रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

DILRMP अंतर्गत डी डी ई , सह जिल्हा निबंधक , प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे साठी यशदा पुणे येथे विशेष प्रशिक्षण वर्ग - क्षमता बांधणी कार्यक्रम



नमस्कार मित्रांनो ,


        ई फेरफार प्रणाली च्या यशस्वी अंमलबजावणी साठी डी डी ई , प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे क्षमता बांधणी साठी यशदा पुणे येथे  विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याचे शासनाने ठरविले आहे . त्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञान विभाग व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने व यशदा पुणे या संस्थेच्या सहकार्याने प्रत्येक महसूल विभागातील सर्व DDE  व , प्रत्येक विभागातील एक SDO / प्रांत अधिकारी , एक JDR / मुद्रांक जिल्हाधिकारी व एक तहसीलदार यांना एक दिवसाचा प्रशिक्षण वर्ग यशदा पुणे येथे आयोजित करणेत येत आहे .
या प्रशिक्षण वर्गात प्रामुख्याने वरिष्ठ अधिकारी यांना प्रशासकीय नियंत्रण व आढावा घेण्यासाठी ई फेरफार प्रणाली मधील सुविधा तसेच DDE , JDR, SDO, TAHASILDAR व DBA यांची जबाबदारी व कर्तव्य या विषयावर प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे .

     संभाव्य प्रशिक्षण वर्गाचे नियोजन - कार्यक्रम
  1. 14th Jan 2019  ----      Pune Division  - 5 X5=25    
  2. 15th Jan 2019           Nasik  Division -  5 X5=25 
  3. 16th Jan 2019            Konkan  Division  - 6X5=30
  4. 17th Jan 2019           Aurangabad  Division  8X5=40   
  5. 18th Jan 2019          Nagpur Division    -   - 6X5=30
  6. 19th Jan 2019          Amravati Division   -5 X5=25 
       
      या प्रशिक्षण वर्गा साठी सर्व डी डी ई व मुद्रांक जिल्हाधिकारी  यांनी उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे.
जिल्ह्यातील एक SDO व एक तहसीलदार यांची निवड डी डी ई यांचे मदतीने DCR यांनी करावी .
ई फेरफार प्रणाली च्या यशस्वी अंमल बजावणी साठी वरिष्ठ महसूल अधिकारी यांना हा प्रशिक्षणवर्ग निश्चितच फायदेशीर ठरणार आहे तरी सर्व नामनिर्देशित अधिकारी यांनी लाभ घ्यावा व त्या नंतर जिल्ह्यातील सर्व महसूल व नोंदणी अधिकारी यांना प्रशिक्षित करावे  ही विनंती

आपला

रामदास जगताप
दि ५.१.२०१९  

Comments

  1. Yashada- Centre of Information Technology is
    part and parcel to create awareness and give handholding wherever is necessary to have effective e- governance.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send