ई फेरफार प्रणालीतील कामकाज - महत्वाचे मुद्दे
नमस्कार मित्रांनो ,
ई फेरफार मध्ये काम करताना खालील प्रमाणे काळजी घ्या
१. ई फेरफार मध्ये फेरफार घेताना कोठेही - - देऊ नका
२. ई फेरफार मध्ये कोणत्याही खात्यावार एक फेरफार प्रलामाबित असताना दुसरा फेरफार घेऊन प्रमाणित करू नका .
३. ई फेरफार मध्ये काम करताना सर्व अहवाल निरंक असल्याची खात्री करा
४. ई फेरफार मध्ये प्रत्येक फेरफार कोणाच्या लोगिन ला किती दिवस प्रलंबित होता व कोणता बदल कोणी केला हे audit log मध्ये समजते त्यामुळे प्रलंबित ठेऊ नका .
५. कोणत्याही वर्ग २ भूधारणा असलेला ७/१२ योग्य आदेशां शिवाय वर्ग १ करू नका
६. ई फेरफार मध्ये मंडळ अधिकारी यांनी कोणत्याही परिशिष्ट ब किंवा क चा स्वाक्षरीचा आदेश पाहूनच फेरफार प्रमाणित कराव
७.योग्यरीत्या अंमल झाल्याचे बटन दाबून remark दिल्या शियाय फेरफार निर्गत झाला असे होत नाही
८.ई फेरफार मध्ये काम करताना नेहमी चागले स्पीड असलेले नेटवर्क वापरावे . मोफत मिळणारे डेटा कार्ड वापरू नये
९.ocu मधून भरलेल्या पिक पेरयाच्या नोंदी पुन्हा बदलू नयेत
१०. मुदत खरेदीच्या नोंदी घेताना सामान्य फेरफार मधून घ्यावयात
११. वन पट्टा धारकांचे ८अ हस्तलिखित तयार करावेत व वितरीत करावेत ( त्यावर वन पट्टा धारकांची खाते नोंदवही असे स्पष्ट नमूद करावे
१२ हस्तलिखित ७/१२ व खाते उतारे ( वन पट्टा धारक वगळून ) वितरीत करण्यात य्रू नयेत
१३ ७/१२ पूर्णतः अचूक असल्याशिवाय डिजिटल स्वाक्षरीत करणेत येऊ नये
१४.तलाठ्या प्रमाणे मंडळ अधिकारी यांनी देखील fifo शक्यतो पाळावा
१५. खाता दुरुस्ती module मध्ये काम करताना त्या खात्यावर एकाही फेरफार प्रलंबित नाही ना ? ह्याची खात्री करावी
`१६. जे ७/१२ अद्याप online वर भरले नसतील ते तत्काळ क १५५ च्या आदेशाने दिलेल्या सुविधेतून भरणेत यावेत
१७. खरिप २०१८ ची पिक पाहणी पूर्ण झाली असल्याची खात्री करावी
१८. आपल्या गावात एकाही व्यक्तीचे एकुम्या / ए कु पु अशा नोंदी नाहीत ना ? खात्री करावी
१९ आपल्या गावातील ७/१२ वर ईतर वारसांची इतर हक्कात असलेली सर्व नावे भोगवटादार सदरी घ्यावीत तरच पुढील हस्तानातर योग्य होईल
२० अपाक च्या नोंदी असलेले खातेदार सज्ञान झाले असल्यास अपाक नोंदी कमी करणेत यावेत
ई फेरफार व दिजीअल ७/१२ साठी व अद्यावत माहिती साठी मझ्या ब्लोग ला भेट द्या
आपला
रामदास जगताप
दि ३.१२.२०१८
सर नमस्कार,
ReplyDeleteआत्ताची जी खाता दुरुस्ती सुविधा खूप छान आहे.फक्त घाई ना आता वेळ दिला पाहिजे कारण या पुढे no excuse हे आम्ही तलाठी बांधव जाणतो आपला हा प्रोजेक्ट जवळ जवळ यशस्वी झालच आहे आणखी एक तूम्ही सर्व कॉमेंट्सना रिप्लाय देता हे आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे पुन्हा एकदा धन्यवाद