०१९ पासून पुणे व रायगड जिल्हे देखील क्लाऊड वर स्थलांतरित केले नंतर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे वगळता सर्व जिल्हे क्लाऊड वर स्थलांतरित झाले आहेत .
ऑनलाईन सुविधा -
या सर्व जिल्ह्यांना १. ई फेरफार . २. अभिलेख वितरण प्रणाली (DDM) , ३. ONLINE CROP UPDATION MODULE ( OCU) ४. घोषणापत्र ३ पूर्ण न झालेल्या तालुक्यांसाठी OCU PHASE 1 , ५. DSP , ६. ODC ७. ई हक्क (PDE) , ८. MIS या सुविधा वापरासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत
ऑनलाईन फेरफार नोंदी -
दररोज साधारणता ७००० अनोंदणीकृत फेरफार व १००० नोंदणीकृत दस्तांची माहिती या फेरफार प्रणाली मध्ये नोंदविली जात आहे .
तलाठी स्वाक्षरीचे ७/१२ व खाते उतारे -
सुमारे ३२ लक्ष अभिलेखांचे वितरण गेल्या तीन महिन्यात DDM मधून झाले आहे तर सुमारे ६५ लक्ष सातबारा डिजिटल स्वाक्षरीत करणेत आले आहेत . अजून देखील काही मोठ्या जिल्ह्यांना दुपारी ११.३० ते २.०० / ३.०० या कालावधीत सर्वर स्पीड कमी जाणवते मात्र त्यावर देखील मार्ग काढण्यात येत आहे . त्यासाठी REQUEST ७/१२ असा पर्याय देखील DDM मध्ये देनेत आला आहे .
१) mahaferfar.enlightcloud.com ही लिंक वापरून खालील १६ जिल्हे क्लाऊड वर कामकाज करतात
वाशीम , अहमदनगर , मुंबई उपनगर , औरंगाबाद , गोंदिया , लातूर , यवतमाळ , परभणी , उस्मानाबाद , बीड , नांदेड , नंदुरबार , धुळे , जळगाव , ठाणे व पुणे
२) mahaferfar1.enlightcloud.com ही लिंक वापरून खालील १५ जिल्हे क्लाऊड वर कामकाज करतात
पालघर , नागपूर , गडचिरोली , वर्धा , अमरावती , बुलढाणा , भंडारा , सोलापूर , सांगली , सातारा , कोल्हापूर , अकोला , हिंगोली , जालना व रायगड .
३ ) mahaferfarnas.enlightcloud.com ही लिंक वापरून नाशिक व चंद्रपूर हे दोन जिल्हे क्लाऊड वर कामकाज करत आहेत
विना स्वाक्षरीत ७/१२ -
महाभूलेख हे विनास्वक्षारीत ७/१२ पाहण्यासाठी चे संकेस्थळ देखील क्लाऊड वर स्थलांतरीत करणेत आले असून ते सध्या https://bhulekh.mahabhumi.gov.in या संकेत स्थळावर सुरु आहे
सध्या खातेदाराचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्यावर दररोज जास्तीत जास्त ६ सातबारा / खाते उतारे भूलेख व पाहता येतात .
ODC तील १ ते ४१ अहवाल निरंक करणे .
कोणत्याही तालुक्यात / जिल्ह्यातील गाव निहाय कामाची गुणवत्ता पाहण्यासाठी अथवा प्रलंबित अहवालातील काम पाहण्यासाठी odc मध्ये सुविधा उपलब्ध करून दिली आहे ते सध्या साय.६.०० ते सकाळी ८.०० या कालावधीत DBA यांना वापरता येईल तथापि ODC दुरुस्ती सुविधा दिवस भर वापरता येतील .ह्याच्या आधारे तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांनी आढावा घेणे अपेक्षित आहे .
प्रलंबित फेरफार -
आज रोजी सुमारे ११ लक्ष फेरफार विविध जिल्ह्यात निर्गत करण्यावर प्रलंबित आहेत असे MIS वरून दिसते . या बाबत तहसीलदार / उप विभागीय अधिकारी यांनी गाव निहाय आढावा घेणे अपेक्षित आहे व मुदत बाह्य झालेले सर्व फेरफार दि १५ जून पूर्वी निर्गत करून घ्यावेत .
कलम १५५ च्या आदेशाने दुरुस्त्या -
ज्या ७/१२ मधील ऑनलाईन कामात झालेल्या चुका अथवा डेटा एन्ट्री तील चुका दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन कलम १५५ च्या दुरुस्त्या सुविधा मध्ये तलाठी यांनी ऑनलाईन विनंती केली आहे त्यांना ऑनलाईन मान्यता तहसीलदार यांनी तत्काळ द्यावी व परिशिष्ट क चे आदेश स्वाक्षरीत करून द्यावेत तरच तलाठी व मंडळ अधिकारी यांना दुरुस्त्या करता येतील . हे कामकाज पूर्णतः तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष घालण्याचे काम आहे

आपला
रामदास जगताप
दि ५ जून ,२०१९
Comments