रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

सोलापूर , सांगली , वाशीम , यवतमाळ अहमदनगर व अमरावती जिल्ह्यांसाठी ई फेरफार मध्ये केलेल्या सुधारणा दि १३.११.२१०८ ( TEST SITE वर )

नमस्कार मित्रांनो , सोलापूर , सांगली , वाशीम , यवतमाळ अहमदनगर व अमरावती जिल्ह्यांसाठी ई फेरफार मध्ये केलेल्या सुधारणा ( TEST SITE वर ) दिनांक १३.११.२०१८ ====================== =================================================================================== या जिल्ह्यातील प्राप्त झालेल्या अडचणी सोडविण्यास्थी ई फेरफार प्रणाली मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करून या जिल्ह्यांना टेस्टिंग ( UAT ) साठी आज पासून दिली आहे वापरून FEEDBACK द्यावा 1. सोलापूर जिल्ह्यातील नवीन ७/१२ या सुविधेतून तयार करताना बिनशेती ७/१२ वरील भोगवटादार ची माहिती साठवा होत नव्हती . या ७/१२ मध्ये खातेदाराच्या नावासमोर बिनशेती क्षेत्र पोट खराब मध्ये दर्शविले होते . आत्ता त्यात सुधारणा केली आहे 2. खेत्र दुरुस्ती फेरफार मध्ये - ७/१२ वर क्षेत्र चुकीने 0.0002 Ares Sq.Mtrs असे दर्शविले होते , प्रत्यक्ष ते 2 Ares म्हणजेच 0.2000. असे असायला हवे होते . त्यात सुधारणा करून मिरज सांगली साठी टेस्टिंग ला दिले आहे . तपासून पहावे 3. आगोदर आदेशाने खाते दुरुस्ती या पर्यायामधून घेनेत आलेले फेरफार ( कलम १५५ च्या आदेशाने खात्यात दुरुस्ती ) साठी निवडलेल्या खात्यातील सर्व सर्वे नंबर ला अंमल होत होता , मात्र तसे तलाठी यांना करावयाचे नसल्यास अन्य पर्याय उपलब्ध नव्हता व असे फेरफारांचा योग्य अंमल देखील झाला नसता त्यामुळे खाता दुरुस्ती साठी स्वतंत्र सुविधा विकसित करून सर्वांना उपलब्ध करून दिली आहे . त्यामुळे या पूर्वी घेनेत आलेल्या फेरफार रद्द करण्यासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक होते त्यामुळे तसी सुधारणा करून वाशीम , यवतमाळ अहमदनगर व अमरावती जिल्ह्यांसाठी ई फेरफार मध्ये उपलब्ध करून दिली आहे . व खात्यात दुरुस्ती मध्ये अशा फेरफार साठी खालील प्रमाणे मेसेज देनेत आला आहे " १५५ ने आदेशाने खात्यात दुरुस्ती याची दुरुस्ती करण्याची पद्धती बदलली असल्यामुळे जे खाता दुरुस्तीचे जुने फेरफार घेतले आहेत ते सर्व फेरफार नामंजुर करवयाचे आहेत . या कामासाठी आपल्या जिल्हाच्या सर्वरवर khata_durusti ही अज्ञावली विकसीत केली आहे. तथापी, सदर फेरफार हा नामंजूर करुन ते khata_durusti या अज्ञावली मधून पुन्हा घ्यावेत ." 4.क.१५५ च्या आदेशाने नवीन ७/१२ या पर्याया मध्ये " देणाऱ्याची माहिती " हे बटन अनावश्यक होते , त्यामुळे हे वापरल्यास योग्य फेरफार तयार होत नव्हता त्यामुळे या मध्ये सुधारणा करून " देणाऱ्याची माहिती " हा पर्याय बंद करणेत आला आहे 5. मंडळ अधिकारी लॉगीन ला खाता दुरुस्ती सुविधे मध्ये खालील मेसेज देनेत आला आहे या सुविधेमध्ये काही सुधारणा होत असुन, तृत ही सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. This message replaced with " आपल्या जिल्हाच्या सर्वरवर khata_durusti हे स्वंतत्र मॉड्युल देण्यात आले आहे .आदेशाने खात्यात दुरुस्तीसाठी सदर यु.आर.एल.(url) चा उपयोग कारावा." वरील प्रमाणे सुधारणा सोलापूर , सांगली , वाशीम , यवतमाळ अहमदनगर व अमरावती जिल्ह्यांसाठी आज पासून test site eferfar2beta_test उपलब्ध करून दिल्या आहेत त्या वापरून FEEDBACK द्यावा आपला रामदास जगताप दि.१३.११.२०१८

Comments

Archive

Contact Form

Send