रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ऑनलाईन दस्त नोंदणी केल्या नंतर लगेच मिळणार फेरफार क्रमांक - क्लाऊड वरील जिल्ह्यांना सुविधा सुरु केली

नमस्कार मित्रांनो  ,
 ESDS CLOUD वरील जिल्ह्यांसाठी दोन दिवसापासून ई फेरफार प्रणाली ( आवृत्ती २.२)  मध्ये दिलेल्या नवीन सुविधांमध्ये जर दुय्यम निबंधक यांनी ७/१२ चा डेटा घेवून दस्त नोंदणी केली असेल तर त्याचवेळी  तत्काळ त्या दस्ताच्या ७/१२ वरील नोंदीसाठी फेरफार क्रमांक दिला जातो आहे व सदरची माहिती फेरफार क्रमांकासह तलाठी लोगिन ला पाठवली जातो व त्यापुढील फेरफार क्रमांक पुढील नोंदीला पडतो अशी सुविधा देनेत आली आहे. त्याचवेळी तश्या अर्थाचा मेसेज संबंधित पक्षकारांना पाठविला जातो आहे त्यामुळे आत्ता ऑनलाईन दस्त नोंदणी केलेल्या पक्षकारांना फेरफारासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही . त्यामुळे तलाठी यांनी त्या दस्तांचे फेरफार तयार केल्याशिवाय ते क्रमांक DASHBOARD वर पुढील कार्यवाहीसाठी  दिसणार नाहीत ह्याची नोंद घ्यावी . तथापि तलाठी संबंधितांना गरजे प्रमाणे नोटीस काढून पुढील प्रक्रिया करणार .
        त्यामुळे क्लाऊड वरील जिल्ह्यांतील   दुय्यम निबंधक यांनी शक्यतो SKIP पर्याय वापरू नये . सदरच्या अ सर्व तलाठी मंडळ अधिकारी  क व जनतेच्या निदर्शनास आणाव्यात ही विनंती .
आपला
रामदास जगताप
दि.१२ ४.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send