रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांसाठी उत्तम साधन

जाहीर अवाहन -     


   ई पीक पाहणी मोबाईल APP शेतकऱ्यांसाठी उत्तम साधन 




 शेतकरी बंधू – भगिनींनो नमस्कार,

       गांव नमुना ७/१२चा उतारा हा आपल्या शेती संबंधी अतिशय महत्वाचा असा महसुली दस्ताऐवज आहे.

 या उताऱ्या मध्ये ७ आणि १२ अशा प्रकारचे दोन भाग असून पहिल्या भागामध्ये आपल्या शेत जमिनीच्या अधिकारा बाबतची माहिती आणि दुसऱ्या भागामध्ये आपण शेता मध्ये घेतलेल्या हंगाम निहाय पीक पेरणीची माहिती दिलेली असते.

 या पीक पेरणीची माहिती आपल्या गांवातील तलाठ्याकडून दरवर्षी ७/१२ उताऱ्या मधील १२ क्रमांकच्या प्रपत्रात भरण्यात येते, परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे पीक पेरणीची माहिती अचूक पणे, योग्य वेळी भरल्या जात नाही, त्यामुळे आपल्या गांवांमध्ये खरिप, रबी आणि उन्हाळी या शेतीच्या हंगामा मध्ये कोणती पिके किती क्षेत्रात घेण्यात आली याची अचूक माहिती शासनाकडे सादर होत नाही.

 याचा विपरीत परिणाम शासनाकडून शेतीविकासासाठी आणि शेतकरी कल्याणासाठी ज्या योजना तयार करावयाच्या आहेत त्यावर होतो.

वैयक्तिक रित्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक कर्ज देताना, सरकारी खरीदी केंद्रावर शेतमालाची विक्री करताना, पीक विमा योजना, पिकांच्या नैसर्गिक आपत्तीची शासकीय मदत घेण्यासाठी त्याचप्रमाणे पिक कर्ज घेताना , भूसंपादित क्षेत्राची नुकसानभरपाई मिळताना , ठीबक सिंचन / तुषार सिंचन / फळबाग योजनांचे अनुदान मिळवताना होणार आहे.

 त्यामुळे प्रत्येक खातेदार शेतकऱ्याने ई पीक पाहणे या मोबाईल ॲप चा वापर करून आपल्या शेतातील अचूक पिकाची व जलसिंचन साधनाची नोंद करावी .


आपला 
रामदास जगताप 
दि १६.३.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send