रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

क्षेत्र आर चौ मी मध्ये भरण्यासाठी / दुरुस्त करण्यासाठी क्षेत्र दुरुस्तीचा फेरफार घेण्याची कार्यपद्धती

नमस्कार मित्रांनो ,

क्षेत्र आर चौ मी मध्ये  भरण्यासाठी / दुरुस्त करण्यासाठी क्षेत्र दुरुस्तीचा फेरफार घेण्याची कार्यपद्धती कशी आहे?

                        हे अनेक तलाठी यांचे लक्षात आले नाही म्हणून पुन्हा खुलासा करतो कि ,

                    हस्तलिखित मध्ये बिन्शेतीचे ७/१२ चौ मी मध्ये लिहिण्याची पद्धत होती , ७/१२ चे संगणकीकरण करताना बिनशेती क्षेत्राचे ७/१२ स्वतंत्र करून त्याचे क्षेत्र आर चौ मी मध्ये भरावे असे निर्देश असताना देखील क्षेत्र होते तसेच चौ मी मध्ये भरले आहे त्यानंतर बिनशेती क्षेत्राचे ७/१२ चे एकक चुकीचे असलेला अहवाल निरंक करताना त्याचे एकक आर चौ मी केले परंतु क्षेत्र आर चौ मी मध्ये रुपांतरीत केले नाही म्हणजेच क्षेत्र चौ मी मध्ये व त्याचे एकक आर चौ मी झाले पर्यायाने असे सर्व ७/१२ चे क्षेत्र १०० पटीने वाढलेले दिसते हे योग्य नाही . म्हणून असे मोठ्या क्षेत्राचे ७/१२ ( ९९ आर पेक्षा जास्त ) हस्तांतरास प्रतिबंधित करणेत आले आहेत असे ७/१२ वरील क्षेत्र रुपांतरीत करण्यासाठी / दुरुस्त करण्यासाठी ची कार्यपद्धती सोबतच्या उजर मान्युअल मध्ये दिले आहे त्या प्रमाणे क्षेत्र दुरुस्तीचा फेरफार घेवून आपले जिल्ह्यातील / तालुक्यातील / गावातील असे ७/१२ दुरुस्त करावेत
आपला
रामदास जगताप
दि २०.५.२०१९ 

Comments

  1. सर ई-फेरफार प्रणाली मध्ये डाऊनलोड सेक्शनला सर्व प्रकारचे फेरफार कोणत्या प्रकारे घेण्यात यावे व प्रमाणित करावे यासाठी मार्गदर्शिका देण्यात याव्या जेणेकरून सर्व तलाठी बांधवाना व मंडळ अधिकारी यांना त्यासंबंधी पुरेपुर मार्गदर्शन मिळेल व कामाला गती सुद्धा प्राप्त होईल. त्याचप्रमाणे software मध्ये काही नवीन बदल केले असतील तर ते सुद्धा मेनु सेक्शनला त्यासंबधी मार्गदर्शिका देण्यात यावे.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send