पुणे व कोंकण विभागाचे ‘ई फेरफार’ विषयी चे मास्टर ट्रेनर्स चा प्रशिक्षिण वर्ग दि १८ ते २० फेब्रु.२०१९
प्रति,
मा. उप जिल्हाधिकारी ततः डी डी ई ,
पुणे, सांगली,सोलापूर सातारा, कोल्हापूर,ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर
विषय -: ‘ई फेरफार’ संगणक प्रणाली या विषयी मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षित करणेबाबत.
संदर्भ -: प्रकल्प अंमलबजावणी समिती माहिती तंत्रज्ञान विभाग यांचे ३ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या ६७ व्या सभेचे कार्यवृत्तांत.
उपरोक्त विषयान्वये आपल्या विभागाच्या कामकाजा करिता वापरण्यात येणाऱ्या ‘ई-फेरफार’ या संगणक प्रणालीचा कार्यक्षम वापर होण्यासाठी यशदा,पुणे येथे.
दि. १८ ते २० फेब्रुवारी २०१९ या कालवधीत ‘मास्टर ट्रेनर्स’ प्रशिक्षित करण्यासाठी तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षणासाठी प्रत्यके जिल्हयातून एक नायब तहसिलदार, एक मंडल अधिकारी, एक तलाठी असे एकूण तीन अधिकरी/कर्मचारी नामनिर्देशीत करण्यात यावेत.
सदर अधिकरी/ कर्मचारी यांना ई-फेरफर संगणक प्रणालीचा वापर करण्याचे प्राथमिक ज्ञान आवश्यक असून या विषयी संगणक प्रणालीच्या प्रत्यक्ष वापरा चे कौशल्य प्राप्त करण्याची तळमळ असणे आवश्यक आहे.
अशापद्धतीने प्रशिक्षित झालेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांनी तालुका / जिल्हा / विभाग स्तरावर प्रशिक्षक म्हणून काम करणे आवश्यक आहे.
तसेच त्यांनी तालुका स्तरावर मास्टर.ट्रेनर्स. तयार करणेसाठी जिल्हा स्तरावर कार्यशाळा घेणे आवश्यक आहे.
तरी आपणांस विनंती करण्यात येते की, सदर इच्छुक अधिकारी/कर्मचारी यांची नामनिर्देशने cit.training@yashada.org या ई मेलवर दि. 10 फेब्रुवारी 2019 पर्यंत पाठविण्यात यावीत. व आपले जिल्ह्यातील मास्टर ट्रेनर्स ला यशदा पुणे येथे या कालावधी उपस्थित ठेवावे
आपला विश्वासू,
रामदास जगताप
दि २८.१.२०१९
Comments