रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

फेज २ चे काम झालेल्या जिल्ह्यांमध्ये पीक पाहणीच्या नोंदी अद्यावत करणे बाबत

नमस्कार मित्रांनो .

 विषय :- फेज २ चे काम झालेल्या जिल्ह्यांमध्ये पीक पाहणीच्या नोंदी अद्यावत करणे बाबत 



                         संगणकीकृत  ऑनलाईन गाव नमुना-7 प्रमाणे गाव नमुना-12 प्रत्येक तलाठ्याने हंगामानुसार अद्यावत करणे आवश्यक आहे. त्यासाठी चालू हंगामाची पीक पाहणी OCU मधून भरण्याबरोबरच  मागील वर्षाचा पिक पहाणीचा डाटा पुढील वर्षासाठी कॉपी करणे व बदल झालेल्या सर्व्हे नंबरची दुरुस्ती करण्याबाबत खालील प्रमाणे कार्यवाही करणेत यावी .
                       फेज -2  चे काम पूर्ण झालेल्या जिल्हांमध्ये ज्या तलाठींनी   सन 2016, 2017 आणि 2018 या वर्षांसाठी    पिक पहाणी भरली नाही त्यांना गाव नमुना-12 मध्ये कोणतीही पिकाची नोंद दिसणार नाही, कारण आपण फेज २ नंतर फक्त मागील ३ वर्षाची पीक पाहणी दाखवतो . त्यासाठी  मागील वर्षाची पिक पाहणी कॉपी करण्यासाठी तलाठी ocu_backlog हे मॉड्यूल वापरू शकतात .

१.  STEP 1:- OCU_BACKLOG :-  समजा तलाठी यांना पिक पहाणी वर्ष 2017 साठी डेटा कॉपी
करायचा आहे त्यासाठी  ocu_backlog मॉड्यूलमध्ये लॉगीन करावे व “हंगामाची पिक पहाणी मागील
वर्षांनुसार कार्यान्वयीत (कॉपी) करणे ”  या पर्यायाला क्लीक करावे. हंगाम निवडावा व  पिक पाहणी
अद्यावत करण्याचे वर्ष (2017) निवडून “ज्या वर्षाने  कॉपी करावयाची आहे ते वर्ष” (2016) निवडावे व पिक
पाहणी अद्यावत अहवाल पाहून पिक पाहणी अद्यावत करा यावर क्लीक करावे. सदर गावातील सर्व
7/12 ची निवडलेल्या हंगामाची पिक पाहणी 2017 साठी कॉपी  झालेली असेल.त्यानंतर ज्या स.न/ गट नं. मध्ये पिक पाहणीत बदल असेल तो बदल OCU मधून करावा .

२.  STEP 2:- Login In OCU application :-  जर STEP-1 मध्ये ज्या वर्षाचे पिक पाहणी
अद्यावत करण्याचे वर्ष  या पर्यायामध्ये वर्ष (उदा. सन 2017) दिसत नसल्यास तलाठी यांनी OCU
लॉगिन करावे व गाव नमुना १२ भरणे यावर क्लिक करून सदर गावातील कोणत्याही एका सर्व्हे
नंबर साठी पिक पाहणी भरून साठवा करावी. असे केल्याने ocu_backlog मॉड्यूलमध्ये
पिक पाहणी कॉपी  करण्याचे वर्ष (उदा. सन 2017) दिसेल.  त्यानंतर वरील STEP1 प्रमाणे कार्यवाही करावी

३ .  STEP 3 :-  Login in OCU_BACKLOG application:-   पुन्हा ocu_backlog मध्ये लॉगिन
केल्यावर आपणास पिक पाहणी अद्यावत करण्याचे वर्ष  (उदा. सन 2017) दिसेल याचाच अर्थ
आपण सन २०१६ ची पीक पाहणी सन २०१७ साठी कॉपी करू शकतो.व त्यानंतर ज्या स.न/ गट नं. मध्ये पिक पाहणीत बदल असेल तो बदल OCU मधून करावा .

अशा पद्धतीने सर्व वर्षासाठी पिक पाहणी अद्यावत करणेत यावी . तथापि पीक पाहणी कॉपी करताना ती अचूक असल्याची खात्री तलाठ्याने करावी . किमान सन २०१६-१७ पासून पुढील पीक पाहणीच्या नमुना १२ मधील निंदी अचूक असाव्यात . अचूक पीक पाहणी बाबत    दिनांक २५.९.२०१८       रोजी च्या मार्गदर्शक सूचना क्र. ६९  जा. नं    रा.भू.अ.आ.का/रा.स./कावि/६९ /२०१८   चे अवलोकन व्हावे . या प्रमाणे अचूक नमुना १२ अद्यावत केल्या शिवाय ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करू नये .


नियमित पीक पाहणी च्या नोंदी घेण्यासाठी फेज २ झालेल्या जिल्ह्यात ocuphase2 हे module वापरावे . 


आपला
रामदास जगताप 

Comments

Archive

Contact Form

Send