रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार बाबत अडचणी व उत्तरे भाग ३ दि १३.१२.२०१८

नमस्कार मित्रांनो ई फेरफार बाबत अडचणी व उत्तरे भाग ३ १, फेज १ नंतर काही ७/१२ वरची पिक पाहणी उडाली आहे / नष्ट झाली आहे ? उत्तर - फेज १ च्या कामामुळे कोणत्याही ७/१२ वरील पिक पाहणी नष्ट होत नाही , मात्र फक्त सन २०१४-१५ पर्यंतची पिक पाहणी डेटा वेगळा केला आहे . ज्या ७/१२ वर सन २०१५-१६ , २०१६-१७ व २०१७-१८ चा पिक पाहणी भरलेलीच नसल्याने ती दिसणारच नाही त्यामुळे हा डेटा नष्ट झाल्या सारखे वाटते परंतु मुलता च ONLINE ७/१२ वर पिक पाहणी केलेली नसल्याने दिसणारच नाही २. फेज १ नंतर काही ७/१२ वरची पिक पाहणी दिसत नसल्याने कशी भारता येईल ? उत्तर - OCU_BACKLOG वापरून कॉपी करता येईल ३. फेज १ नंतर एडीट री एडीट चे फेरफार दिसत नाहीत ? उत्तर - एडीट री एडीट चा डेटा फेज १ मध्ये वेगळा केलेला आहे व त्याप्रमाणे एडीट व री एडीट चे फेरफार दाखविण्याच्री सुविधा निर्माण केली आहे . कृपया तपासून पहा एडीट / री एडीट मधेच पहा ४. फेज १ च्या कामा नंतर देखील जुन्या वर्षाची सन २०१४-१५ पूर्वीची पिक्पाहानी ७/१२ वर दिसते ? उत्तर - ज्या तालुक्यातील सर्व महसुली गावांचे घोषणापत्र ३ झाली आहेत त्याच तालुक्याचे फेज १ चे काम केले आहे . त्या अर्थी या तालुक्यातील सर्व गावांचे डी ३ झाले नसल्याने फेज १ चे काम झालेले नाही . ५. फेज १ च्या कामाचा काय फायदा होणार आहे ? उत्तर - फेज एक मध्ये जुना व अनावश्यक डेटा स्वतंत्र करणेत आला आहे , ज्या नोंदी हस्तलिखित मध्ये घेनेत आल्या होत्या त्या पुन्हा ONLINE मध्ये दाखविण्याची गरज नाही सबब त्या फेज १ मध्ये स्वतंत्र केल्याने डेटाबेस साईज ५०% ने कमी झाली आहे त्या मुले अश्या तालुक्यात सर्वर स्पीड मध्ये निशित सुधारणा झालेली दिसून येईल आपल रामदास जगताप दि १३.१२.२१०८

Comments

Archive

Contact Form

Send