राजपत्राने नावात बदल ” बाबत फेरफार घेणेसाठी तहसिलदार यांनी तलाठी यांना आदेशीत करणेबाबत
मार्गदर्शक सूचना क्रमांक - 79. रा.भू.अ.आ.का/रा.स./कावि/79/२०१8
मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक
भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय
दिनांक:- 19/11/२०१8.
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा डि.डि.ई. (सर्व.)
विषय :- “ राजपत्राने नावात बदल ” बाबत फेरफार घेणेसाठी
तहसिलदार यांनी तलाठी यांना आदेशीत करणेबाबत.
महोदय,
ई-फेरफार प्रणाली सध्या राज्यभरात कार्यान्वित झाली असून त्यामध्ये फेरफार घेण्याच्या व प्रमाणीत करण्याची कार्यपध्दती राज्यभर एकसमान असणे अपेक्षीत व आवश्यक आहे. ई-फेरफार प्रणालीतुन राजपत्राने नावांत बदल केलेबाबतचा फेरफार घेण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपध्दती अवलंबविणेत यावी.
1. अर्जदाराने नांवात बदली केलेचे प्रसिध्द झालेले राजपत्र जोडुन त्यासोबत चालू 7/12 व 8 अ जोडुन तसेच ओळखीचा पुरावा म्हणुन आधार कार्ड, पॅनकार्ड अथवा निवडणूक ओळखपत्र इत्यादी जोडुन तहसिलदार यांचेकडे अर्ज करावा.
2. तहसिलदार यांनी राजपत्र व जोडलेले अनुषंगिक पुरावे तपासून जमीन मालकीची खात्री करावी. राजपत्राप्रमाणे पुरावे नावात बदल करण्याबाबतचा आदेश काढावा व तो कार्यवाहीसाठी तलाठी/मंडळ अधिकारी यांना पाठवावा.
3. तलाठयाने ई-फेरफार प्रणालीतुन “ राजपत्राने नावात बदल ” या प्रकारातुन फेरफार घेवून त्याची नोटीस संबंधितांना बजवावी व त्याप्रमाणे पुढील कार्यवाही मंडळ अधिकारी यांनी करावी.
या प्रक्रियेमध्ये तहसिलदार यांनी राजपत्राने नांवात बदल करण्यास मान्यता देवून आदेश निर्गमित केल्याशिवाय ई-फेरफार प्रणालीतून तलाठयाला फेरफार घेता येणार नाही त्यामुळे तालुका स्तरावर या प्रक्रियेला विलंब होणार नाही याची दक्षता तहसिलदार यांनी घ्यावी.
वरील सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणाव्यात ही विनंती.
आपला विश्वासू,
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे.
तहसीलदार यांचेकडून मला पत्र आले आहे.बाकीची प्रोसेस करायला तलाठ्यांना किती दिवस लागतात..
ReplyDelete