रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

कलम 155 च्या आदेशान्वये दुरूस्ती सुविधा कामाचा आढावा घेण्यासाठी MIS उपलब्ध करून देण्याबाबत.

मार्गदर्शक सुचना क्रं. 76 क्र.रा.भू.अ.आ.का.4/रा.स/76/2018 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय, पुणे, दिनांक 13/11/2018. प्रति, उपजिल्हाधिकारी तथा डिस्ट्रीक डोमेन एक्सपर्ट (सर्व) विषय- कलम 155 च्या आदेशान्वये दुरूस्ती सुविधा कामाचा आढावा घेण्यासाठी MIS उपलब्ध करून देण्याबाबत. डिजीटल इंडिया भूमि अभिलेखाचे आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत संगणकीकृत 7/12 मधील त्रृटी दूर करण्यासाठी Edit module व Re-edit Module च्या वापरानंतरही काही त्रृटी 7/12 मध्ये राहिल्या असतील तर त्यांच्या दुरूस्तीसाठी तहसिलदार यांचे बायोमेट्रीक लॉगीन द्वारे व परिशिष्ट ‘क’ मधील महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अंतर्गत पारीत आदेशान्वये 7/12 दूरूस्त करण्यासाठी 9 सुविधा सर्वांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याबाबतचे सविस्तर प्रशिक्षण तालुका स्तरीय मास्टर ट्रेनर्स यांना विभागीय आयुक्त कार्यालयाचे स्थरावर देण्यात आले होते. तथापि या कामामध्ये समाधानकारक प्रगती दिसुन येत नाही. सबब कलम 155 च्या दुरूस्ती सुविधांद्वारे करण्यात येत असलेल्या कामकाजाचा आढावा वरिष्ठ स्थरावर घेता यावा. यासाठी MIS सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपल्या जिल्हयाचा/तालुक्याचा MIS Module मध्ये Villege Report मध्ये 1) कलम 155 आदेश- तहसिलदार यांचे मान्यतेचा फेरफार निहाय MIS 2) कलम 155 आदेश- तहसिलदार यांचे मान्यतेचा सर्व्हे निहाय MIS 3) कलम 155 आदेश- मंडळअधिकारी यांचे प्रमाणीकरणाचे फेरफार निहाय MIS 4) कलम 155 आदेश- मंडळअधिकारी यांचे प्रमाणीकरणाचे सर्व्हे निहाय MIS असे चार अहवाल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्या हे अहवाल तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित गावनिहाय स्वरूपात उपलब्ध आहे. तथापि तो लवकरच तालुका निहाय/जिल्हा निहाय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. या अहवालाचा उपयोग काम कोणत्या स्थरावर प्रलंबीत आहे? हयासाठी होईल. तसेच गुणवत्तापुर्वक काम पुर्ण करण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी/डीडीई/उपविभागीय अधिकारी/तहसिलदार यांनी या MIS चा वापर करावा, ही विनंती. आपला विश्वासू (रामदास जगताप) राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का. जमाबंदी आयुक्त कार्यालय ,पुणे . प्रत- मा.उपआयुक्त (महसूल) विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व) यांना माहितीसाठी.

Comments

Archive

Contact Form

Send