ई हक्क प्रणाली – खातेदारांसाठी व तलाठी यांना उपयुक्त
ई हक्क प्रणाली –
खातेदारांसाठी व तलाठी यांना उपयुक्त
नमस्कार मित्रांनो ,
जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या वतीने व
जिल्हाधिकारी पुणे यांच्या मदतीने ई हक्क नावाने एक नवीन ऑनलाईन आज्ञावली( PDE – Public
Data Entry ) विकसित करणेत आले असून या मध्ये कोणत्याही खातेदाराला / संबंधित
व्यक्तीला तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या हक्काच्या नोंदी ७/१२ वर फेरफार च्या
स्वरुपात घेण्यासाठी जे अर्ज करावे लागतात ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात
घरीबसून दाखल करता येतील . या मध्ये सध्या पहिल्या टप्प्यात १. वारस नोंद २. बोजा
दाखल करणे , ३. बोजा कमी करणे , ४. ई करार नोंदी , ५. मयताचे नाव कमी करणे ६.
अज्ञानपालनकर्ता चे नाव ( अपाक ) कमी करणे , ७. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर (
एकुम्या ) कमी करणे व ८. विश्वास्थांचे नाव कमी करणे असे आठ प्रकारचे फेरफार
घेण्यासाठीचे अर्ज संबंधित खातेदार अथवा संबंधित व्यक्तीला ई हक्क प्रणालीतून
ऑनलाईनपद्धतीने दाकाहाल करता येतील . अशा फेरफार प्रकारासाठी कोणती कागदपत्र
जोडावी लागतील त्यांचे यादी देनेत आली असून असी कागदपत्र स्कॅन करून ( स्वयं
साक्षांकित प्रत ) पीडीएफ स्वरुपात अपलोड करता येतील .
अशा पद्धतीने दाखल केलेल्या
प्रत्येक अर्जाला अर्ज नंबर ( aplicatiopn ID) मिळेल व त्याची ऑनलाईन पोहोच देखील
अर्जदाराला मिळेल व अश्या अर्जांची स्थिती अर्जदाराला प्रत्येक टप्प्यावर तपासता
येईल . प्रत्येक टप्प्यावर अर्ज स्वीकारला , काय कारण देयून परत पाठवला ? , फेरफार
तयार केला का ? नोटीस काढली का? नोटीस बजावनेत आली का / रुजू करणेत आली ? फेरफार
मुदतीत हरकत आली का? फेरफार मंजूर
झाला का ? ऑनलाईन ७/१२ दुरुस्त झाला का ? अशा प्रत्येक टप्प्यावर मोबाईलवर मेसेज
येईल . असा भरलेला अर्ज तलाठ्याकडे ऑनलाईन
जाईल तो योग्य असल्याची खात्री करून तलाठी तो अर्ज स्वीकारील अथवा कारण देयून
पुन्हा अर्जदाराकडे दुरुस्ती साठी पाठवेल किंवा पूर्णतः कारण नमूद करून नाकारील . या
साठी प्रत्येकं अर्जदाराने या प्रणालीवर
मोबाईल नंबर देयून नोंदणी करणे आवश्यक आहे.
ई हक्क ही प्रणाली ए फेरफार प्रणालीला पूरक असून ती मधून केलेलं सर्व अर्ज तलाठी यांना ई फेरफार मध्ये FETCH करून फेरफार मध्ये रुपांतरीत करता येणार आहेत त्यासाठी ही प्रणाली ई फेरफार प्रणाली शी संलग्न करणेत आलेली आहे .
ई हक्क ही प्रणाली ए फेरफार प्रणालीला पूरक असून ती मधून केलेलं सर्व अर्ज तलाठी यांना ई फेरफार मध्ये FETCH करून फेरफार मध्ये रुपांतरीत करता येणार आहेत त्यासाठी ही प्रणाली ई फेरफार प्रणाली शी संलग्न करणेत आलेली आहे .
याच प्रणाली मध्ये माहिती भरून तलाठी
देखील फेरफार घेणार आहेत त्यामुळे ऑनलाईनअर्ज आल्यास तलाठ्याला पुन्हा डेटा
एन्ट्री करावी लागणार नाही पर्यायाने तलाठी यांना देखील ही प्रणाली सहाय्यभूत
ठरणार आहे . वरिष्ठ महसूल अधिकार्यांना देखील अशा सर्व अर्जांचा आढावा घेण्यासाठी
mis करून दिले जाणार आहेत या मुल महसूल प्रशासनामध्ये पारदर्शकता गतिमानता
येण्यास आणखी मदत होईल असा विश्वास आहे. ही प्रणाली चे पुणे जिल्ह्यातील मुळशी
तालुक्यात टेस्टिंग पूर्ण झाले असून लवकरच ई फेरफार प्रणाली CLOUD वर स्थानांतरीत केल्या नंतर पूर्ण राज्यात
उपलब्ध करून दिली जाणार आहे .
आपला
रामदास जगताप
दि २०.१.२०१९
Comments