सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना laptop व printers चे वाटप करणे
नमस्कार मित्रांनो
सर्व डी डी ई यांना विनंती
,
आपल्या ई फेरफार
प्रकल्पासाठी laptop व printers प्रमुख अडथला ठरत आहे त्यासाठी आपण वैयक्तिक
रित्या प्रयत्न करून सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना laptop व printers शासकीय
खर्चाने वाटप केले जातील या साठी प्रयत्न करणे गरजे चे आहे . राज्यातील नागपूर
विभाग वगळता इतर सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांनी स्वतःचे खर्चाने / कर्ज काढून laptop व printers खरेदी केले व ते या
प्रकल्पासाठी वापरले त्यांचा वापर करूनच आपण हा प्रकल्प इथपर्यंत आणला त्यासाठी खर
तर आपण सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांना धन्यवादच दिले पाहिजेत त्यासाठी शासनाने ७/१२
नक्कल फी मधील १० रुपये तलाठी यांनी घेण्यास मान्यता दिली होती त्यानंतर जर
शासनाने laptop व printers दिले असतील तर सर्व नक्कल फी शासन जमा करण्याचे आदेश
दिले होते परंतु आपल्या या ई फेरफार प्रकल्पासाठी च्या कामाची व्याप्ती विचारात
घेता आपण त्या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही तथापि आता या प्रकल्पाच्या अंतिम
टप्प्याकडे येताना शासनाने सर्व तलाठी व
मंडळ अधिकारी यांना जिल्हा वार्षिक योजनेतून (DPC) खास बाब म्हणून सर्व तलाठी व मंडळ अधिकारी laptop व printers वितरीत करण्याचा निर्णय
घेतला त्यासाठी महसूल मंत्री महोदयांनी सर्व पालकमंत्री महोदयांना व जिल्हाधिकारी
महोदयांना अर्धशासकीय पत्र पाठवली आहेत . काही जिल्हाधिकारी यांनी DIT च्या
महामंडळाकडे पैसे पाठवून laptop व printers ची मागणी केली परंतु तेथून ही योग्य
प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा laptop व printers GeM पोर्टल वरून खरेदी करावयास
सांगितले . अनेक जिल्ह्यात तसे केले ही परंतु अद्याप देखील अनेक ठिकाणी laptop व
printers मिळाले नसल्याची तक्रार तलाठी संघटना करते . या साठी आपणास विनंती आहे कि
किमान आज रोजी कार्यरथ असलेल्या सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना laptop व
printers तातडीने मिळतील अशी व्यवस्था करावी व मला खालील प्रमाणे माहिती पाठवावी
एकून मंजूर= तलाठी + मंडळ
अधिकारी
सध्या कार्यार्थ = तलाठी +
मंडळ अधिकारी
आज अखेर laptop व printers
वाटप केलेलं = तलाठी + मंडळ अधिकारी
निधीची उपलब्धता होवून
खरेदी प्रक्रिया सुरू असलेल्या laptop व printers ची संख्या न=
अद्याप निधीची तरतूद झाली
नसलेल्या laptop व printers संख्या =
निधीची उपलब्धता आपण स्वता मा जिल्हाधिकारी
यांचे मदतीने मा पालक मंत्री महोदयांना या प्रकल्पाचे महत्व पटवून देवून laptop व
printers साठी निधी मंजूर करून घ्यावा अथवा जिल्हा सेतू समिती मध्ये उपलब्ध
निधीतून तरतूद करावी व आपले जिल्हाय्तील सव तलाठी मंडळ अधिकारी यांना शासकीय laptop
व printers उपलब्ध करून द्यावेत हि विनंती तरच सर सामान्य जनतेच्या दृष्टी ने
अत्यंत महत्वाचा हा प्रकल्प खर्या अर्थाने पूर्णत्वास जाईल अशी अपेक्ष आहे
आपला
रामदास जगताप
दि २०.१.२०१९
Comments