रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

क्लाऊड एजन्सी व mpls कनेक्टीव्हिटी बाबत

नमस्कार मित्रांनो , आजची आनंदाची बातमी म्हणजे बहु प्रतीक्षित क्लाऊड एजन्सी आज झालेल्या मा. मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्थरीय समितीने (HPC) मान्य करून दिली आहे त्यामुळे आता सर्व प्रकल्पाची दिशा निस्च्छित झाली आहे . लवकरच आता क्लाऊड एजन्सी च्या DATA CENTRE वर ई फेरफार व आय सरिता प्रणाली स्थलांतरीत होतील . दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे SRO कार्यालयाना ज्या प्रमाणे mpls कनेक्टीव्हिटी देणेत आली आहे त्या प्रमाणे आपल्या ई फेरफार प्रकल्पासाठी देखील प्रत्येक तहसील कार्यालयाला mpls कनेक्टीव्हिटी देणेस मान्यता दिली आहे . तसेच जमाबंदी आयुक्त कार्यालय साठी देखील PLA खाते उघडण्यास मान्यता वित्त विभागाने दिली आहे . हे सर्व कार्यान्वित झाल्यास प्रकल्पाला गती प्राप्त होईल यात शंका नाही . आपण लवकरच क्लाऊड वर जाणार असल्याने आपण आपले कलम १५५ च्या दुरुस्त्या पूर्ण करून घ्याव्यात हि विनंती आपला रामदास जगताप दि.२५.१०.२०१८

Comments

  1. साहेब आम्ही तलाठी बांधव तुमचे खूप ऋणी आहोत तुम्ही हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट lead करत आहात आणि आमच्या अडचणी चा पाठपुरावा करत आहात.....परंतु आज तुम्ही ही पोस्ट जी केली आहे त्यातील असणारी तांत्रिक भाषा आमच्या अ-तांत्रिक बांधवांना काही समजली असेल अस मला वाटतं नाही... त्यांना इतकंच जाणून घ्यायचे आहे सर्व्हर ची गती आणि 155 दुरूस्तीसाठी दिलेल्या TAB मध्ये काही ज्या त्रुटी राहिल्या आहेत अश्या गोष्टी पूर्ण झाल्या तरी खूप....तरी योग्य ते मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send