वाडी विभाजन करुन नवीन महसूली गांव निर्मीती ची कार्यपद्धती व त्यासाठी ची URL व युजर म्यानुअल
नमस्कार मित्रांनो ,
विषय - वाडी विभाजन करुन महसूली गांव निर्मीतीच्या सुविधेबाबत.
संदर्भ - १. या कार्यालयाकडील क्र.रा.भू.अ.आ.का.४/ई-म्युटेशन/2015 दिनांक 29/12/2015 चे पत्र.
2.या कार्यालयाकडील क्र.रा.भू.अ.आ.का.४/वाडी विभाजन/2017दिनांक 27/03/2017 चे पत्र.
3. या कार्यालयाकडील क्र.रा.स./का.वि/34/2018दिनांक 17/03/2018 चे पत्र.
4. या कार्यालयाकडील क्र.रा.स./का.वि/41/2018दिनांक 12/04/2018 चे पत्र
५. या कार्यालयाकडील क्र.रा.स./का.वि/41/2018दिनांक 27/11/2018 चे पत्र
DILRMP अंतर्गत ई-फेरफार आज्ञावलीच्या अंमलबजावणी मधील वाडी विभाजनाने तयार झालेल्या नविन महसुल गावाबाबत करावयाची कार्यवाही हा देखील महत्वाचा घटक आहे.
याबाबत उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये वेळोवेळी सुचना देण्यात आल्या आहेत. दिनांक 27/03/2018 च्या पत्रात नमुद केलेल्या दोन्ही प्रकारच्या वाडी विभाजन करावयाच्या गावांची यादी अद्याप या कार्यालयाकडे प्राप्त झालेली नाही.
आपल्या प्रत्येक तालुक्यात सध्या अस्तित्वात असलेल्या एकुण महसुली गावांपैकी काही महसुली गांवाचे अधिकार अभिलेख ऑनलाईन पध्दतीने अद्यापही उपलब्ध नाहीत.
त्यामुळे ऑनलाईन दस्त नोंदणी अथवा ई-फेरफारची कार्यवाही करता येत नाही. अश स्वरुपाच्या काही तक्रारी इकडे प्राप्त होत आहेत.
त्यासाठी प्रत्येक तहसिलदार यांनी आपल्या तालुक्यातील सर्व महसुली गावांचा आढावा उपअधीक्षक भूमी अभिलेख व दुय्यम निबंधक यांचेशी घेवुन किती गावांची वाडी विभाजन प्रक्रिया अद्याप झालेली नाही याची माहिती संकलित करावी
तसेच शासनाने साझा पुनर्रचना कार्यवाहीमुळे निर्माण झालेले अतिरिक्त साझे निर्माण करण्यासाठी ज्या महसुली गावांचे विभाजन करुन महसुली गावात रुपांतर करावे लागत आहे अशाही गावांची माहिती संकलित करणे अपेक्षीत आहे.
आपल्या जिल्हयातील खालीलप्रमाणे माहिती संकलित करुन इकडे सादर करावी.
१. हस्तलिखीत 7/12 मध्ये वाडी विभाजन होवुन तयार झालेला तथापि ऑनलाईन प्रणालीत उपलब्ध नसलेल्या गावांची यादी.
२. ऑनलाईन संगणकीकृत 7/12 कार्यान्वित झालेनंतर वाडी विभाजन झालेल्या व ऑनलाईन वाडी विभाजन करावयाच्या गावांची यादी.
३. तलाठी सजा पुनर्रचना झाल्याने नव्याने निर्माण झालेल्या महसुली गावांची यादी.
या सर्व गावांची माहिती विहीत नमुन्यात अधिसुचनेच्या प्रतीसह इकडे सादर करावी व या गावांसाठी सांकेतांक क्रमांक देण्यासाठीची मागणी जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे कळवावी.
त्या नंतर जमाबाडी आयुक्त कार्यालयाकडून आपल्याला नवीन महसूल गावाला कोणता संकेतांक क्रमांक द्यावा हे कळवीणेत येईल .
नवीन महसुली गावांच्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.
1.जमाबंदी आुयक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालय (म.राज्य) पुणे यांचे कडून नवीन महसुली गाव साठी चा सांकेतांक क्रमांक (Census Code) प्राप्त झाल्यानंतर डी.बी.ए. लॉगीन ने “नविन गांव तयार करणे” यामधुन सांकेतांक क्रमांक नमुद करुन नविन महसुली गाव तयार करण्यात यावे.
२. या नाव निर्मित महसुली गावांच्या बाबत वाडी विभाजन ही सुविधा खाली नमूद सर्वर निहाय URL चा वापर करुन वाडी विभाजनाची कार्यवाही ऑनलाइन पध्दतीनेच करण्यात यावी.
अ) स्टेट देटा सेंटर वरील जिल्ह्यांसाठी
SDC : https://10.187.202.183/wadivibhajan/
ब) bsnl cloud डेटा सेंटर वरील जिल्ह्यांसाठी ( कोल्हापूर , ठाणे , नाशिक , सातारा , सांगली, सोलापूर , चंद्रपूर व गोंदिया या जिल्ह्यांसाठी )
BSNL : http://10.195.33.67/wadivibhajan
क) NDC , PUNE डेटा सेंटर वरील जिल्ह्यांसाठी ( औरंगाबाद , नांदेड , नंदुरबार , परभणी , यवतमाळ व लातूर या जिल्ह्यांसाठी )
NDC : http://10.153.15.93/wadivibhajan/ या URL वापराव्यात
ई फेरफार मधील वाडी विभाजन हा फेरफार प्रकार वापरून वाडी विभाजनाची कार्यवाही करू नये
३. वाडी विभाजनासाठी वापरलेला फेरफार नंबर वापरुन वाडी विभाजनाची कार्यवाही करण्यात यावी.
7. तद्नंतर नवनिर्मित गावासाठी शेवटचा फेरफार क्रमांक जुन्या गावातील शेवटचा फेरफार क्रमांक नमूद करावा.( हस्तलिखित प्रमाणे नवीन महसुली गावासाठी १ फेरफार क्रमांक देनेत येवू नये )
8. नवनिर्मित गावाचे नावासह नवीन गावाचा सांकेतांक क्रमांक (Census Code) दुय्यम निबंधक कार्यालयास कळविन्या साठी इकडे कळवीणेत यावा म्हणजे हे गाव दस्त नोंदणीसाठी SRO यांना उपलब्ध होईल .
वरीलप्रमाणे पुढील कार्यवाही आपले स्तरावर पुर्ण करण्यात यावी. सोबत त्याचे परिपुर्ण USER MANUAL ( दि. १३.१२.२०१८ ) जोडले आहे. सदरच्या सूचना सर्व वापरकर्त्यांच्या निदर्शनास आणाव्यात.ही विनंती
वाडी विभाजनाचा फेरफार तयार करण्यापूर्वी त्या बाबतचे सर्व अहवाल बारकाईने पाहावेत
आपला,
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
दि १३.१२.२०१८
Comments