तहसिलदार यांनी क्षेत्र दुरूस्तीचे आदेश पारीत करण्याबाबत.
मार्गदर्शक सूचना क्र.८५ क्र.रा.भू.अ.अ.का.४/रा.स./८५ /2018
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख,
(म.राज्य) पुणे यांचे कार्यालय,
पुणे, दिनांक - १५ /12/2018.
प्रति,
निवासी उपजिल्हाधिकारी
तथा डिस्ट्रीक डोमेन एक्सपर्ट, (सर्व)
विषय - तहसिलदार यांनी क्षेत्र दुरूस्तीचे आदेश पारीत करण्याबाबत.
ई-फेरफार प्रणाली मध्ये काम करत असताना 7/12 वरील सर्व हिस्सोदारंची बेरीज 7/12 वरील एकुण क्षेत्रापेक्षा कमी किंवा जास्त असल्यास असे 7/12 ODC अहवाल -1 मध्ये दर्शविले जातात. तसेच गा.न.नं.1 (आकारबंद) मधील एखादया स.न./ग.नं. चे क्षेत्र व गा.न.नं. 7/12 वरील संबधित सर्व स.न./ग.नं. चे पोटहिस्साच्या क्षेत्राची बेरीज (डाव्या बाजूचे क्षेत्र ) यांच्यामध्ये तफावत येत असल्यास असे गट / स.नं. चे 7/12 ODC अहवाल-3 मध्ये दर्शविले जातात. अचुक गा.न.नं. 7/12 व 8अ साठी ODC तील अहवाल 1 ते 28 सह हे दोन्ही अहवाल निरंक आसणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही 7/12 डिजीटल स्वाक्षरीत करण्यापूर्वी तो ७/१२ अशा सर्व अहवालामधून पास होणे आवश्यक आहे. यासाठी खालीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.
1) अहवाल -1 किंवा 3 दुरूस्त करण्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून व संबंधितांना सुनावणी सुनावणीची संधी देवून तहसिलदार यांनी आदेश पारीत करताना 7/12 वर सुचविण्यात आलेली क्षेत्र दूरूस्ती केल्याीमुळे कोणत्याही प्रकारे नव्याने अहवाल 1 व 3 तयार होणार नाहीत. याची दक्षता घ्यावी.
2) अहवाल 1 निरंक करताना अशा 7/12 तील सर्व हिस्सेधारकांना/भोगवटदारांनी धारण केलेले क्षेत्र व 7/12 वरील डाव्या बाजूचे एकुण क्षेत्र विचारात घेणे आवश्यक आहे. कोणत्याही केवळ एका खातेदाराचे क्षेत्र कमी किंवा जास्त करून चालणार नाही. हे देखील लक्षात घ्यावे.
3) कोणत्याही स.न./ग.नं. चे क्षेत्र अंतिम करताना ते आकारबंद (गा.न.नं. 1 ) मध्ये नमूद क्षेत्रापेक्षा जास्त किंवा कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जरूरी असेल तर उप अधीक्षक भूमि अभिलेख यांचे कडून अभिप्राय प्राप्त करून घ्यावेत.
वरील प्रमाणे कार्यवाही करून तहसिलदार यांनी आपले अधिनस्त तालुक्यातील सर्व गावाचे ODC अहवाल 1 व 3 निरंक करण्याची कार्यवाही करावी. तहसिलदार यांच्या अशा आदेशाची अंमलबजावणी कलम 155 च्या दुरूस्ती सुविधा मधील क्षेत्र दुरूस्ती व अहवाल -1 क्षेत्र दुरूस्ती या सुविधा वापरून करता येईल . सदरच्या सुचना सर्व तहसिलदारांच्या व अन्य वापरकर्ते यांचे निर्दशनास आणव्यात ही विनंती.
आपला विश्वासू
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय , पुणे
प्रत -मा. उपआयुक्त ( महसुल )
विभागीय आयुक्त कार्यालय ,कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग व नागपूर विभाग यांना माहितीस्तव सविनय सादर.
उप विभागीय अधिकारी ( सर्व)
Comments