रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

तहसीलदार यांचे साठी चेक लिस्ट


नमस्कार मित्रांनो ,

ई फेरफार प्रकल्प अंतर्गत संगणकीकृत ७/१२ चे काम अंतिम टप्प्यात असताना त्यासाठी आपण काय काय केले ह्याची चेक लिस्ट सोबत जोडली आहे .
१.      हस्तलिखित ७/१२ व फेरफार नोंदवही बंद करून ई फेरफार चालू केला त्या दिनांकापूर्वीचे हस्तलिखित फेरफार नोंदवहीतील सर्व निर्गत फेरफार ODU मधून ऑनलाईन अपडेट केले का ?  कृपया ई फेरफार तलाठी लॉगीन ने अतिरिक्त अहवाल ४ मधी १)ODU मधून घेण्यासाठी उपलब्ध असलेले फेरफार हा अहवाल निरंक असल्याची खात्री करा .
२.       ऑनलाईन ई फेरफार सुरु होण्यापूर्वीचे सर्व हस्तलिखित ७/१२ , ८ अ व फेरफार नोंदवह्या ई अभिलेख प्रकल्प अंतर्गत स्कॅनिंग केले का ? ह्याची खात्री तहसीलदार यांनी करावी – कृपया या बाबत मार्गदर्शक सूचना क्र. दिनांक     पहावी
३.      एडीट री एडीट चे काम पूर्ण करून चावडी वाचनाची कार्यवाही पूर्ण करून चावडी वाचन बाबतचे दि ५.५.२०१७ चे  परिपत्रका प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाली का ? डी डी ई यांनी कृपया या बाबतचे प्रपत्र ३ चे प्रमाणपत्र जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे पाठवावे
४.      री एडीट चे काम पूर्ण झाल्याची (घोषणापत्र ३ ) केल्यानंतर दि १६.१०.२०१७ च्या परिपत्रकाप्रमाणे १ ते १५ दस्तांचा समावेश असलेली ( अधिकारी निहाय निश्चित बिंदू प्रमाणे टक्केवारीने तपासलेल्या स्वाक्षरीत ७/१२ सह ) संचिका तालुका अभिलेख  कक्षात  कायम स्वरूपी जतन करून ठेवण्यासाठी प्राप्त झाली असल्याची डी डी ई यांनी उप विभागीय अधिकारी यांचे मार्फत करून घ्यावी व तसा एकत्रित अहवाल इकडे पाठवा . तसेच सर्व परिशिष्ट ब चे आदेश तहसीलदार यांनी स्वाक्षरीत करून कार्यालयात जतन करून ठेवले आहेत ह्याची खात्री करावी .
५.      तालुक्यातील सर्व गावांचे डी ३ झाले नंतर सर्व गावांचे दुरुस्त / पुनर्लिखित ऑनलाईन  संगणकीकृत ७/१२ लागू केल्याबाबत ऑनलाईन प्रख्यापण आदेश काढणेत आले आहेत का ?
६.      प्रख्यापीत ७/१२ मध्ये अजुनही काही त्रुटी असल्याचे खातेदारांनी निदर्शनास आणून दिल्यास म.ज.म.अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये दुरुस्ती साठी ठरवून दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमाप्रमाणे ऑनलाईन कलम १५५ च्या दुरुस्ती सुविधांचा वापर करून परीशिष्ट क मधील अथवा सुनावणी घेवून सर्व प्रकरणी आदेश तहसीलदार यांनी  पारित केले आहेत का ? कृपया चूक दुरुस्तीचा कालबद्ध कार्याक्रमाबाबतचे दि    चे परिपत्रक पहावे .
७.      डाटाबेस सुधारणा करण्यासाठी केलेजाणारे फेज १ व फेज २ चे काम आपले जिल्ह्याचे पूर्ण झाले आहे का ?
८.      DBA यांनी आपल्या तालुक्यातील सर्व वापरकर्ते यांचे ई मेल आय डी व चालू मोबाईल नंबर USER CREATION मधून अपडेट केले आहेत का ?
९.      सर्व तालुक्यातील तलाठी साझे व महसूल मंडळ USER CREATION मधून तयार  केले आहेत का?
१०.  आपल्या जिल्ह्यातील एकूण महसुली गावांचा आढावा घेवून सर्व महसूल गावांचे अधिकार अभिलेख ऑनलाईन झाले असल्याचे डी डी ई यांनी प्रमाणित करावे .
११.  तलाठी लोगिन चे खालील अहवाल निरंक करणेत आले आहेत का ?  
ई फेरफार MODULE
बंद झालेली व इमाजीनरी फेरफार क्रमांक असलेल्या खात्यांची यादी , खाता नोंदणी व ७/१२ वरील खात्यांच्या नावातील फरक असलेल्या खात्यांची माहिती , भूधारणा भोगवटादार वर्ग १ व १क मध्ये असलेले स.नं., भूधारणा भोगवटादार वर्ग २ व १क मध्ये नसलेले स.नं., ७/१२ वरील आणेवारी व क्षेत्रात फरक असलेली खाती ,दुप्लीकेट स.नं. ची यादी , ODU मधून घेण्यासाठी उपलब्ध असलेले फेरफार
ODC MODULE-
ODC अतिरिक्त अहवाल – पूर्तता अहवाल १ ते १४ समरी अहवाल , पूर्तता अहवाल १५  ते २८  समरी अहवाल , ODC अतिरिक्त अहवाल ५ , ODCअतिरिक्त अहवाल ५.१ गाव नमुना १ व ७/१२ वरील खात्यांच्या एकूण आकारणीतील फरक , चुकीच्या पद्धतीने भरलेले अपाक व एकुम्या नावांची खाती , खाते मास्टर मध्ये अतिरिक्त नावे असलेल्या खात्यातील सर्वे नंबर निहाय  यादी . हे अहवाल निरंक असावेत .
    अधिकार अभिलेख ऑनलाईन केल्यानंतर वेगवेगळ्या MODULE  मधून भूधारणा बदललेल्या स.नं. ची यादी ODC अतिरिक्त अहवाल ७ मध्ये भूधारणा बदललेल्या स.नं चा अहवाल दिला आहे तो योग्य असल्याचे प्रमाणपत्र प्रत्येक गावासाठी नियुक्त केलेल्या महसूल पालक अधिकाऱ्याने देणे आवश्यक आहे तो पाहून तहसीलदार यांनी नमुना तपासणी करून तसे प्रमाणित करावे .
       शेती व बिनशेती क्षेत्राचे ७/१२ वरील क्षेत्र व एकाक योग्य असल्याचे खात्री तहसिलदार यांनी करावी . 

  लवकरच आपण GCC CLOUD वर जाणार असल्याने वरील सर्व बाबी महत्वाच्या आहेत ह्याची नोंद अधिकारी वर्गाने घ्यावी ही विनंती .

आपला

रामदास जगताप
दि ६.१.२०१९

Comments

Archive

Contact Form

Send