रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे 7/12 उतारा अद्यावत करणे बाबत

क्र.रा.भू. 4/कापूस उत्पादक नोंद/कावि-1021/18 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय, पुणे, दिनांक 14 /12/2018. प्रति, उपजिल्हाधिकारी तथा डिस्ट्रीक डोमेन एक्सपर्ट (डी.डी.ई) (सर्व) विषय-राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे 7/12 उतारा अद्यावत करणे बाबत. संदर्भ-मा. अवर सचिव, महसुल व वनविभाग, ल-1 मंत्रालय, मुंबई यांचे कडील पत्र क्रं. संकीर्ण-2018/स.क्रं. 1586/ल-1 मुंबई, दिनांक 22/11/2018 उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषगांने मा. अवर सचिव, महसुल व वनविभाग, ल-1 मंत्रालय, मुंबई यांचे कडील पत्र इकडील कार्यालयास प्राप्त झाले आहे. (प्रत सलग्न) सदर पत्रात राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे 7/12 उतारा अद्यावत करणे बाबत नमूद केले आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या धोरणानुसार हंगाम 2018-19 मध्ये कापूस उत्पादक राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती विषयक माहितीचे संगणकीकरण करण्यांबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. कापूस खरेदी करताना अडचणी निर्माण होत आहेत. महसुल विभाग व कृषी विभागाच्या समन्वयातून राज्यातील कापूस उत्पादकांचे 7/12 उतारे हंगाम 2018-19 च्या कापूस खरेदीपूर्वी अद्यावत होणे जरूरीचे आहे. तसेच कापूस लागवडीखालील जमीन व पिकपेऱ्या संदर्भात अचूक नोंदी 7/12 वर झाल्यास व 7/12 उतारे अद्यावत झाल्यास कापूस खरेदी करणे व शेती विषयक माहिती संगणकीकरण करणे सुलभ होणार आहे. त्याअनुषंगाने आपल्या जिल्हयातील कापूस उत्पादकांचे पिकांची नोंद गाव नमुना 7/12 वर घेतली अगर कसे? या बाबत पडताळणी करून, कापूस उत्पादकांचे 7/12 अद्यावत करून, त्यात पुन्हा कोणताही बदल होणार नाही, हयाची दक्षता घ्यावी. व पुर्तता अहवाल तातडीने पाठवावा. आपला (रामदास जगताप) राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का. जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे प्रत- मा. अवर सचिव, महसुल व वनविभाग, ल-1, मुख्य इमारत, 1 ला मजला, मंत्रालय, मुंबई-32 यांना माहितीस्तव सविनय सादर. प्रत- मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, अमरावती विभाग व नागपूर विभाग यांना माहितीस्तव सविनय सादर.

Comments

Archive

Contact Form

Send