रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

अहमदनगर व मुंबई उपनगर जिल्हे झाले क्लाऊड वर सुरु दि १५.४.२०१९


नमस्कार मित्रांनो , 

    अहमदनगर व मुंबई उपनगर जिल्हे झाले क्लाऊड वर सुरु दि १५.४.२०१९ 


  आज दिनांक १५.४.२०१९ पासून आणखी दोन जिल्हे ESDS CLOUD डेटा सेंटर वर स्थलांतरीत करून तेथे सुरु करणेत आले हे दोन्ही जिल्हे https://mahaferfar.enlightcloud.com  ही URL वापरून सर्व वापरकर्ते यांना कामकाज सुरु करता येईल . 


    अहमदनगर व मुंबई उपनगर या दोन्ही  जिल्ह्यातील सर्व वापरकर्ते  आज पासून खालील प्रायवेट URL वापरता येईल 
https://mahaferfar.enlightcloud.com 

  ही URL  वापरून " ई फेरफार" प्रणालीत VPN / FORTICLIENT न वापरता काम करू शकणार आहात . 
या साठी डी डी ई   अहमदनगर व मुंबई उपनगर   यांचे मेल वर दि १४.४.२०१९  रोजी पाठवलेले वापरकर्ते यांचे  पासवर्ड वापरून व मोबाईलवर येणारा OTP वापरून लॉगीन करू शकतो , त्या नंतर तलाठी मंडळ अधिकारी यांना दिसणारी eferfar2beta ही url वापरून व आपले नेहमीचे सेवार्थ आय डी व पासवर्ड आणि DSC वापरून ई फेरफार प्रणाली च्या LANDING PAGE वर लॉगीन करू शकता . त्यानंतर ई फेरफार मोडूल निवडून काम सुरु करू शकता . 
 आज पासून  फक्त ई फेरफार  , PDE / ई हक्क , UC ,DDM,OCU  मधेच काम करता येईल 

सुरुवातीला काही अडचणी येवू शकतात त्या तत्काळ मास्टर ट्रेनर्स , हेल्प डेस्क , DBA , DIO यांचे निदर्शनास आणाव्यात . 


    अहमदनगर व मुंबई उपनगर या  जिल्ह्यातील  सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी रात्रीचा दिवस करून केलेलं ७/१२ संगणकीकरण चे काम आता प्रत्यक्षात अधिक चागली सेवा राज्यातील जनतेला देण्यासाठी फलद्रूप झालेले दिसेल अशी अपेक्षा आहे . 

               मुंबई उपनगर    जिल्हा राज्यातील क्लावूड वर जाणारा अकरावा  जिल्हा ठरला आहे सबब RDC & DDE     मुंबई उपनगर  श्री .सर्जेराव सोनावणे    व तत्कालीन डी डी ई श्री मल्लिकार्जुन माने साहेब  , मास्टर ट्रेनर  ,     तहसीलदार  तसेच  NIC PUNE TEAM , MY HELP DESK TEAM व जिल्हाधिकारी  व अप्पर जिल्हाधिकारी  ठाणे  यांचे मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद .

अहमदनगर  जिल्हा राज्यातील क्लावूड वर जाणारा बारावा  जिल्हा ठरला आहे सबब RDC & DDE     अहमदनगर  श्री .उदय किसवे     व तत्कालीन डी डी ई श्री संदीप आहेर   , मास्टर ट्रेनर  ,     तहसीलदार  तसेच  NIC PUNE TEAM , MY HELP DESK TEAM व जिल्हाधिकारी  व अप्पर जिल्हाधिकारी अहमदनगर   यांचे मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद .

       GCC CLOUD MIGRATION नंतर        अहमदनगर व मुंबई उपनगर या  मधील  सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना होणारा मानसिक त्रास निश्चित कमी होईल असा मला विश्वास  आहे . 

         राज्यातील सामान्य जनतेला एक चांगली सुविधा देण्यासाठी च्या महसूल विभागाच्या या प्रकल्पासाठी  आपले योगदान देणाऱ्या माझ्या सर्व सहकारी महसूल अधिकारी , DIO , सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना मनपूर्वक धन्यवाद . 


आपला 
रामदास जगताप 
दि १५.४.२-२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send