रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार प्रणाली मध्ये DDE यांनी SDO यांची नोंदणी करणे बाबत

नमस्कार मित्रांनो विषय -ई फेरफार प्रणाली मध्ये DDE यांनी SDO यांची नोंदणी करणे बाबत ई फेरफार प्रणाली मध्ये SDO यांना प्रमुख जबाबदारी देण्याच्या उद्देशाने दिलेल्या सुचना प्रमाणे USER CREATION MODULE मध्ये सर्व DDE यांना आपल्या जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी (SDO) यांची नोंदणी करणे व त्यांचे बोटांचे ठसे नोंदविण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे प्रत्येक DDE यांना ज्या प्रमाणे तहसीलदार व नायब तहसीलदार यांची नोंदणी करता येते त्या प्रमाणे त्यांना आत्ता SDO यांची नोंदणी करता येईल . तरी सर्व DDE यांना सूचित करणेत येते कि आपण आपले जिल्ह्यातील सर्व SDO यांची नोंदणी दि १ फेब्रु.२०१९ पूर्वी पूर्ण करून तसा अहवाल आपण शासनाला सादर करावा . नोंदणी साठी SDO यांचा सेवार्थ आय डी पगार पत्राकावरूनच भरावा तसेच नोंदणी केलेले PASSWORD संबंधित SDO यांना कळवावेत . सर्व SDO यांना हे USER NAME व PASSWORD वापरून MIS काढता येईल तसेच हेच ई मेल आय डी व पासवर्ड वापरून घोषणापत्र ४ करता येईल ( अजून घोषणापत्र ४ ची ही सुविधा देनेत आलेली नाही ) सर्व DDE यांनी आपला अहवाल दि १.२.२०१९ रोजी साय ५.०० वा पर्यंत पाठवा ही विनंती आपला रामदास जगताप दि २९.१.२०१९

Comments

Archive

Contact Form

Send