रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार प्रणाली ७/१२ वर क्षेत्र मर्यादा घालून तसा अलर्ट मेसेज द्यावा काय ? तलाठी यांचा अभिप्राय घेणे

नमस्कार मित्रांनो , महत्वाची सूचना असे लक्षात आले आहे कि राज्यात अनेक ठिकाणी ७/१२ वरील क्षेत्र व एकक योग्य नमूद न केल्याने शेकडो ९/१२ वरील क्षेत्र १००० हेक्टर पेक्षा जास्त , १००० ते ५०० हेक्टर , व हजारो ७/१२ वरील क्षेत्र १०० ते ५०० हेक्टर असल्याचे दिसून आले आहे . त्याची यादी आपल्याला पाठवतो आहोत . त्यामुळे अनेक गावांचे एकूण भौगोलिक क्षेत्र कित्तेक पटीने वाढले आहे ते दुरुस्त करून प्रमाणपत्र देणे बाबत सूचना दिल्या आहेत तथापि अशा चुका होऊ नयेत म्हणून काही चेक प्रणाली मध्ये लावणे आवश्यक झाले आहे . उदा शेतीचा ७/१२ वर १०० हेक्टर व बिन्शेतीचे ७/१२ वर ५० आर पेक्षा जास्त क्षेत्र असू नये . या बाबत आपले जस्तीत जास्त किती क्षेत्राचा शेती व किती क्षेत्राचा बिन शेती चा ७/१२ आहे तसेच किती क्षेत्राचे validation software मध्ये ठेवावे ते मला तातडीने कळवावे हि विनंती . आपला रामदास जगताप दि १६.११.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send