आपली चावडी - डिजिटल नोटीस बोर्ड कार्यान्वित झाली असल्या बाबत
नमस्कार मित्रांनो ,
मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते महाराष्ट्र दिना पासून सुरु केलेली आपली चावडी हि गाव निहाय चावडी कार्यालयाचा डिजिटल नोटीस बोर्ड दर्शविणारे संकेत स्थळ पुन्हा कार्यान्वित करणेत आले आहे .
या संकेतस्थळावरून संबंधित गावातील प्रलंबित आठवा प्रमाणित न झालेल्या फेरफार ची सद्यस्थिती कोणत्याही व्यक्तीला पाहता येईल . तसेच फेरफाराची नोटीस देखील ( नमुना ) पाहता येईल त्याशिवाय फेरफार घेतल्याचा दिनांक , नोटीस बजावल्याचा दिनांक , हरकत घेण्याची तारीख , फेर्फार्ची स्थिती पाहता येईल त्यासठी https://mahabhulekh.maharashtra.gov.in/ या स्थळावरून आपली चावडी हा पर्याय निवडता येईल अथवा http://mahabhumi.gov.in/aaplichawdi या संकेत स्थळावरून जिल्हा तालुका व गाव निवडून आपल्या गावातील सर्व फेरफार नोंदींची सध्यस्थिती जाणून घेता येईल .
उत्तम
ReplyDelete