प्रतिबंधित सत्ता प्रकाराने धारण केलेल्या मिळकतींचे ७/१२ चे ईतर हक्कात शेरा दर्शविणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
विषय:- प्रतिबंधित सत्ता प्रकाराने धारण केलेल्या मिळकतींचे ७/१२ चे ईतर हक्कात शेरा दर्शविणे बाबत
शासनाचे दिनांक 17/03/2012 चे परिपत्रकाप्रमाणे गा.न.नं. १ क मध्ये सुधारणा करण्यात येऊन धारण जमीनीच्या हस्तांतरणावरील निर्बंध विचारात घेवुन त्याचे १ ते १४ असे पोट विभाग करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे हस्तलिखीत गा.न.नं. १(क)तयार करुन वापरात आणला असेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर 7/12 संगणकीकरणामध्ये देखील गा.न.नं. १(क) मधील भोगवटादार वर्ग- २ ने धारण केलेल्या मिळकतीच्या आणि गा.न.नं. १(क) मध्ये नसलेल्या परंतु वर्ग १ ने धारण केलेल्या मुळच्या आदिवासींच्या जमिनी व वर्ग १ ने धारण केलेल्या कुल कायदा कलम ६३ (१) (अ) प्रमाणे खऱ्याखुऱ्या औदोगिककारणासाठी खरेदी केलेल्या मात्र हस्तांतरणावर निर्बंध असलेल्या मिळकती तसेच सरकार व सरकारी पट्टेदार म्हणून धारण केलेल्या मिळकतींचे हस्तांतरण दस्त नोंदणीसाठी व हस्तांतरणाचे संबंधी फेरफार घेण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहेत.
1. भोगवटादार वर्ग १ ने धारण केलेल्या जमिनी
उप प्रकार -1 आदिवाशी खातेदार ची वर्ग १ ची जमीन
उप प्रकार -2 मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ६३अ -१ च्या
तरतुदीप्रमाणे खरेदी केलेल्या जमिनी
२ भोगवटादार वर्ग २ ने धारण केलेल्या जमिनी
उप प्रकार 1 कुळ कायदाच्या जमीनी (१)
उप प्रकार 2 इनाम व वतन जमीनी (देवस्थान वगळुण) (२)
उप प्रकार 3 भुमीहीन/शेतमजुर/स्वातंत्र सैनीकयांना वाटप जमीनी (३)
उप प्रकार 4 गृह निर्माण संस्था/औदोगीक आस्थापना/शैक्षणीक संस्था यांना वाटप जमीनी (४)
उप प्रकार 5 कायद्या अंतर्गत वाटप जमीनी/शेत जमीन कमाल धारणा (५)
उप प्रकार 6 म.न.पा/न.पा/प्राधीकरण/ग्रा.पा.कडे वर्ग जमीनी (६)
उप प्रकार 7 देवस्थान इनाम जमीनी (७)
उप प्रकार 8 आदीवासी खातेदारांच्या जमीनी (८)
उप प्रकार 9 पुर्नवसन कायद्या अंतर्गत वाटप जमीनी (९)
उप प्रकार 10 भाडे पट्ट्याने दिलेल्या शासकीय जमीनी (१०)
उप प्रकार 11 भुदाण व ग्रामदाण अंतर्गत दिलेल्या जमीनी (११)
उप प्रकार 12 वन व सिलिंग कायदा अंतर्गत चौकशीवर प्रलंबित जमीनी (१२)
उप प्रकार 13 भुमीधारी हक्काने प्रापत झालेल्या जमीनी (१३)
उप प्रकार 14 सिलिंग कायदया अंतर्गत सुट दिलेल्या जमीनी (१४)
२. सरकार भूधारणा असलेल्या जमिनी
३. सरकारी पट्टेदार म्हणून धारण केलेल्या जमिनी
राज्यात सध्या सुरु असलेल्या ई फेरफार प्रणालीतुन वरीलप्रमाणे सर्व नियंत्रित सत्ताप्रकाराच्या जमीनी वरील
जमीनीच्याहस्तांतरणावर नियंत्रण ठेवलेले आहे. त्याबाबतची कार्यपध्दती कशी असावी याबाबत खालील
प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.
१. चावडी वाचनाच्या वेळी प्रत्येक गावासाठी नियुक्त केलेल्या महसूल पालक अधिकाऱ्याने तहसिलदार
यांनी प्रमाणीतकेलेला गा.न.नं. १(क) (सुधारीत) प्रमाणे सर्व नोंदी संगणकीकृत 7/12 मध्ये घेण्यात आल्याचे संगणकीकृत गा.न.नं. १(क) तपासुन प्रमाणित करणे आवश्यक आहे.
२. वरील प्रमाणे जमीन हस्तांतरणावर निर्बंध असलेल्या सरकार , सरकारी पट्टेदार म्हणून धारण
केलेल्या गा.न.नं. १(क) मधीलसर्व वर्ग- २च्या मिळकती व भोगवटा वर्ग १ असलेल्या मिळकतीपैकी आदिवासी खातेदाराने धारण केलेले वर्ग१ च्यामिळकती आणि कुळकायदा कलम 63(१अ) अन्वये खऱ्याखुऱ्याऔदयोगिककारणासाठी धारण केलेल्या/खरेदी केलेल्यामिळकती दुय्यम निबंधक यांचेकडे दस्त नोंदणीसाठी प्रतिबंधीत करण्यात आल्या आहेत. अशा 7/12 वर सदरची मिळकत “प्रतिबंधीत सत्ताप्रकार ” मध्ये असेलेले दस्त नोंदण्यासाठी जिल्हा स्थरावर उप जिल्हाधिकारी अथवा तालुका स्थरावर तहसीलदार यांचेशी संपर्क साधावा असा मेसेज आल्यास संबंधीत दुय्यम निबंधक यांनी संभाव्य खरेदी करणार / विक्री करणार यांनातहसिलदार यांचेशी संपर्क साधणेबाबत कळवावे. अशा बाबतील सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी पाहून अथवा शेती कारणासाठी हस्तांतर करणेसाठी अथवा जमीन तारण ठेवण्यासाठी परवानगीची गरज नाही ह्याची खात्री करून उपजिल्हाधिकारी तथा डीडीई / तहसिलदार हस्तांतरणासाठी सदरचा सर्व्हे नं./ गट नं. आज्ञावलीतुन युजर क्रेयेशन (UC) मधून आपल्या Biometric लॉगीनने UNBLOCK करून देतील.
याबाबतची नोंदवही दिनांक 10/03/2016 चे परिपत्रकात नमुद केल्याप्रमाणे असेल जिल्हा स्थरावर व
व तालुका स्थरावर ठेवणेत यावी..
३. विभागीय आयुक्त व जिल्हा स्थरावर हस्तांतर परवानगी अथवा तारण देण्यासाठीची परवानगी आदेश
दिलेल्या सर्व जमिनीचे सर्वे नं / गट नं चे आदेश पाहून संबंधित जिल्ह्याचे उप जिल्हाधिकारी तथा डी डी ई यांनी तात्काळ unblock करून द्यावेत व त्याच्या नोंदी नोंदवहीत ठेवाव्यात .
४. उप विभागीय अधिकारी व तालुका स्थरावर हस्तांतर परवानगी अथवा तारण देण्यासाठीची परवानगी
आदेश दिलेल्या सर्व जमिनीचे सर्वे नं / गट नं चे आदेश पाहून संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी तत्काळ
unblock करून द्यावेत व त्याच्या नोंदी नोंदवहीत ठेवाव्यात. ज्या ठिकाणी आशय आदेशाची गरज नाही त्याची खात्री करून तहसीलदार तो सर्वे न / गट नं unblock करून देतील व तशी नोंद नोंदवहीत ठेवतील .
५. जमीन हस्तांतरणावर निर्बंध असणाऱ्या मिळकतींच्या हस्तांतरणासाठी परवानगी देण्यास सक्षम असले
ल्या अधिकाऱ्यानेपरवानगी आदेश देताना त्याची आदेशाची प्रत संबंधीत उपजिल्हाधिकारी / तहसिलदार व संबंधीत दुय्यम निबंधक यांनीप्रतीलीपीत करावी. तसेच उपजिल्हाधिकारी/ तहसिलदार यांना या आदेशा
प्रमाणे हस्तांतरणासाठी हा सर्व्हे नंबर / गट नंबर ईफेरफार प्रणालीतुन UNBLOCK करणेबाबत निर्देश द्यावेत. असा UNBLOCK केलेला सर्व्हे नंबर / गट नंबर एका दस्त नोंदणी अथवा फेरफार घेईपर्यंतच
unblock राहील. त्यानंतर असा गट / सर्वे नं पुन्हा block होईल . या मुळे नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केलेल्या जमिनींचे विनापरवाना हस्तांतर व शर्तभंग होण्यास प्रतिबंध बसेल . अशा पद्धतीने सर्वे नं / गट नं unblock केला तरी फेरफार मंजूर करताना आशय परवानगी आदेशाची खात्री करूनच मंडळ अधिकारी यांनी फेरफार निर्गत करावेत .
या प्रमाणे नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण जमीन निश्चित कोणत्या प्रवर्गात / उप प्रकारात मोडते आहे हे ७/१२ वाचताना लक्षात यावे / समजावे म्हणून खालील प्रमाणे उचित धेरा ७/१२ चे ईतर हक्कात दर्शविण्यात सुरुवात करणेत आली आहे . या मध्ये काही चुकीचे शेरे आपले निदर्शनास आल्यास भूधारणा व त्याचा उपप्रकार बदलण्याची उचित कार्यवाही आपण करावी .
६. सदरच्या सूचना सर्व तलाठी मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार , तहसीलदार , उप विभागीय
अधिकारी , डी डी ई व परवानगी देण्यासाठी सक्षम अधिकारी यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती

1
|
भोगवटादार वर्ग - 1
|
आदिवाशी खातेदार ची वर्ग १ ची जमीन
|
म. ज. म. अधिनियम १९६६ च्या कलम ३६ व
३६ अ ला अधीन
|
2
|
भोगवटादार वर्ग - 1
|
मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम
१९४८ चे कलम ६३अ -१ च्या तरतुदीप्रमाणे खरेदी केलेल्या जमिनी
|
कुळकायदा कलम ६३अ -१ च्या तरतुदीस
अधीन खरेदी- विक्रीस प्रतिबंध
|
3
|
भोगवटादार वर्ग - 2
|
मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे
कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिन
|
सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय
हस्तांतरास बंदी - कुळ कायद्याने
प्राप्त जमीन
|
4
|
भोगवटादार वर्ग - 2
|
वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी (देवस्तान जमिनी
वगळून)
|
सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय
हस्तांतरास बंदी - इनाम व वतन जमीनी (देवस्थान वगळुन)
|
5
|
भोगवटादार वर्ग - 2
|
महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत
विविध योजने अंतर्गत प्रदान/ अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या जमिनी (भूमिहीन, शेतमजुर, स्वातंत्र्य सैनिक
इ.)
|
सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय
हस्तांतरास बंदी - भुमीहीन/शेतमजुर/स्वातंत्र सैनीक यांना वाटप जमीन
|
6
|
भोगवटादार वर्ग - 2
|
महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत
विविध योजने अंतर्गत प्रदान/ आतिक्रमण नियमांनुकूल केलेल्या जमिनी (गृह निर्माण
संस्था, औद्यागिक आस्थापना, शैक्षणिक संस्था, विशेष वसाहत प्रकल्प इ.)
|
सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय
हस्तांतरास बंदी - गृह निर्माण संस्था/औदोगीक आस्थापना/शैक्षणीक संस्था यांना
वाटप जमीन
|
7
|
भोगवटादार वर्ग - 2
|
महाराष्ट्र शेत जमिन कमाल धारणा अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप
केलेल्या जमिनी
|
सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय
हस्तांतरास बंदी - सीलिंग कायद्या अंतर्गत वाटप जमीन
|
8
|
भोगवटादार वर्ग - 2
|
महानगरपालिका, नगरपालिका व विविध प्राधिकारण यांच्या विकास
आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी अथवा ग्रामपंचायतीकडे गुरचरण अथवा इतर
प्रयोजनासाठी वर्ग केलेल्या जमिनी
|
सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय
हस्तांतरास बंदी - म.न.पा/न.पा/प्राधीकरण/ग्रा.पा.कडे वर्ग जमीन
|
9
|
भोगवटादार वर्ग - 2
|
देवस्थान इनाम जमिनी
|
सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय
हस्तांतरास बंदी - देवस्थान इनाम जमीन
|
10
|
भोगवटादार वर्ग - 2
|
आदिवासी खातेदारांचा जमिनी, महाराष्ट्र जमिनी
महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम ३६ अ प्रमाणे
|
सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय
हस्तांतरास बंदी - आदीवासी खातेदारांच्या जमीन - महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम
१९६६ चे कलम ३६ अ प्रमाणे
|
11
|
भोगवटादार वर्ग - 2
|
महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम, १९९९ च्या कलम १६
अन्वये प्रदान केलेल्या जमिनी
|
सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय
हस्तांतरास बंदी - पुर्नवसन कायद्या
अंतर्गत वाटप जमीन- जमीन प्रदान केल्याच्या दिनांका पासून दहा वर्षा पर्यंत
हस्तांतारणास बंदी.
|
12
|
भोगवटादार वर्ग - 2
|
भाडेपट्याने दिलेल्या शासकीय जमिनी
|
सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय
हस्तांतरास बंदी - भाडे पट्ट्याने दिलेल्या शासकीय जमीन
|
13
|
भोगवटादार वर्ग - 2
|
भूदान व ग्रामदान अंतर्गत दिलेल्या जमिनी
|
सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय
हस्तांतरास बंदी - भुदान व ग्रामदान अंतर्गत दिलेल्या जमीन
|
14
|
भोगवटादार वर्ग - 2
|
महाराष्ट्र खाजगी वने(संपादन) अधिनियम, १९६१ अन्वये
चौकशीसाठी प्रलंबित असलेल्या जमिनी
|
सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय
हस्तांतरास बंदी - खाजगी वने कायदा अथवा सिलिंग कायदा अंतर्गत चौकशीवर प्रलंबित
जमीन
|
15
|
भोगवटादार वर्ग - 2
|
भूमिधारी हक्कान्वये
|
सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय
हस्तांतरास बंदी - भुमीधारी हक्काने प्राप्त झालेली जमीन
|
16
|
भोगवटादार वर्ग - 2
|
महाराष्ट्र शेतजमीन (जमिन धरणेची कमाल मर्यादा)
अधिनियम, १९६१ अंतर्गत कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या
जमिनी
|
सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय
हस्तांतरास बंदी - सिलिंग कायदया अंतर्गत सुट दिलेल्या जमीन
|
६. सदरच्या सूचना सर्व तलाठी मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार , तहसीलदार , उप विभागीय
अधिकारी , डी डी ई व परवानगी देण्यासाठी सक्षम अधिकारी यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती
ईतर हक्कात झालेल्या बादल कसा दुरूस्त करायचे, आधी उप प्रकार 3 भुमीहीन/शेतमजुर/स्वातंत्र सैनीकयांना वाटप जमीनी (३) ही नोंद ७/१२ मधये नसायची व ती आता नोंद होत्या, आमच्या खंडणीत कोणी( सैनीक ) नाही तर ही नोंद ७/१२ मधी कशी याइल , व उप प्रकार चा अर्थ काय. कळवावे
ReplyDeleteसर नमस्कार,
ReplyDeleteमी एक शेत १.०८ हेक्टर विकत घेतले आहे. परवानगीसाठी जिल्हाधिकारी कडे प्रकरण टाकले आहे. ५० टक्के नजराणा भरून भोगवटदार १ करता येईल काय? कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती. हि जमीन १९७९ शिलिंग मध्ये जमा होऊन वाटप केली आहे.
सर सातबारा वर ईतर आधिकारवर कुळकायदा कलम 63अ1नूसार खरेदी विकरी स प्रतीबंध असे लिहुन आले कशामुळे ते सांगा
ReplyDeleteमहाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत विविध योजने अंतर्गत प्रदान/ आतिक्रमण नियमांनुकूल केलेल्या जमिनी (गृह निर्माण संस्था, औद्यागिक आस्थापना, शैक्षणिक संस्था, विशेष वसाहत प्रकल्प इ.
ReplyDeleteसक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - गृह निर्माण संस्था/औदोगीक आस्थापना/शैक्षणीक संस्था यांना वाटप जमीन
सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - गृह निर्माण संस्था/औदोगीक आस्थापना/शैक्षणीक संस्था यांना वाटप.7/12 वर् आला आहे हा ७/१२ वर् प्रिंट आहे अगोदर हा प्रिंट न्हाई 26/11/2021 pasun ha print ahe ty ka aley ahe plz sanga
ReplyDelete