ऑनलाईन केलेले नोंदणीकृत दस्तांचे फेरफार नोंदणीसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन केलेल्या नोंदणीकृत दस्तांचे फेरफार नोंदणीसाठी
खातेदार यांना कलम 149 अन्वये पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही.
महत्वाची सूचना -
राज्यात अधिकार अभिलेखात फेरफार घेण्याची प्रक्रिया ही महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम,
1966चे कलम
147 ते
159 मधील तरतुदीनुसार करण्यात येते. सदर तरतुदींमधील कलम
149 अन्वये अधिकार संपादन केल्याचे प्रतिवृत्त देण्याबाबत पुढील
प्रमाणे तरतुद आहे.
“त्यानुसार जमीन धारण करणारा,
भोगवटा करणारा,
मालक,
जमीन गहाण ठेवून घेणारा,
जमीन मालक,
शासकीय पट्टेदार किंवा राज्यातील कोणत्याही क्षेत्रामध्ये असलेल्या जमीनीचे कूळ म्हणुन किंवा तिच्या खंडाचा किंवा महसुलाचा अभिहस्तांकिती म्हणुन कोणताही अधिकार उत्तराधिकाराने अनुजीविताधिकाराने,
वारसा हक्काने,
विभागणीने,
खरेदीने,
गहाणाने,
देणगीने,
पट्टयाने किेंवा अन्य रितीने सपादन करणारी कोणतीही व्यक्ती असा अधिकार तिने संपादन केल्याबद्दल असा अधिकार संपादन केल्याच्या तारखेपासुन तीन महिन्यांच्या आत तलाठयास तोंडी अथवा लेखी कळवील”.
तसेच दस्तनोंदणीची प्रक्रिया झाल्यावर महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम
1966 चे कलम
154 अन्वये कोणताही दस्ताऐवज भारतीय नोंदणी अधिनियम
1908 अन्वये नोंदविण्यात आला असेल तेंव्हा अशा दस्ताऐवजांची नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याने ज्या गावामध्ये जमीन असेल त्या गावच्या तलाठ्यास किंवा त्या तालुक्याच्या तहसिलदारास या अधिनियमान्वये करण्यात आलेल्या नियमाद्वारे विहीत करण्यात येईल अशा नमुन्यात आणि विहित करण्यात येईल अशी वेळ, त्याबाबत कळविली अशी तरतुद आहे. अशाप्रकारे नोंदीसाठी प्रतिवृत्त प्राप्त झाल्यावर तलाठी यांचेकडुन फेरफार नोंदीची प्रक्रिया सुरु केली जात होती.
सद्यस्थितीत राज्यात डिजीटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम
(DILRMP) अंतर्गत ई-फेरफार आज्ञावलीची अंमलबजावणी सन
2015 पासून सुरु करण्यात आली असून, सदर आज्ञावलीमध्ये फेरफार प्रक्रियेचे संगणकीकरण करण्यात आले आहे. सदरची आज्ञावलीचेनोंदणी महानिरीक्षक कार्यालयाच्या
i-SARITA आज्ञावलीसोबत जोडणी
(Linkage) करण्यात आले आहे.
नोंदणी विभागाच्या
i-SARITA आज्ञावलीकडुन दस्त नोंदणी झाल्यावर नोंदणीकृत दस्ताचा डाटा ई-फेरफार आज्ञावलीत तलाठी लॉगीनला ऑनलाईन प्राप्त होत असल्याने सदरची माहिती ही कलम
149 अन्वये हक्क संपादनाचे प्रतिवृत्त समजण्यात यावे व याबाबत संबंधित खातेदार यांना फेरफार नोंदणीसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही.
व्यावसायिक सुलभता
( Ease of Doing Business) च्या अनुषंगाने जनतेला शासकिय कार्यालयाकडून तत्परतेने गतीमान सेवा मिळावी म्हणुन गा.
न. नं.
7/12 मध्ये घेण्यात येणाऱ्या फेरफाराबाबत
खालीलप्रमाणे कार्यवाही
करण्यात यावी.
i) दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणी विभागाच्या
i-SARITA आज्ञावलीकडुन दस्त नोंदणी झाल्यावर नोंदणीकृत दस्ताचा डाटा ई-फेरफार आज्ञावलीत तलाठी लॉगीनला ऑनलाईन प्राप्त होणार आहे.
नोदणीकृत दस्तान्वये प्राप्त
i-SARITA आज्ञावलीतून ऑनलाईन प्राप्त हक्क संपादनाचे प्रतिवृत्त बाबत सर्वसाधारण प्रकरणी कोणत्याही खातेदाराला कार्यालयात कागदपत्रे घेऊन बोलविण्याची आवश्यकता नाही.
ii)
दुय्यम निबंधक कार्यालयातील i- Sarita या आज्ञावलीतून दस्त नोंदणी झाल्यावर नोंदणीकृत दस्ताचा डाटा ई-फेरफार आज्ञावलीत तलाठी लॉगीनला ऑनलाईन प्राप्त होणारआहे.
त्यामुळे संबंधीत तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांनी आज्ञावलीवरनियमीतलक्ष ठेवावे.
iii) तलाठी लॉगीनला ऑनलाईन प्राप्त होणाऱ्या
माहीतीच्या
(हक्क संपादनाचे प्रतिवृत्त )अनुषंगाने
संबंधित कार्यक्षेत्रातील
तलाठी यांनी
तात्काळ फेरफार
प्रक्रीया सुरू
करावी.
iV)सदर कार्यप्रणालीवर
नायब तहसिलदार
यांनी देखरेख
ठेवावी. तसेच
तहसिलदार यांनी
आज्ञावलीतून
प्राप्त होणाऱ्या
MIS च्या आधारे दर
आठवड्याला आवक
झालेली प्रकरणे,
फेरफार झालेली
प्रकरणे तसेच
शिल्लक प्रकरणांचा
आढावा घेण्याची कार्यवाही
करावी.
vi) संबंधित
कार्यप्रणालीबाबत
उपविभागीय अधिकारी
यांनी पंधरवड्यांनी
तसेच जिल्हाधिकारी
व विभागीय
आयुक्त यांनी
मासिक बैठकीत
आढावा घेण्याचे
आहे.
vii)जमाबंदी
आयुक्त आणि
संचालक भूमि
अभिलेख (म.
राज्य) पुणे
तसेच नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे यांनी
सदर कामकाजावर
प्रभावी नियंत्रण
ठेवण्याचे आहे.
viii)
तलाठी तसेच
मंडळ अधिकारी
यांनी फेरफार घेण्याबाबत
नियमाप्रमाणे
कार्यपद्धतीचा अवलंब
करण्यात यावा
व अशा
बाबतीतील कार्यवाही
30 दिवसांत पूर्ण
होईल याकडे
विशेष लक्ष
द्यावे.
आपला
रामदास जगताप
दि २९.३.2019
आपला
रामदास जगताप
दि २९.३.2019
सर, नोंदणी केलेल्या दस्ताची फेरफार करण्यासाठी तलाठीकडे पन्नास वेळा हेलपाटे मारण्याची खातेदाराची तयारी असते. पण तुमचा सर्व्हर डाऊन मुळे दस्त नोंदणी साठी दुसरा हेलपाटे मारणे हे अतिशय अवघड काम आहे. कारण एका दस्तऐवज साठी कमीत कमी सहा व्यक्ती एकमेकाची वेळ सांभाळून एकदा येणे हीच मुळात कसरत आहे. त्यामुळे गेली दोन तीन वर्षे वकील म्हणुन मला वैयक्तीक व पक्षकारची ससेहोलपट पाहून उद्विग्न पणे नमूद करावे लागेल की नोंदणी केलेल्या दस्ताची फेरफार साठी पुन्हा अर्ज करावा लागणार नाही याबद्दल सध्या तरी कोणी आपली पाठ थोपटून घेऊ नये तसा नैतिक अधिकार तसा दावा करणाऱ्यांना नाही.
ReplyDelete