ई फेरफार साठी दस्त नोंदणी करताना दुय्यम निबंधक यांनी घ्यावयाची दक्षता
विषय - ई फेरफार साठी दस्त नोंदणी करताना घ्यावयाची दक्षता
राज्यात गेल्या २/३ वर्षा पासून ई-फेरफार प्रणाली व आय-सरीता चे INTEGRATION करण्यात आले असून गाव नमुना ७ वर दस्त करून देणाऱ्याची नावे असल्याशिवाय दस्त नोंदणी करता येत नाही .
सध्या फक्त १. खरेदी ,२. बक्षीसपत्र , ३. हक्कसोडपत्र व ४. गहाणखत हे चार दस्त प्रकार ONLINE पद्धतीने नोंदविले जातात व अन्य प्रकारच्या दस्त नोंदणी साठी स्किप पर्यायाचा वापर केला जातो .
अश्या ONLINE दस्त नोंदणी साठी खालील प्रमाणे दक्षता घेनेत यावी .
१. खरेदी करून घेणाराचे नांव, भरताना पहिले नाव , मधले नांव , आडनांव व असल्यास टोपण नाव असे भरावे.
२. खरेदी देणाराचे नांव 7/12 वरुन खाते नंबर नमूद करून आहे तसेच घ्यावे , त्यात बदल करण्याचा प्रयत्न करू नये .
३. (Skip Option) वापरताना देखील ONLINE 7/12 वर खरेदी देणाराचे नांव असेल तरच दस्तनोंदणी करावी.
४. नावाच्यापुर्वी श्री. , श्रीमती, सौ, गं.भा., कै.,डॉ.,श्रीमंत, इंजि,पै.,अशी विशेषणे लिहु नयेत.
५. जमीन खरेदी देणार व घेणार यांचा खाते उतारा ( गाव नमुना नं.8 अ) हा दस्ताचा भाग करावा असे परिपत्रक मा. नोंदणी महानिरीक्षक यांनी यापूर्वीच काढले आहे त्याची अंमलबजावणी करावी .
६. खरेदी घेणार त्यागांवात खातेदार असताना TKN टाकु नये. खरेदी घेणार वैयक्तिक असेल तरच त्याचे वैयक्तिक खाता क्र. खरेदी घेणाऱ्याचे खाते नं. म्हणुन घ्यावे (खरेदी वैयक्तिक व खाते नंबर समाईकातील असे असु नये.)
७. 7/12 वरील एकक हे.आर, चौ.मी. असेल तर दस्तनोंदणी देखील हे.आर, चौ.मी.मध्येच करावी.
८. 7/12 वरील एकक आर. चौ.मी.मध्ये असेल तर दस्त नोंदणी देखील आर.चौ.मी.मध्येच करावी.
९. दस्तनोंदणी करताना जमीन प्रतिबंधीत सत्ताप्रकारची असल्याचा मेसेज आल्यास गरजेप्रमाणे परवानगी आदेशाची प्रत तहसिलदार यांना दाखवुन 7/12 दस्तनोंदणीसाठी तात्पुरता Unblock करुन घेणे बाबत पक्षकारांना मार्गदर्शन करावे.
असा तात्पुरता Unblock केलेला ७/१२ फक्त एका दस्त नोंदणीसाठी Unblock राहतो हे लक्षात घ्यावे .
१०. 7/12 वर नमूद स.नं. व पोटहिस्सा नंबर प्रमाणेच स.नं. व पोटहिस्सा नंबर दस्तात नमुद असावा.
११. पावर ऑफ ॲटर्नीद्वारे दस्त नोंदणी करताना POA मध्ये ॲटर्नीधारकाचे नांव नमुद करावे .
१२. महिला खरेदीदारांची नावे लिहिताना पूर्वाश्रमीचे / लग्नापूर्वीचे नाव असे सूची २ मध्ये लिहू नये .
१३. सामाईक / संयुक्त खात्यातील दस्त करून देणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्व सह हिस्सेधारकांची नावे नमूद नसल्यास दस्त करून देणाऱ्यांची नावे निवडून TKN नंबर नमूद करावा.
१४. दस्तामध्ये देणाराचे नांव नमूद करताना फक्त जी व्यक्ती प्रत्यक्ष दस्त करून देणार आहे त्यांचीच नावे निवडावीत .
समाईक खात्यातील अन्य सह हिस्सेदार अथवा इतर हक्कातील व्यक्तींनी किंवा ७/१२ वर नसलेल्या कुटुंबातील अन्य व्यक्तींनी संमती दिली असल्यास त्यांची नांवे संमती / मान्यता देणार म्हणुन घेण्यात यावीत दस्त करून देणार म्हणून घेऊ नयेत .
१५. समाईक / संयुक्त खात्यात दस्त करुन देणाऱ्याचे क्षेत्र निश्चित केलेले नसल्यास व सर्व सह हिस्सेदार दस्त करून देत नसल्यास त्याला अविभाज्य हिश्श्याचे खरेदीपत्र( पुर्ण ) व ( अंशत ) असे दोन अनुच्छेद नविन तयार करुन दिले आहेत त्यापैकी एक पर्याय वापरावा.
अशा व्यवहारामध्ये क्षेत्र नमूद करू नये ( फक्त मुद्रांकशुल्क निश्चित करण्यासाठी क्षेत्र विचारात घ्यावे ) तथापि त्यासाठी तुमचे नावासमोर तलाठयाकडुन क्षेत्र टाकुन आणावे असे पक्षकारांना सांगु नये.
( कोणत्याही कारणाने वैयक्तिक खाते प्रकारासाठी हे पर्याय वापरू नयेत )
१६. दस्त करुन घेणार कंपन्या, संस्था, संघटना, कारखाने असल्यास त्याची नांवे नमुद करताना प्रथम नांवमध्ये ( First Name) एक मधले नांव ( Middle Name) मध्ये एक व इतर सर्व नांवे शेवटचे नाव (Last Name) या रकान्यात नमुद करावीत.
१७. खरेदीदार संस्था / महामंडळाचे जे नाव ७/१२ वर येणे अपेक्षित आहे तेच नाव खरेदी घेणार म्हणून नमूद करावे . प्राधिकृत व्यक्ती / प्रतिनिधी यांचे नाव खरेदी घेणार म्हणून घेऊ नये .
रामदास जगताप
दि.३०.१०.२०१८
Comments