यशदा पुणे येथे ई फेरफार प्रणाली बाबत महसूल अधिकारी यांना एक दिवसाचे प्रशिक्षण
प्रति,
मा.
विभागीय आयुक्त,
पुणे,
कोकण, औंरगाबाद,
नाशिक, नागपूर,
अमरावती
विषय : महसूल विभागात वापरण्यात येणा-या ई-फेरफार या संगणक प्रणालीचा वापर प्रभावीपणे
होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभाग पुरस्कृत प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत…..
संदर्भ : प्रकल्प अमंलबजावणी समिती माहिती तंत्रज्ञान विभाग यांचे ३ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या
६७ व्या सभेचे कार्यवृत्तांत.
महोदय,
उपरोक्त संदर्भीय
कार्यवृत्तांतील आदेशानुसार महसूल
विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत
ई-फेरफार या संगणक प्रणालीचा
प्रभावी व कार्यक्षम वापर
होण्यासाठी यशदा येथे एक
दिवशीय कार्यशाळेचे आयोजन
करण्यात येणार आहे. सदर
कार्यशाळेसाठी आपल्या विभागातील प्रत्येक
ज्ल्हियाचे संबंधित उपजिल्हाधिकारी- District Domain Expert (DDE), जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक
जिल्हाधिकारी , तसेच जिल्ह्यातून एक
उप विभागीय अधिकारी (SDO), एक तहसिलदार अथवा
एक नायब तहसिलदार ( DBA),
असे एकूण ५ प्रशिक्षणार्थी खाली दिलेल्या वेळा
पत्रकानुसार यशदा येथे उपस्थित
राहतील याप्रमाणे आपल्या
विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना
कळविण्यात यावे. व संबंधित
नामनिर्देशने abdul.zeelani@yashada.org या
ईमेलवर दि. १० जाने.
२०१९ पर्यंत कळविण्यात यावी.
सदर
प्रशिक्षणासाठी यशदा येथील महसूल
विभाग संपर्क अधिकारी श्रीमती.
उज्ज्वला बाणखेले, सहा.
प्राध्या. यशदा 020-25608402 अथवा
020-25608282(श्री. अब्दुल झिलानी) किंवा
श्री. रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प , जमाबंदी आयुक्त कार्यालय ,पुणे 020-26137110 याच्यांशी संपर्क साधावा.
१. १४ जानेवारी २०१९ ---- पुणे विभाग
२. १५ जानेवारी २०१९ ---- नाशिक विभाग
३. १६ जानेवारी २०१९ ---- कोकण विभाग
४. १७ जानेवारी २०१९ ---- औंरगाबाद विभाग
५. १८ जानेवारी २०१९ ---- नागपूर विभाग
६. १९ जानेवारी २०१९ ---- अमरावती विभाग
सदर प्रशिक्षण
कार्यक्रम संगणक प्रयोगशाळा यशदा
येथे सकाळी १०.००
ते संध्या ५.३०
या वेळेत घेण्यात येणार
आहे.
संचालक
संगणक माहिती तंत्रज्ञान केंद्र
यशदा, पुणे
प्रत- मा.
जमाबंदी आयुक्त व संचालक भूमिअभिलेख, (म.रा.), पुणे यांना
माहितीस्तव सविनय सादर.
मा. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक , महारष्ट्र राज्य , पुणे यांना माहितीस्तव सविनय
सादर.
Comments