तलाठी /मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप पुरवठा करणेबाबत.
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा डि.डि.ई. (सर्व.)
विषय :- तलाठी /मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप पुरवठा करणेबाबत.
संदर्भ :- 1. मा. मंत्री (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे दिनांक 16/04/2018
रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचना.
२. या कार्यालयाकडील क्र.रा.भू.अ.आ.का.4/लॅपटॉप प्रिंटर खरेदी/2018 दिनांक
25/05/2018 रोजीचा ई-मेल संदेश.
3. या कार्यालयाकडील क्र.रा.भू.अ.आ.का.4/लॅपटॉप प्रिंटर खरेदी/2018 दिनांक
04/08/2018 रोजीचा ई-मेल संदेश.
4. या कार्यालयाकडील क्र.रा.भू.अ.आ.का.4/लॅपटॉप खरेदी/2018 दिनांक
06/10/2018 रोजीचे पत्र.
उपरोक्त संदर्भीय आढावा सभेमध्ये मा.मंत्री (महसूल) यांनी राज्यातील ज्या तलाठी /मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप चे वाटप झाले नाही त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेसाठी उपलब्ध निधीतुन लॅपटॉप पुरविण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने आपल्या जिल्हयातील तलाठी / मंडळ अधिकारी यांना पुरविण्यात आलेल्या लॅपटॉप संदर्भातील माहिती खालील परिशिष्टाप्रमाणे भरुन या कार्यालयाकडे dlrmah.mah@nic.in या ई-मेलवर Excell sheet मध्ये तात्काळ सादर करावी असे आपणांस कळविण्यात आले होते.
तलाठी संघटनेने बैठकीत जोपर्यंत लॅपटॉप प्राप्त होत नाहीत तोपर्यंत 7/12 डिजीटल स्वाक्षरीत करण्याच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आपण आपले जिल्हयातील लॅपटॉप वाटपाची अद्यावत माहिती तात्काळ या कार्यालयास सादर करावी.
तलाठी /मंडळ अधिकारी यांना लॅपटॉप वाटपाची सद्यस्थिती.
अ.क्र. जिल्हा तलाठी/ मं.अ. यांची एकुण संख्या पुर्वी लॅपटॉप पुरविलेल्या तलाठी/ मं.अ.यांची संख्या महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडुन प्राप्त झालेले लॅपटॉप पुरविण्यात आलेल्या तलाठी/ मं.अ. यांची संख्या नव्याने लॅपटॉप खरेदी करुन पुरविलेल्या तलाठी / मं.अ. यांची संख्या अद्यापपर्यंत लॅपटॉप न पुरविलेल्या तलाठी/ मं.अ. यांची संख्या लॅपटॉप पुरवठा न करण्यात आल्याची कारणे
1 2 3 4 5 6 7 8
दिनांक 18/12/2018 अखेरची अद्ययावत माहिती दिनांक 20/12/2018 पर्यंत पाठवावी हि विनंती यामध्ये प्रिंटर्सची संख्या नमुद करु नये.
(रामदास जगताप)
दि १७.१०.२०१८
Comments