रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आपली चावडी - गावचा डिजिटल नोटीस बोर्ड बाबत

विषय - आपली चावडी - गावचा डिजिटल नोटीस बोर्ड बाबत महोदय , ई फेरफार प्रकल्पाच्या अशस्वी अंमल बजावणी साठी व या प्रकल्पाचा खऱ्या अर्थाने माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घरबसल्या आपल्या प्रलंबित फेरफार ची माहिती मिळण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते महाराष्ट्र दिना पासून सुरु केलेली आपली चावडी हे गाव निहाय चावडी कार्यालयाचा डिजिटल नोटीस बोर्ड दर्शविणारे संकेत स्थळ पुन्हा कार्यान्वित करणेत आले आहे . या संकेतस्थळावरून संबंधित गावातील प्रलंबित अथवा प्रमाणित न झालेल्या फेरफार ची सद्यस्थिती कोणत्याही व्यक्तीला पाहता येईल . तसेच फेरफाराची नोटीस देखील ( नमुना ९ ) पाहता येईल त्याशिवाय फेरफार घेतल्याचा दिनांक , नोटीस बजावल्याचा दिनांक , हरकत घेण्याची तारीख , हरकती चा तपशील तसेच प्रत्येक प्रलंबित फेरफाराची सद्यस्थिती पाहता येईल .त्यासठी आपल्याला https://mahabhulekh.maharashtra.gov.in/ या स्थळावरून आपली चावडी हा पर्याय निवडता येईल अथवा http://mahabhumi.gov.in/aaplichawdi या संकेत स्थळावरून जिल्हा , तालुका व गाव निवडून कोणत्याही व्यक्तीला आपल्या गावातील सर्व प्रलंबित फेरफार नोंदींची सध्यस्थिती जाणून घेता येईल . या संकेत स्थळामुळे जनतेला आपल्या फेरफाराची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागणार नाही तसेच फेरफार मधील तपशील देखील नोटीस मध्ये घरबसल्या पाहता येणार आहे .व कामात पारदर्शकता येऊन जनतेच्या मनात महसूल विभागाची प्रतिमा उंचावण्यात निश्चित मदत होईल असा विश्वास आहे . तरी या बाबत जनजागृती करण्यासाठी आपले स्थरावर प्रेस नोट देऊन नोटीस बोर्ड वर जाहीर सुचना काढून व्यापक प्रशिद्धी देण्यात यावी अशी विनंती आहे . आपला रामदास जगताप पुणे २४.१०.२०१८

Comments

  1. आदरणीय सर.....
    100 टक्के परदर्शिक...... आपली चावडी - गावचा डिजिटल नोटीस बोर्ड तसेच या व्दारे फेरफारचा संपुर्ण तपसील देखली पहाता येतो. खूप छान सुविधा आहेत..

    ReplyDelete
  2. सर नमस्कार,
    आपली चावडीवर जमीन मोजण्याचे नोटीस दिसत नाही किती दिवसापासून इरर दाखवत आहे

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send