ई फेरफार कामकाजासाठी महत्वाच्या सुचना दि.३०.१०.२०१८
नमस्कार मित्रांनो ,
ई फेरफार प्रणाली मध्ये काम करताना कृपया खालील बाबी विचारात घ्या
१. कलम १५५ अन्वये करावयाच्या दुरुस्त्यांना online पद्धतीने फक्त तहसीलदार मान्यता देऊ शकतात . याची सुविधा नायब तहसीलदार अथवा मंडळ अधिकारी यांना उपलब्ध नाही
तहसीलदार यांनी online user creation मधून तहसीलदार यांनी मान्यता दिली तरच तलाठी फेरफार तयार करून परिशिष्ट क मधील आदेश तयार करू शकतील
२. राज्पात्राने नावात बदल या फेरफार प्रकारासाठी ताहासिलदार यांनी आदेश देणे आवश्यक आहे . online राजपत्र जाहीर होताना जमीन मालकी हक्काबाबत कोणताही पुरावा घेतला जात नाही त्यामुळे जमीन मालकीहक्काची खात्री करून
तहसीलदार यांनी राजपत्रासोबत फेरफार घेण्यासाठी अआदेश देणे आवश्यक आहे. ई फेरफार प[रानाली मध्ये दोन्ही गोष्टी फेरफार घेण्यासाठी आवश्यक आहे .
३. वाडी विभाजनाचा फेरफार घेण्यापूर्वी त्या गावात एकही फेरफार प्रमाणित करण्यासाठी प्रलंबित नाही ह्याची खात्री करावी .
४. पिक पाहणी च्या नोंदी घेताना मागील वर्षाची पिकपाहानी कॉपी करून करू नये . पिक पाहणी करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करावे
५. फेरफार योग्यरीत्या प्रमाणित झाला नाही या पर्यायानंतर देखील सर्व दुरुस्त्या करून देखील फेरफार चा योग्य अंमल होत नसेल तर असा फेरफार नामंजूर करावा
६. ODC मधील सर्व अहवाल निरंक असल्याची खात्री प्रत्येक तलाठ्याने करावी .
७. प्रत्येक तलाठ्याने प्रत्येक ७/१२ वरील क्षेत्र व एकक योग्य असल्याची खात्री करूनच ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करावा .
८. कलम १५५ च्या दुरुस्त्यांबाबत तहसिलदार यांचे स्वाक्षरीचा परीशिस्त क मधील आदेश प्राप्त झाल्याशिवाय मंडळ अधिकारी यांनी फेरफार प्रमाणित करू नये .
९. तलाठी मंडळ अधिकारी यांचे वापरातील DSC ची मुदत संपत आली असल्यास त्याचे वेळीच RENEWAL करून घ्यावे . त्याचा खर्च जिल्हा सेतू समितीच्या निधीतून करावा .
सदरच्या सूचना सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांना माहितीसाठी आहेत
आपला
रामदास जगताप
दिनांक ३०.१०.२०१८
Comments