7/12 वरील क्षेत्र दुरूस्ती योग्य पध्दतीने करून तहसिलदार यांनी काम पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणेबाबत
स्मरणपत्र क्रं.1 क्र.रा.भू.अ.आ.का.4/क्षेत्र दुरूस्ती/2018
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि
अभिलेख, (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय,
पुणे, दिनांक 12 /11/2018.
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा
डिस्ट्रीक डोमेन एक्सपर्ट (सर्व)
विषय- 7/12 वरील क्षेत्र दुरूस्ती योग्य पध्दतीने करून तहसिलदार यांनी काम
पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणेबाबत.
संदर्भ- इकडील कार्यालयाचे पत्र क्रं.रा.भू.अ.आ.का.4/रा.स/67/2018 पुणे
दिनांक 24/09/2018.
कृपया संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे. त्यात नमूद केलेप्रमाणे सर्व तलाठी यांनी कार्यवाही पुर्ण केले असल्याची पडताळणी करून ( ई-फेरफार मधील क्षेत्र दुरूस्तीचे 7 अहवाल पहावेत ) आपल्या तालुक्यातील सर्व गावांचे काम पुर्ण झाले असल्याची खात्री करून आपले प्रमाणपत्र डिस्ट्रीक डोमेन एक्सपर्ट यांना सादर करावे. (क्षेत्र दुरूस्तीचे अहवालाचा गोषवारा तहसिलदार व उपविभागीय अधिकारी व डिस्ट्रीक डोमेन एक्सपर्ट यांनाही पाहता येईल.) व सर्व डिस्ट्रीक डोमेन एक्सपर्ट यांनी आपल्या जिल्हयातील सर्व तालुक्याचे काम पुर्ण झाल्याची खात्री करून दिनांक 24/09/2018चे संदर्भीय पत्रात नमूद नमुन्यात प्रमाणपत्र दिनांक 19/11/2018 पुर्वी इकडील कार्यालयात सादर करावे, ही विनंती.
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
प्रत-उपविभागीय अधिकारी (सर्व) यांना पुढील उचित कार्यवाहीसाठी.
प्रत-तहसिलदार (सर्व) यांना पुढील उचित कार्यवाहीसाठी.
Comments