खाता दुरुस्ती MODULE बाबत व ODC अहवाल त्रुटी दूर करणे बाबत
नमस्कार मित्रांनो ,
वापरकर्त्यांच्या FEEDBACK प्रमाणे कलम १५५ च्या आदेशाने खाता दुरुस्ती या MODULE खालील सुधारणा करून काल दि १४.१२.२०१८ पासून
सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून दिले आहे कृपया तपासून FEEDBACK देणेत यावा.
अ ) खाता दुरुस्ती -
1. खाता दुरुस्ती MODULE मध्ये वैयक्तिक खाते तयार करून समाविष्ट केल नंतर खातेदाराचे नाव दुबार दिसत होते ती अडचण दूर केली आहे ( bug is fixed )
2. खाता दुरुस्ती MODULE मध्ये फेरफार क्रमांक तयार करताना काम संपल्याची याची घोषणा केलेले काही अनावश्यक स.नं.शिल्लक असलेचे दाखवले जात होते ते आत्ता दिसणार नाही . आत्ता आवश्यक तेव्हडेच स नं तेथे दर्शविले जातील .
3. फेज १ च्या कामानंतर काही डेटा शिफ्ट केला असल्याने येत आलेला एरर आता सर्व डेटा पुन्हा सुस्थितीत केल्या मुळे आत्ता या नंतर अडचण येणार नाही .त्यामुळे खाता दुरुस्ती मध्ये तलाठ्याने दुरुस्ती करून साठवा केलेलं गट / स. नं तहसीलदार यांना मान्यतेसाठी उपलब्ध राहतील तसेच तलाठी यांनी खाता दुरुस्ती केल्या नंतर असे स न. खाता दुरुस्त्यांना मान्यता देणेसाठी उपलब्ध आहेत
४. काही ७/१२ वर मंजूर फेरफाराचा ७/१२ वर अंमल आला नसल्यास आत्ता फेज १ चा डेटा पुन्हां पूर्ववत केल्यास पूर्ण अंमल झालेलां दिसेल . हे तपासून पहा .
ब ) ODC -
१. मोठ्या गावांचा ODC अहवाल १८ तयार होताना फार वेळ लागत होता , आत्ता सुधारणा करणेत आली असून आत्ता अहवाल १८ तात्काळ तयार होईल
२. मोठ्या गावांचा ODC अहवाल ३ तयार होताना फार वेळ लागत होता , आत्ता सुधारणा करणेत आली असून आत्ता अहवाल ३ तात्काळ तयार होईल
३. ODC अहवाल १७ मध्ये शून्य क्षेत्राची खाती दाखवली जात नव्हती ती आता दाखविली आहेत , मोठ्या गावान्साठीची अडचण दूर करणेत आली आहे
४. अतिरीक्त अहवाल ५ मध्ये ७/१२ वर एकाच नाव असलेले खाते दुरुस्त करतां येत नव्हते ती अडचण आत्ता दूर करणेत आली आहे
५. ७/१२ पाहताना येणारा "mhrorxxx_yyy" हा एरर आत्ता येणार नाही
६. अहवाल १५ मध्ये SKN KHATA NO. दाखविले जात नव्हते , आत्ता SKN KHATA NO दिसतील व दुरुस्त देखील करता येतील .
वरील प्रमाणे अडचणी दूर करणेत आल्या आहेत . कृपया तपासून पाहावे
आपला
रामदास जगताप
दि १७.१२.२०१८
Comments