उद्या होणार गेल्या ६ महिन्यातील कामाचा आढावा
नमस्कार मित्रांनो ,
उद्या दि ११.१.२०१९ रोजी स.१०.०० ते १२.०० या वेळेत सर्व जिल्ह्यातील ७/१२ संगणकीकरण कामाचा आढावा मा. अप्पर मुख्य सचिव ( महसूल) घेणार आहेत . त्यासाठी महत्वाचे मुद्दे
राज्याची सद्यस्थिती
१. री एडीट - अद्याप देखील १६ जिल्ह्यांचे घोषणापत्र ३ चे काम अपूर्ण फक्त १९ जिल्ह्यांचे काम १००% झाले . राज्यातील एकूण ४०६ गावांचे काम अपूर्ण
एक गाव शिल्लक जिल्हे - नांदेड , कोल्हापूर व परभणी
दोन गाव शिल्लक जिल्हे - सातारा
तीन गाव शिल्लक जिल्हे - ठाणे , लातूर , नंदुरबार
चार गावे शिल्लक जिल्हे - जिळगाव , धुळे
पाच गावे शिल्लक जिल्हे -रायगड
सहा गावे शिल्लक जिल्हे - चंद्रपूर
आठ गावे शिल्लक जिल्हे - पालघर
अकरा ग्गावे शिल्लक जिल्हे - औरंगाबाद
बारा गावे शिल्लक जिल्हा - नाशिक
सिंधुदुर्ग जिल्हा - १२६ गावे शिल्लक
रत्नागिरी जिल्हा - २१६ गावे शिल्लक
या जिल्ह्यांचे सर्व गावांचे घोषणापत्र ३ पूर्ण होऊन प्रख्यापण आदेश काढल्याशिवाय फेज २ चे काम होऊ शकत नाही
२. DSP - राज्यात एकूण ४४,८३,९४० सातबारा डिजिटल स्वाक्षरीत झाले असून मुंबई उपनगर मधील एकाही ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत झालेला नाही तसेच सातारा , सांगली , पालघर , धुळे , चंद्रपूर , या जिल्ह्यांचे काम ५ % पेक्षा कमी झाले आहे .
३. कलम १५५ प्रमाणे दुरुस्ती
ऑनलाईन क १५५ दुरुस्त्या सुविधा मधून ९३९५२३ सातबारा मध्ये दुरुस्ती प्रस्ताव तलाठ्यांकडून ऑनलाईन पाठवले असून त्यापैकी ७९८९९८ सातबारा दुरुस्ती ला तहसीलदार यांनी मान्यता दिली असून त्यापैकी फक्त ५९३२२३ सातबारा दुरुस्त करणेत आले आहेत . या मध्ये अकोला . उस्मानाबाद , औरंगाबाद , गोंदिया जालना , धुळे , नंदुरबार , नांदेड , नाशिक , परभणी , बीड , मुंबई उपनगर , लातूर हिगोली या जिल्ह्यांनी प्रत्येकी ५०० सातबारा देखील दुरुस्त केलेले नाहीत .
४. ई फेरफार - एकूण ५४,७८,८७२ फेरफारापैकी ४७,४६,८९६ निर्गत झाले असून अद्याप ९,५६,१८२ फेरफार प्रलंबित आहेत .
Comments